खरे प्रेम
खरे प्रेम


रंगुनी रंगात सुरूवात केली तुझ्या बरोबर नवजीवनाची. पाहता-पाहता वर्षभरातच होळी खेळून लक्ष्मीची सोनेरी पावलं घेऊन छकुली आली या जीवनात.
मी मनी विचार करतच होते की लेबररूममध्ये जाताना दीर आणि जावेनेच फक्त गुलाल लावले! यांनीतर लावलेच नाही. तेवढ्यात कधीच रंगाची होळी न खेळणारे बाबा आईला म्हणत होते! अगं लोक उगीचच खोटे रंग लावून मग काढ़त बसतात! प्रेमाचे खरे रंग आपल्या मनात उतरले पाहिजे म्हणजे आयुष्य जगणे सार्थक होईल.
मग अक्षयतृतियेला छकुलीचे बारसे करायचे ठरविले थाटात आई-बाबांनी! तेव्हा हे न सांगता आदल्या दिवशी सासुबाईंबरोबर छकुलीसाठी केशरी-फ्रॉक आणि माझ्यासाठी साड़ी घेऊन आले आणि आम्हा सर्वांवर हळुच गुलाल उधळून! म्हणाले बुरा न मानो होली है.