The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Sangieta Devkar

Drama Romance

4  

Sangieta Devkar

Drama Romance

कही देर ना हो जाये(भाग 3 अंतिम

कही देर ना हो जाये(भाग 3 अंतिम

12 mins
249


तिची चूक तिला कधी तरी समजेल असे त्याला वाटत होते. पण ती स्वहता हुन बोलायला येत नाही तर आपण बोलून उगाच का अपमान करून घ्यायचा आणि तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आले असेल तर ? असे प्रश्न निखिल ला पडत असत. श्रुती ची बेस्ट फ्रेन्ड होती सारिका तिला तिने सगळं सांगितले की ती निखिल ला भेटली अचानक आणि आता ती त्याला मिस करत आहे. सारिका ला त्या दोघां बद्दल माहिती होती ती म्हणाली,मग काय विचार केला आहेस श्रुती? तुझ्या मनात असेल पुन्हा त्याच्या शी पॅचअप करायचे तर जा आणि बोलून बघ काय म्हणतो निखिल. सारिका अग मला जे वाटतंय तसच  त्याला ही वाटत असेल कशा वरून ?त्याच्या आयुष्यात तो पुढे निघून गेला असेल तर? कोणी दुसरी आली असेल ना त्याच्या आयुष्यात तो इतका स्मार्ट आणि स्वभावाने चांगला आहे अजून ही तो एकटा कसा काय असेल? श्रुती हेच सगळं विचार ना त्याला भेटून. बघू पुन्हा ऑफिस च्या कामा निम्मित भेटला तर बोलेन. पण श्रुती आता तर पटले आहे का की तुझं वागणं चुकीचे होते तुझा पझेसिव्हनेस जास्तच वाढला होता... तू स्वतःच्या हट्टी स्वभाव मूळे तू डिओर्स घेतलास. हो सारिका मला माझी चूक समजली आहे ग आणि मी एकटी आहे याचा फायदा लोक घ्यायला बसलेत जो पर्यंत आपल्या सोबत नवरा नावाचे सुरक्षा कवच असते ना तो पर्यंत लोकांची आपल्या कडे पाहण्याची नजर गढूळ होत नाही . तीच बाई जेव्हा नवऱ्या पासून वेगळं होते तेव्हा ही लोक गिधाडा सारखी टपून बसलेली असतात टोचे मारायला. हम्मम देर आये दुरुस्त आये सारिका हसत म्हणाली.

दुसऱ्या दिवशी श्रुती ला एक नोटिफिकेशन आले की एफ बी वर निखिल ने एक पोस्ट टाकली तसे लगेचच श्रुती ने पाहिले. एका मुलीचा फोटो त्याने टाकला होता तिचा बर्थडे होता आज. निखिल ने हॅप्पी बर्थडे डियर असे ही टाकले होते. आणि अजून एक फोटो टाकला त्यात निखिल त्या मुली सोबत होता. लगेचच त्या मुली ने ही तो फोटो लाइक केला तिचे नाव रश्मी होते. तिने कमेंट ही टाकली निक थँकयु सो मच डियर..हे सगळं पाहून श्रुती ला राग आला कोण असेल ही रश्मी ,काय रिलेशन असेल तीच निखिल सोबत आणि दोघांचा एकत्र फोटो.. ती अस्वस्थ झाली पण या बद्द्ल कोना ला विचारू ही शकत नवहती.तिने सारिका ला कॉल करून सगळं सांगितले. सारिका म्हणाली श्रुती आता पुन्हा तीच चूक करू नकोस अग ती निखिल ची मैत्रीण पण असू शकते आणि आजकाल सगळे एकमेकांना डियर म्हणतात त्यात वेगळं काही नाही. आणि फोटो तर सगळेच काढतात मित्र मैत्रीनि ऑफिस स्टाफ. तू जास्त विचार नको करू त्या पेक्षा निखिल ला जाऊन भेट आणि बोल जास्त उशिर करू नकोस. .ओके इतकं बोलून श्रुती ने फोन ठेवला. रात्री परत तिने एफ बी चेक केले तर रश्मीने बर्थ डे सेलिब्रेशन चे फोटो निखिल ला पण पोस्ट केले होते. निखिल रश्मी आणि दोन मुली, मुले असे त्या फोटोत होते . हॉटेल मधले फोटो होते रश्मी ने केक निखिल ला भरवला होता तसे निखिल ने तिला भरवला होता असे खूप फोटो होते. हे सगळं पाहून श्रुती ची पुन्हा चिडचिड होऊ लागली. तिने रागातच मोबाईल बंद केला. नक्की या रश्मी आणि निखिल मधये काहितरी सुरु आहे असे तिला राहून राहून वाटू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच तिची चिडचिड चालू होती.

आई ने विचारले तिला काय झालं श्रुती अस चिडचिड का करतेस . काही नाही ग आई उगाच प्रश्न नको विचारू. दोन वर्ष झाली श्रुती तुझ्या डीओर्स ला आता तरी दुसऱ्या लग्नाचा विचार कर मग ही अशी चिडचिड नाही होणार.आई काही काय बोलतेस याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आणि मला नको आहे कोणी दुसरा. मग निखिल ला जाऊन भेट बोल त्यांच्याशी. आई भेटला होता तो मला मागे एकदा म्हणाला होता माझी श्रुती एकच होती सो मी दुसरं लग्न नाही केले आणि आता एफ बी वर त्या कोना रश्मी सोबत फोटो टाकत असतो खूप खुश आहे तो त्याला माझी कशाला पडली आहे. म्हणून तुझी तडफड होतेय होय. पण मला सांग तू स्वतः हुन घटस्फोट घेतलास ना मग तरी निखिल ने एकटयाने रहावे त्याच्या आयुश्यात त्याने मूव ऑन करु नये अशी अपेक्षा तू कशी करू शकतेस. आई मी अपेक्षा नाही करत जाऊ दे ना तो निखिल मला काय करायचं त्याच. त्याच आयुष्य तो बघेल काय करायचं. हो ना मग तू पण शांत रहा. आई ला तिच्या मनातलं समजलं होत म्हणून मुद्दाम तिला हर्ट होण्यासाठी आई म्हणाली,बरे झाले ना निखिल ला कोणीतरी त्याच्या स्वभावा ची मुलगी मिळाली असणार म्हणून तर तो खूश असणार तू त्याचे फोटोज वगैरे बघू नकोस हा श्रुती. अडलय माझं खेटर अस म्हणत रागात श्रुती रूम मधये गेली आज रविवारी होता सो सुट्टी होती. आई ला हसू आवरत नव्हते. तितक्यात श्रुती चे बाबा वॉक वरून परत आले काय झाले श्रुती च्या आई आज सकाळी सकाळी हासताय काय विशेष? तसे आई ने श्रुती च्या वागण्या बाबत बाबांना सांगितले. ते ही खुश झाले म्हणाले पोरीला तिची चूक समजली असेल तर फार बरे होईल. निखिल खरच छान मुलगा आहे फक्त आततायीपणा मूळे हे सगळं घडले. अहो पण खरच जर निखिलच्या आयुष्यात दुसरी कोणी आली असेल तर. ? आता ते देवालाच ठाऊक. बाबा म्हणाले. संध्याकाळी सारिका ने श्रुती ला बाहेर फिरायला बोलवले आधी ती तयार होत नवहती पण सारिका ने तिला समजावले मग कुठे श्रुती तयार झाली. दोघी मॉल मध्ये आल्या होत्या. थोडी खरेदी केली मग त्या स्नॅक्स सेंटर कडे गेल्या. खायला आणि कॉफ़ी ची ऑर्डर दिली त्यांनी. आणि श्रुती ने पाहिले तिथेच थोड्या अंतरावर निखिल आणि रश्मी पिझ्झा खात बसले होते एकत्र खात होते. श्रुती चा राग अनावर झाला तिने सारिकाला ते दाखवले. श्रुती चल आपण दूसरी कडे जाऊन बसू. का नाही थांब मी आता लगेच निखिल कडे जाते आणि विचारते हे काय चालयय. श्रुती आर यु मॅड अग कोणत्या अधिकारा ने तू निखिल ला विचारणार आहेस तू कोणी ही लागत नाहीस आता त्याची ... समजलं उगाच स्वतः चा अपमान करून घेऊ नकोस. असे बोलून सारिका ने श्रुतीला एका चेयर वर बसवले. हे बघ श्रुती तू शांत हो आणि तुला इथे कम्फर्टेबल वाटत नसेल तर आपण दुसरीकडे जाऊ. नको सारिका बसूया इथेच. मग त्याची ऑर्डर आली सारिका ते घ्यायला काउन्टर कडे गेली . निखिल ने सहज मागे पाहिले त्याला श्रुती दिसली . तो रश्मी ला म्हणाला, जस्ट अ मिनिटं मी आलोच. तो श्रुती कडे आला. हॅलो श्रुती एकटीच आलीस का? नाही निखिल फ्रेन्ड आहे सोबत. निखिल रेड टि शर्ट आणि जीन्स मध्ये आलेला खूपच हॅन्डसम दिसत होता. कशी आहेस तू श्रुती? मी मजेत. तू कसा आहेस काय चाललंय तुझं? मी पण मस्त आहे.. ऑफिस आणि काम?? आणि हो नेक्स्ट वीक मी येणार आहे तुमच्या ऑफिस ला माझी मिटिंग आहे, शहां सोबत. ओहह ओके श्रुती म्हणाली. तितक्यात सारिका आली. निखिल ही सारीका माझी मैत्रीण आणि सारिका हा निखिल. तसे दोघांनी शेकहँड करत हॅलो केले. नाइस टू मिट यु म्हणत निखिल बाय म्हणून गेला. सारिका ने विचारले काय म्हणत होता ग श्रुती निखिल. काही नाही सहज चौकशी कशी आहेस वैगरे. हम्मम पण श्रुती कसला हॅन्डसम आहे ग निखिल आणि अशा मुलाला तू सोडलेस. सारिका उगाच माझी आता खेचू नकोस हा. आधीच त्या रश्मी ला बघून डोकं फिरले आहे माझं. बर नाही काढत तो विषय बस्स! खा आता अस सारिका म्हणाली. पण श्रुती चे लक्ष सगळं निखिल कडे होते. खाणं नुसतं चिवडत होती ती. निखिल रश्मी सोबत सेलफी काढत होता आणि मुद्दाम श्रुती कडे ही पहात होता. त्याला हे जाणवले होते की त्याच्या सोबत रश्मी ला बघून तिचा जळफळाट होत होता.. म्हणून मग निखिल अजून जास्तच रश्मी शी हसून ,मस्ती करत बोलत होता. त्यांचे खाणे झाले तसा निखिल श्रुती कडे आला म्हणाला, श्रुती मिट माय बेस्ट फ्रेन्ड रश्मी आणि रश्मी ही श्रुती आणि सारिका. नापसंतीनेच श्रुती ने रश्मी ला हॅलो केले. बाय सी यु म्हणत निखिल तिथून गेला.

पण श्रुती चे डोळे आपल्याच मागे असतील हे निखिल ने ओळखले आणि तो रश्मी चा हात हातात घेऊन चालू लागला. बघ सारिका किती निर्लज्ज आहे निखिल त्या बयेचा हात धरून चालला आहे आणि तू म्हणतेस तस काहीच नसेल त्यांच्यात? श्रुती किती जलस करतेस ग. तुला वाटते ना निखिल कडे परत जावे मग बोल लवकर त्याच्याशी नाहीतर खरच खूप उशीर होईल. जर रश्मी त्याची नुसती मैत्रीण असेल तर तो तुझा विचार पुन्हा नक्की करेल. खरच अस होईल का ग सारिका ?हो बी पॉझिटिव्ह डियर. मग त्या दोघी घरी आल्या. सारिका विचार करू लागली की श्रुती आता बदलली आहे.. तिला निखिल ची किंमत समजली आहे तेव्हा मीच काही तरी करून या दोघांना एकत्र आणले तर किती छान होईल . फक्त निखिल च्या मनात अजून श्रुतीच आहे का हे समजायला हवे बस मग पुढचे सगळं सोपं होईल. मग तिला सुचले पटकन तिने निखिल ला एफ बी वर फ्रेन्ड रिक्वेस्ट सेंड केली. रात्र होती म्हणून निखिल ही ऑन लाईन च होता त्याने पाहिले सारिका ची रिक्वेस्ट मग लगेच घेतली. तसे सारिका ने हॅलो असा मेसेज सेंड केला. निखिल ने ही हॅलो मेसेज केला. सारिका ने मेसेज केला निखिल मला काही महत्वाचे बोलायचे आहे आपण कॉल वर बोलू शकतो का? निखिल ने लगेच ओके आय विल कॉल यु. सेंड युवर नंबर प्लिज असा मेसेज केला. पाच च मिनिटात निखिल चा सारिका ला कॉल आला. बोल सारिका काय बोलायचे होते तुला? तसे सारिकाने श्रुती बद्दल सगळं निखिल ला सांगितले ती आता पूर्ण चेंज झाली आहे.. आज तुला रश्मी सोबत बघून तिला जलस फील होत होते . तिला तुझ्या सोबत पॅचअप करायचे आहे पण तुझ्या आयुष्यात कोणी असेल तर म्हणून ती बोलायला घाबरत आहे असे सारिका बोलली. मग निखिल म्हणाला,थँकयु सारिका तुझ्या मूळे मला श्रुती च्या मनातले तरी समजले. मी आज ही तिचीच वाट पहात आहे बीकॉज आय लव हर फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. मी तिला विसरू शकलो नाही. मग निखिल तू स्वतः हुन का नाही बोललास श्रुती शी. हेच ना सारिका की तिच्या आयुष्यात माझी जागी दूसऱ्या कोणी घेतली असेल तर? ओहहह बघ ना निखिल बोलून ज्या गोष्टी सॉलव्ह होऊ शकतात त्याच आपण न बोलून अजून कॉम्प्लिकेटेड बनवून ठेवतो.ओके मग श्रुती कधी बोलणार आहे माझ्याशी? निखिल मला वाटत नाही ती स्वतः हुन बोलेल तूच आता पुढाकार घे आणि बोल तिच्याशी. बर सारिका पण त्या आधी अजून जरा तिला जलस फील करतो ना ? जरा मज्जा येईल. निखिल जास्त पण आता तिला चिडवू नकोस हा. आधीच मॅडम हाई टेमपरेचर वर आहेत. बर बर अजून एक आपलं हे बोलणं तिला अजिबात सांगू नकोस . ओके नाही सांगत. बाय ऍण्ड गुड नाईट म्हणत सारिकाने फोन ठेवला. सारिकाला खूप छान वाटत होते श्रुती आणि निखिल एकत्र येणार याचा तिला आनंद वाटत होता.

श्रुती चे घर ऑफिस रुटीन सुरू होते अधूनमधून निखिल चे एफ बी पोस्ट पाहणे सुरू होते . निखिल ला सारिका बोलली होती की श्रुती त्याच एफ बी चेक करत असते म्हणून मग निखिल मुद्दाम रश्मी सोबत चे फोटो पोस्ट करत असे . रश्मी च्या फोटो वर शायरी कमेंट म्हणून टाकत असे जेने करून श्रुती ला राग यावा आणि माणूस जितका जलस होतो तितका तो त्या माणसाला आपलं करण्या साठी धडपडत राहतो हे निखिल जाणून होता. आज निखिल शहा अँड शहा कंपनीत आला होता त्याची मिटिंग होती. मिटिंग झाल्यावर तो श्रुती कडे आला दुपार झाली होती. आता लचं टाइम झाला होता. हॅलो श्रुती . हाय निखिल तिने हसत विचारले झाली का मिटिंग. हो श्रुती तुझी हरकत नसेल तर आपण लंच ला जाऊयात का? श्रुतिने पटकन होकार दिला जणू ती त्याला भेटायला उत्सुक होतीच. चल जाऊया म्हणत निखिल आणि श्रुती ऑफिस बाहेर आले. निखिल च्या कार मधून ते हॉटेल कडे निघाले. श्रुतील आवडणाऱ्या हॉटेल समोर ते आले. तसे श्रुती ने विचारले निखिल तुला अजून लक्षात आहे. हो मी काहीच विसरलो नाही ग. दोघे हॉटेलमध्ये आले एक रिकामे टेबल होते तिथे ते बसले. निखिल म्हणाला, श्रुती तुला जे हवं ते ऑर्डर कर. ओके म्हणत तिने मेनुकार्ड पहात ऑर्डर दिली. तो श्रुती कडे पहात होता खूप थकल्या सारखी वाटत होती डोळ्या खाली डार्क सर्कल आले होते. तो म्हणाला,खूप जागरण करतेस का श्रुती.? नाही रे थोडं कधी तरी ऑफिसच काम असते तेव्हा होत जागरण. तुझ्या मूळेच तर झोप लागत नाही मला ,तुझा विचार सतत असतो मनात. श्रुती मनातच हे बोलली. श्रुती मला तुला काही सांगायचे आहे म्हणूनच मी तुला लंच साठी घेऊन आलो. श्रुती ने ओळखले की याला रश्मी बद्दल बोलायचे असणार. तिला खूप वाईट वाटले हा इतका रुड कसा काय असू शकतो . निखिल मला काही ही नको सांगू मला नाही ऐकायचे तुझे काही. अग श्रुती तुला काय माहीत मी काय सांगणार आहे ते. माहीत आहे मला म्हणत श्रुती चे डोळे भरून आले तुला मला हेच सांगायचे आहे ना की तू आणि रश्मी एकत्र आहात . हम्मम्म कसे काय अचूक ओळखलेस श्रुतीची तिची गंमत करण्यासाठी बोलला. न ओळखायला काय झालं तुमचे एफ बी वरचे फोटो शेरो शायरी बघून कोणालाही समजेल . अच्छा म्हणजे तू माझे पोस्ट पाहतेस तर. पण तू तर मला ब्लॉक केले होतेस मग. नाही आता अनब्लॉक आहेस तू. अरे वा मग बोलली नाहीस कधी मला ते. मी कशाला पाहिजे तुझ्याशी बोलायला आहे ना तुझी ती डियर. आता निखिल ला खूप हसू येत होते. तितक्यात सूप आले . निखिल म्हणाला,डोळे पूस नाहीतर सूप खारट लागेल. आणि तो गालातल्या गालात हसू लागला. किती बालिश आहे अजून ही असा तो विचार करू लागला. श्रुती माझा इतका विचार करतेस मग एकदा तरी माझ्याशी बोलावे असे नाही वाटले तुला. श्रुतीला आश्चर्य वाटले . म्हणाली म्हणजे काय कशा बद्दल बोलतो तू निखिल. श्रुती मला इतक मिस करतेस अजून माझ्या वर तुझं प्रेम आहे हे का लपवलेस माझ्या पासून. निखिल त्या दिवशी तुला फाईल द्यायच्या निमित्ताने भेटले त्या नंतर पुन्हा मन तुझ्या कडे ओढ घेऊ लागलं पण तुला आणि रश्मी ला एकत्र पाहून मी गप्प बसले तू तुझ्या आयुष्यात मुव्ह ऑन केलेस मग मी तुमच्या मध्ये कशी येऊ ना? ओहहह असे होते तर पण मला सांग तुला कोणी सांगितले की मी आणि रश्मी रिलेशनशिप मधये आहोत म्हणून. अरे तुम्ही दोघ एकत्र असता त्या दिवशी मॉल मध्ये होतास तिच्या सोबत परत तिचा बर्थ डे केला तुम्ही. यावरून तू तर्क केला की माझं आणि रश्मी च काही आहे. मग नाही आहे का? श्रुती अग आजकाल मित्र मैत्रीनि एकत्र फिरण,फोटो काढन एकमेकांना डियर म्हणणं कॉमन तर आहेच ना तुला ही हे माहीत आहे. आणि आज ही तू माझ्या बाबतीत तेच करतेस जे 2 वर्षा पूर्वी केले होतेस पझेसिव्हनेस!! तेव्हा नुकतेच आपले लग्न झाले होते म्हणून तुला तसे वाटत असावे पण मी कधीही तसा वागलो का की तुला अनसेक्युर फील होईल.बर ते सोड झाला गेला तो विषय. रश्मी आणि मी चांगले मित्र आहोत ग आणि रश्मी सुद्धा मॅरीड आहे. तिच्या नवऱ्याला आमची मैत्री आहे हे माहीत आहे मग सांग त्याने किती तिच्या बाबत पझेसिव्ह असायला हवे? निखिल आय एम सॉरी मला तू हवा आहेस . त्याने मग तिचा हात आपल्या हातात घेतला म्हणाला,श्रुती मला ही तू हवी आहेस मी कायम तुझ्यावरच प्रेम केले आहे आणि करत राहीन. मला आज ओळखतेस का तू? हा निखिल माझं खरच चुकले नात्या मध्ये एकमेकांना बांधून ठेवण चुकीचे आहे तर एकमेकांना स्पेस देन महत्वाचे आहे हे मला समजले आहे. मग मॅडम येऊ का तुमच्या घरी तुम्हाला परत एकदा मागणी घालायला. तशी श्रुती गोड लाजली. मग त्यांनी जेवण केले आणि घरी निघाले. आज संध्याकाळी घरी येतो अस निखिल म्हणाला. ओके मी वाट पाहीन श्रुती बोलली. निखिल म्हणाला,तुझ्या मैत्रीणी ला सारिका ला पण बोलव नक्की. का रे सारिका कशाला? मॅडम तिने सगळं मला तुझ्या मनातलं सांगितले म्हणूनच मला समजले की तू मला मिस करतेस आणि मी पुन्हा तुला हवा आहे. काय सारिका बोलली हे सगळं. हो श्रुतु तिला थँक्स म्हण आणि बोलव तिला. हो नक्की म्हणत श्रुती ऑफिस ला गेली. मनावरच दडपन कमी झालं होत तिच्या ,तिने सारिका ला कॉल करून सगळं सांगितले तिला ही आनंद झाला. कधी एकदा ऑफिस सूटते आणि घरी जाऊन आई बाबांना ही गोड बातमी देते अस श्रुतीला झाले होते. तीच मन पिसा सारख हलकं होऊन वाऱ्या वर तरंगत होते...


समाप्त....



Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama