Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sangieta Devkar

Drama Romance


4  

Sangieta Devkar

Drama Romance


कही देर ना हो जाये..(भाग 2)

कही देर ना हो जाये..(भाग 2)

7 mins 395 7 mins 395

शेवटी तो ही त्याचा अपमान नाही सहन करू शकला. रागाच्या भरात तो बोलला की मला तुझा तुझ्या अशा वागण्याचा कंटाळा आला आहे. तेव्हा श्रुती म्हणाली होती हो का तुला कंटाळा आलाय ना माझा मग जाते मी रहा एकटा आणि श्रुती आपली बॅग भरून आई कडे निघून आली. तिच्या आईला तिचे वागणे अजिबात पटले नव्हते कारण ती किती हट्टी आणि अग्रेसीव्ह आहे हे आईला माहीत होत. उलट निखिल शान्त आणि समंजस आहे हे ही त्यांना माहीत होते. आई बाबांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण श्रुती ऐकायला तयार नवहती. आई तिला हे ही बोलली की अस लग्ना नंतर नवरा बायको ने एकमेकांना बांधून ठेवू नये ज्याची त्याची स्पेस त्याला द्यावी पण नेमकं श्रुती निखिल ला आपल्या बंधनात बांधून ठेवू पहात होती त्यामुळे त्याची घुसमट होत होती. श्रुतीच वागणं अगदी बालिश पणाच होत,तिने इंस्टा ,एफ बी वर अपलोड केलेला फोटो निखिल ने लगेच पहावा त्यावर कॅमेन्ट द्यावी अस तीच मत असायचं पण तो कामात बिझी असायचा. त्याचं ऑफिस चे काही फ़ंकशन असेल तर त्याचे फोटो कोणी निखिल ला पोस्ट केले तर ही कोण तुझ्या बाजूला किती खेटून उभी आहे ,ऑफिस कलीग असली तरी श्रुती अनसेक्युर फील करत असे. एक दोन वेळा निखिल ने श्रुती ला भेटून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण श्रुती चा इगो आड येत होता. मी का कमी पना घेऊन परत तुझ्या कडे येऊ असे ती बोलली होती. तुला वाटते ना आपलं नात टिकाव तर तू येऊन रहा माज्या सोबत माज्या आई वडीलां सोबत अस ती म्हणत असे. आता तिच्या वागण्याची हद्द झाली होती. मग निखिल ने हा विषयच बंद केला श्रुती ला म्हणाला तो,तुला परत यायचे तर ये मी मात्र तुझ्या घरी येणार नाही. असे होता होता एक दिवस श्रुती ने निखिल ला डिओर्स ची नोटीस पाठवून दिली.

म्युच्युअल डिओर्स पध्दतीने त्यांचा घटस्फोट झाला. श्रुती ला आता हे सगळं आठवत होत. निखिल पासून दूर होऊन ती खुश सुद्धा नवहती. इतर मैत्रीनि त्यांचे बॉयफ्रेंड यांना एकत्र पाहून तिला वाईट वाटायचे. तिच्याच ऑफिस मधील सुशांत तिच्या मागे लागला होता तो मॅरीड असून सुद्धा तो सतत तिच्याशी फ्लर्ट करायचा प्रयत्न करायचा एक दोन वेळा त्याने तिला प्रपोज पण केले. पण श्रुती ने त्याला नकार दिला होता लोक अशी चिप कशी काय वागू शकतात ,एखादी मुलगी डीओर्सी आहे म्हणजे साऱ्या जगाला ती अवेलेबल असते का ? असा विचार तिच्या मनात येत असे. म्हणूनच ती कोणाकडे लक्ष देत नसे. आपलं काम भले आणि घर असे तिचे वागणे होते. आणि अशी ही डोम कावळया सारखी लोक बघितली की ती नकळतपणे त्यांची तुलना निखिल शी करत असे. निखिल असा अजिबात नाही प्रत्येक मुलीला तो रिसपेकट देतो. तो बोलतो सर्वांशी पण त्याच्या मनात काही नसत. असा श्रुती विचार करत असे. माणूस दूर गेला ना की मग आपल्या माणसांची किंमत कळते असे काही से श्रुती चे झाले होते त्यात ही आज ती निखिल ला भेटली त्यामुळे त्याला मिस करत होती. तिने त्याला इंस्टा,एफ बी वरुन ब्लॉक केले होते ते तिने अनब्लॉक केले. तिला आश्चर्य वाटले की निखिल ने तिला अजून आपल्या फ्रेन्ड लिस्ट मध्ये ठेवले होते. तिने त्याचे सगळे पोस्ट पाहिले काही ठिकाणी शेरो शायरी,काही कविता तिला दिसल्या. ते पाहून तिला छान वाटले जणू तिच्या आठवणीत त्याने ते पोस्ट केले होते. ती फक्त त्याचे फोटो पहात होती खूप लाइकस आणि कमेंट्स होते . बऱयाच मुली नी त्याला लव ईमोजी सुद्धा टाकल्या होत्या पण निखिल ने त्याला काही ही रिप्लाय केला नवहता. इकडे निखिल ही श्रुती ला पाहून बेचैन झाला होता. आज ही त्याच श्रुती वरच प्रेम होत. कित्येक मुली त्याच्या मागे लागल्या होत्या पण त्याने इग्नोर केले होते. तो आज ही श्रुती ची वाट पहात होता. तिची चूक तिला कधी तरी समजेल असे त्याला वाटत होते. पण ती स्वहता हुन बोलायला येत नाही तर आपण बोलून उगाच का अपमान करून घ्यायचा आणि तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आले असेल तर ? असे प्रश्न निखिल ला पडत असत.

श्रुती ची बेस्ट फ्रेन्ड होती सारिका तिला तिने सगळं सांगितले की ती निखिल ला भेटली अचानक आणि आता ती त्याला मिस करत आहे. सारिका ला त्या दोघां बद्दल माहिती होती ती म्हणाली,मग काय विचार केला आहेस श्रुती? तुझ्या मनात असेल पुन्हा त्याच्या शी पॅचअप करायचे तर जा आणि बोलून बघ काय म्हणतो निखिल. सारिका अग मला जे वाटतंय तसच  त्याला ही वाटत असेल कशा वरून ?त्याच्या आयुष्यात तो पुढे निघून गेला असेल तर? कोणी दुसरी आली असेल ना त्याच्या आयुष्यात तो इतका स्मार्ट आणि स्वभावाने चांगला आहे अजून ही तो एकटा कसा काय असेल? श्रुती हेच सगळं विचार ना त्याला भेटून. बघू पुन्हा ऑफिस च्या कामा निम्मित भेटला तर बोलेन. पण श्रुती आता तर पटले आहे का की तुझं वागणं चुकीचे होते तुझा पझेसिव्हनेस जास्तच वाढला होता तू स्वतःच्या हट्टी स्वभाव मूळे तू डिओर्स घेतलास. हो सारिका मला माझी चूक समजली आहे ग आणि मी एकटी आहे याचा फायदा लोक घ्यायला बसलेत जो पर्यंत आपल्या सोबत नवरा नावाचे सुरक्षा कवच असते ना तो पर्यंत लोकांची आपल्या कडे पाहण्याची नजर गढूळ होत नाही . तीच बाई जेव्हा नवऱ्या पासून वेगळं होते तेव्हा ही लोक गिधाडा सारखी टपून बसलेली असतात टोचे मारायला. हम्मम देर आये दुरुस्त आये सारिका हसत म्हणाली. दुसऱ्या दिवशी श्रुती ला एक नोटिफिकेशन आले की एफ बी वर निखिल ने एक पोस्ट टाकली तसे लगेचच श्रुती ने पाहिले एका मुलीचा फोटो त्याने टाकला होता तिचा बर्थडे होता आज. निखिल ने हॅप्पी बर्थडे डियर असे ही टाकले होते. आणि अजून एक फोटो टाकला त्यात निखिल त्या मुली सोबत होता. लगेचच त्या मुली ने ही तो फोटो लाइक केला तिचे नाव रश्मी होते. तिने कमेंट ही टाकली निक थँकयु सो मच डियर..हे सगळं पाहून श्रुती ला राग आला कोण असेल ही रश्मी ,काय रिलेशन असेल तीच निखिल सोबत आणि दोघांचा एकत्र फोटो.. ती अस्वस्थ झाली पण या बद्द्ल कोना ला विचारू ही शकत नवहती.तिने सारिका ला कॉल करून सगळं सांगितले. सारिका म्हणाली श्रुती आता पुन्हा तीच चूक करू नकोस अग ती निखिल ची मैत्रीण पण असू शकते आणि आजकाल सगळे एकमेकांना डियर म्हणतात त्यात वेगळं काही नाही. आणि फोटो तर सगळेच काढतात मित्र मैत्रीनि ऑफिस स्टाफ . तू जास्त विचार नको करू त्या पेक्षा निखिल ला जाऊन भेट आणि बोल जास्त उशिर करू नकोस. .ओके इतकं बोलून श्रुती ने फोन ठेवला.

रात्री परत तिने एफ बी चेक केले तर रश्मीने बर्थ डे सेलिब्रेशन चे फोटो निखिल ला पण पोस्ट केले होते. निखिल रश्मी आणि दोन मुली ,मुले असे त्या फोटोत होते . हॉटेल मधले फोटो होते रश्मी ने केक निखिल ला भरवला होता तसे निखिल ने तिला भरवला होता असे खूप फोटो होते. हे सगळं पाहून श्रुती ची पुन्हा चिडचिड होऊ लागली. तिने रागातच मोबाईल बंद केला. नक्की या रश्मी आणि निखिल मधये काहितरी सुरु आहे असे तिला राहून राहून वाटू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच तिची चिडचिड चालू होती. आई ने विचारले तिला काय झालं श्रुती अस चिडचिड का करतेस . काही नाही ग आई उगाच प्रश्न नको विचारू. दोन वर्ष झाली श्रुती तुझ्या डीओर्स ला आता तरी दुसऱ्या लग्नाचा विचार कर मग ही अशी चिडचिड नाही होणार.आई काही काय बोलतेस? याचा माझ्या लग्नाशी काय संबंध आणि मला नको आहे कोणी दुसरा. मग निखिल ला जाऊन भेट बोल त्यांच्याशी. आई भेटला होता तो मला मागे एकदा म्हणाला होता माझी श्रुती एकच होती सो मी दुसरं लग्न नाही केले आणि आता एफ बी वर त्या कोना रश्मी सोबत फोटो टाकत असतो खूप खुश आहे तो त्याला माझी कशाला पडली आहे. म्हणून तुझी तडफड होतेय होय. पण मला सांग तू स्वतः हुन घटस्फोट घेतलास ना मग तरी निखिल ने एकटयाने रहावे त्याच्या आयुश्यात त्याने मूव ऑन करु नये अशी अपेक्षा तू कशी करू शकतेस. आई मी अपेक्षा नाही करत जाऊ दे ना तो निखिल मला काय करायचं त्याच. त्याच आयुष्य तो बघेल काय करायचं. हो ना मग तू पण शांत रहा.

आई ला तिच्या मनातलं समजलं होत म्हणून मुद्दाम तिला हर्ट होण्यासाठी आई म्हणाली,बरे झाले ना निखिल ला कोणीतरी त्याच्या स्वभावा ची मुलगी मिळाली असणार म्हणून तर तो खूश असणार तू त्याचे फोटोज वगैरे बघू नकोस हा श्रुती. अडलय माझं खेटर अस म्हणत रागात श्रुती रूम मधये गेली आज रविवारी होता सो सुट्टी होती. आई ला हसू आवरत नव्हते. तितक्यात श्रुती चे बाबा वॉक वरून परत आले काय झाले श्रुती च्या आई आज सकाळी सकाळी हसताय काय विशेष? तसे आई ने श्रुती च्या वागण्या बाबत बाबांना सांगितले. ते ही खुश झाले म्हणाले पोरीला तिची चूक समजली असेल तर फार बरे होईल निखिल खरच छान मुलगा आहे फक्त आततायीपणा मूळे हे सगळं घडले. अहो पण खरच जर निखिलच्या आयुष्यात दुसरी कोणी आली असेल तर. ? आता ते देवालाच ठाऊक. बाबा म्हणाले. संध्याकाळी सारिका ने श्रुती ला बाहेर फिरायला बोलवले आधी ती तयार होत नवहती पण सारिका ने तिला समजावले मग कुठे श्रुती तयार झाली. दोघी मॉल मध्ये आल्या होत्या. थोडी खरेदी केली मग त्या स्नॅक्स सेंटर कडे गेल्या. खायला आणि कॉफ़ी ची ऑर्डर दिली त्यांनी. आणि श्रुती ने पाहिले तिथेच थोड्या अंतरावर निखिल आणि रश्मी पिझ्झा खात बसले होते एकत्र खात होते. श्रुती चा राग अनावर झाला तिने सारिका ला ते दाखवले .श्रुती चल आपण दूसरी कडे जाऊन बसू. का नाही थांब मी आता लगेच निखिल कडे जाते आणि विचारते हे काय चालयय. श्रुती आर यु मॅड अग कोणत्या अधिकारा ने तू निखिल ला विचारणार आहेस तू कोणी ही लागत नाहीस आता त्याची समजलं उगाच स्वतः चा अपमान करून घेऊ नकोस...

क्रमश....


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama