Sangieta Devkar

Drama Romance

4  

Sangieta Devkar

Drama Romance

कही देर ना हो जाये..(भाग 1)

कही देर ना हो जाये..(भाग 1)

4 mins
447


निखिल ने कार रोड च्या पार्कींग बाजूला पार्क केली. रिस्ट वॉच पाहिले अजून 10,/15 मिनिटे बाकी होती. शहा अँड शहा असोसिएशन चा मॅनेजर त्याच्या सोबत मिटिंग करायला इथे हॉटेल मध्ये येणार होता. तो अजून तिथे आला नवहता. निखिल मग हॉटेल बाहेरच थांबुन त्याची वाट पाहू लागला. तितक्यात त्या मॅनेजर चा कॉल आला, निखिल जी आय एम व्हेरी सॉरी मैं आज आप से मिल नही पावूंगा एक जरुरी काम आया है मगर हमारी एच आर मिस श्रुती आप को मिलने आयेगी ,आप हमारी फाईल स्टडी कर लो. हम बाद मे मिलेंगे. ओके सर नो प्रॉब्लेम म्हणत निखिल ने फोन बंद केला. निखिल सी ए होता त्याची स्वतः ची फर्म होती. परत निखिल ला फोन आला हॅलो तुम्ही निखिल आहात का? मी शहा कडून त्यांची एच आर इथे आलेय तुम्ही कुठे उभे आहात? मी तुम्हाला ओळखत नाही प्लिज सांगा मला नेमके कुठे आहात? निखिल ला हा आवाज श्रुती सारखा वाटला पण त्याने विचार केला नाही आपल्याला भास झाला असेल श्रुती यांच्या कडे जॉब ला नाही आहे. हॅलो मिस्टर निखिल सांगा कुठे आहात असे पुन्हा श्रुती ने विचारले तेव्हा निखिल म्हणाला,मी हॉटेल साईराज च्या दारातच उभा आहे व्हाइट शर्ट आणि जीन्स मी घातली आहे. ओके मी पिच कलर चा कुर्ता घातला आहे . मी येते तिथे म्हणत तिने फोन ठेवला. तिला ही याचा आवाज निखिल सारखा वाटला. पण जाऊ दे म्हणत ती रस्ता क्रॉस करू लागली.ती हॉटेल समोर आली आणि निखिल ला तिने पाहिले तसे त्याने ही तिला पाहिले. हाय निखिल हाय श्रुती तूच शहां कडून आली आहेस का? हो तरी फोन वर मला तुझा आवाज ओळखीचा वाटला. हम्म चल कॉफी घेऊ . ओके म्हणत श्रुती त्याच्या सोबत हॉटेलमध्ये आली. काही खाणार आहे का त्याने विचारले. नको फक्त कॉफी सांग.

तू कधी जॉब चेंज केलास श्रुती? झालं वर्ष होईल आता चांगली ऑफर होती सो जुना जॉब सोडून दिला. तू कसा आहेस निखिल? फाईन ,ऑफिस घर सुरू आहे रुटीन . तु कशी आहेस श्रुती? मी पण छान. तिला पाहून निखिल थोडा अस्वस्थ झाला होता. त्याच प्रेम होती ती त्याची लाईफ त्याच हसणं सार तर श्रुती होती. आज दोन वर्षानी असे समोरा समोर भेटले होते ते.

आज ही तिच्या साठी त्याचा जीव कासावीस होत असे. घरातील प्रत्येक वस्तू तिची आठवण करून देत असे. सगळं होत त्याच्या कडे पण श्रुती नवहती. दोन वर्ष झाले त्यांचा डिओर्स होऊन. काय रे कोणत्या विचारात गुंग आहेस निखिल. श्रुती तुझ्यात काहीच बदल झाला नाही आहे आहे तशीच दिसतेस आज ही. आणि लग्न केलेस का तू? नाही निखिल तू केलेस? नाही . का? कारण माझी श्रुती एकच होती ग दुसरी कोणी असूच शकत नाही. निखिल अजून ही मला मिस करतोस? हो पण तू का नाही केलेस लग्न? नाही करावेसे वाटले. श्रुती मी खूप बदललो आहे ग . माझी काम माझी मी करतो . ऑफिस वरून आल्या वर व्यवस्थित शु रॅक मध्ये शूज ठेवतो,ओला टॉवेल अजिबात बेडवर टाकत नाही. तुला आवडत नव्हते ना सारख मला बोलायचीस आता एकदा परत माझा विचार करून बघ मी आज ही तुझाच आहे ग. हे सगळं निखिल स्वहताच मनात बोलत होता. कॉफी संपली होती.

श्रुती म्हणाली निखिल हे घे फाईल स्टडी कर आणि कळव मग . हा चल निघुया म्हणत निखिल उठला. श्रुती ही त्याला पाहून बेचैन झाली होती पण तसे तिने काही ही दाखवून दिले नाही. ती ही मनात विचार करू लागली निखिल मला ही आता समजले आहे रे की मी उगाच तुला बोलत असे सतत तुझ्या बाबत पझेसिव्ह होत होते. कॉलेज ला असल्या पासून आपण प्रेमात पडलो तेव्हा पासूनच मी खूप पझेसिव्ह होते पण तू कायम समजून घेतलेस मला. नंतर लग्न होऊन सुद्धा मला अनसेक्युर वाटत होत कारण तुझं सर्वांशी मन मोकळे बोलणं. तुझी पर्सनॅलिटी तुझं देखणेपण सगळं मला अनसेक्युर फील करत होत मग त्यामुळे माझी होणारी चिडचिड ,आपले वाद विवाद नंतर नंतर तर तू ही माझ्या वागण्याला वैतागला होतास. तू तरी किती वेळ गप्प राहणार ना. मला माहीत होत की तुझं माझ्या वर जीवापाड प्रेम होत कदाचित आज ही आहे पण मला ते समजलेच नाही रे. एकदा विचारून बघ निखिल की आर यु मिस मि श्रुती. ? चल निघायचे का श्रुती? हो बाय टेक केयर म्हणत दोघे दोन दिशेला निघून गेले. निखिल घरी आला .

आज अचानक श्रुती भेटली त्याच मन उगाच उदास झालं. एकाच शहरात असून ही डिओर्स नंतर ते कधीच भेटले नव्हते. आज योगायोगाने त्यांची भेट झाली.अगदी किरकोळ कारण होत त्यांच्या डिओर्सच!श्रुती चा हेकेखोर पणा,पझेसिव्हनेस,इनसेक्युरिटी कारण निखिल कोणाला ही आवडेल असा होता. खूप समंजस शांत आणि मनमिळाऊ. रोज रोज श्रुती ची कटकट असायची तुझ्या फोटोला अशीच कमेंट का केलीय ,ही कोण मैत्रीण डियर का म्हणते तुला अस बरेच काही. पण निखिल फक्त श्रुती वर प्रेम करायचा. तिचे ही मित्र होते पण त्याच्या बद्दल हा कधीच काही बोलत नसे. त्याच तिला उलट उत्तर न करणं तिला अर्गु न करणं हेच खटकत असे श्रुतीला. नंतर नंतर तर छोट्या छोट्या गोष्टी वरून त्यांचे वाद होऊ लागले. ओला टॉवेल इथेच का टाकलास तुला मॅनर्स नाहीत का असे श्रुती त्याला बोलत असे. शेवटी तो ही त्याचा अपमान नाही सहन करू शकला.


क्रमश....


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama