खिडकीतून दिसणारी आकृती... - भाग 2
खिडकीतून दिसणारी आकृती... - भाग 2
पाठमागच्या भागात आपण पाहिलं की दिव्येशला एका साधूने चेतावणी दिली आणि अचानक गायब झाला.दिव्यशच्या पायाखालची जमीन सरकली होती .अंगावर शहारे उभे राहिले होते आणि सगळं अंग शिवशिवू लागलं होतं .त्याला दरारून घाम फुटला होता . त्याला काही कळायचंच बंद झाल होतं .तो एकदा तिकडे वाड्याकडे तर एकदा साधू बाबा गायब झालेल्या दिशेने पाहत होता . आपण सुट्टीला आलोय पण कसल्या संकटात तर नाही ना सापडणार ? असं त्याला वाटायला लागलं .तो खिन्न मनाने पुन्हा घराकडे वापस आला आणि अंथरुणात पडून राहिला .त्याला कधी झोप लागली समजलंच नाही आणि तो गाढ झोपेत गेला होता . अचानक तो वाड्याच्या गेटच्या आत गेला आणि तो दरवाजा उघडणार तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला
"पोरं लांब हूं ...जाऊ नको तिकड , तुला सांगितलेलं समजत नाही का ? " .त्याने माघे ओळून पाहताच पुन्हा तोच पहिल्यापेक्षा जास्त रागीट चेहरा घेऊन तेच साधू बाबा त्याच्यावर ओरडत होते .यावेळी त्यांचा राग खूपच होता .त्यांनी त्याला हाताला ओढून वाड्याच्या बाहेर आणून सोडल पण त्याला काहीतरी पाठीमाघे आहे असं भासल त्याने माघे पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि आता पुढे पाहिलं तर कोणच साधू बाबा ही गायब .दिव्येश निःशब्दच झाला आणि तो खडबडून जागा झाला.हे त्याला स्वप्न पडलं होतं .तो इतका घाबरून जागा झालाय की आज्जी - आजोबा त्याच्याकडे आले .त्याला ते विचारू लागले की , " काय झालं लेकरा ? ,स्वप्न पाहिलं का ? " त्याला घाम फुटला होता .काही नाही असं म्हणत तो शांत झाला. आजी-आजोबाने त्याला आवरून जेवायला यायला सांगितलं .
तो जेवायला आवरून जेवायला आला पण त्याचं लक्ष काही जेवणाकडे लागतंच नव्हतं .त्याला सारखा साधू बाबा आणि वाड्याचा प्रसंग आठवत होता .कसेबसे घास गिळत त्याने जेवण आटोपलं आणि आजी - आजोबाला त्या वाड्याबद्दल विचारू लागला .
दिव्येश - बाबा ,तो वाडा बंद का बरं ? कोणाचा आहे तो ?
आजोबा त्याच्या या अचानक विचारलेल्या प्रश्नाने गरबडले त्यांना काय बॊलावं तेच सुचेना .तेवढ्यात आजीने मध्यस्ती केली आणि परिस्थिती सांभाळत उत्तर दिल .
आजी - काही नाही रे .कोणी राहत नाही तिथे आणि तिथले लोक गाव सोडून निघून गेले आहेत .म्हणून आता तिकडं कोणी राहत नाही .
दिव्येश - अच्छा .पण तिकडे कोणीच का जात नाही ?
आजोबा - अरे बाळा ,गवत किती वाढलंय तिकङ आणि अडगळ झाली.इचूकाट्याच्या भीतीमुळं नाही जात तिकडं .तू पण नको फिरकत जाऊ तिकडं .
दिव्येश - बरं . नाही जाणार . बाबा इथे गावात कोणी साधू वगैरे आहे का ?
त्याच्या मनात नक्की काय चाललंय आजी - आजोबांना काहीच कळत नव्हतं .असे अचानक विचारलेल्या प्रश्नांनी त्यांना आश्चर्य चकित केल होतं .आजी - आजोबा गरबडून गेले होते ते त्याने अचूक ओळखले होते त्यामुळे काही नाही काही नक्कीच लपवत आहेत आपल्यापासून हे त्याला समजायला वेळ लागला नाही .तो आणखी काही बोलणार तेवढ्यात दारावरची कडी वाजली ." आक्का ऐ आक्का ,काय करती ग ? आणि दिव्या कुठंय ? " हा आवाज ऐकला आणि आजी-आजोबांनी सुटकेचा निश्वास सोडला .तो आवाज मंग्याचा होता .मंग्या म्हणजे मंगेश .तो आणि दिव्येश लहानपणापासूनचे मित्र . त्याला दिव्येश आल्याचं समजताच तो त्याच्या भेटीसाठी आला होता .
आजी - ये रे .आत ये की .
मंग्या - आलो आक्का .कुठंय तो पांढरा बोका ?
आजोबा - तो पांढरा आणि तू काळा बोका .
असं म्हणताच सगळे खळखळून हसले .आता सगळ्यांच्या गप्पा रंगल्या .गप्पांच्या नादात दिव्येश ही वाडा ,साधू बाबा सगळं काही विसरून गेला .त्यांची मैफिल चालूच होती .
(क्रमशः)

