STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Horror

3  

shubham gawade Jadhav

Horror

खिडकीत दिसणारी आकृती... - भाग 1

खिडकीत दिसणारी आकृती... - भाग 1

5 mins
273

        दिव्येश सुट्टीसाठी काही दिवस गावाकडे निघाला होता. सततच्या कामाने तो खूप कंटाळला होता आता त्याला जरा बदलाची गरज होती. मन थोडं शांत करण्यासाठी त्याने गावाकडे ८ दिवसांसाठी जाण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठून बॅग वगैरे भरून तो निघाला. रेल्वे स्टेशनला आला पण त्याच्या गावी जाणारी ट्रेन कधीच निघून गेली होती आता त्याला बसमधला धकाधकीचा प्रवास करावा लागणार होता कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि त्याला आपली एकही सुट्टी गमवायची नव्हती .आता नको असलेला बसचा प्रवास करण्याव्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता .कोकणात वसलेलं छोटेखानी एक गाव .शे-पाचशे लोकसंख्या असलेलं .जवळच एक उंच डोंगर त्याला सापासारखा विळखा घालून डोंगराच्या कुशीत बसलेल्या गावात घुसणार तो रस्ता .आजूबाजूला मखमलीसारखी पसरलेली दाट हिरवळ ,ताडामाडाची आणि नारळांची एकमेकांशी स्पर्धा करणारी झाड आणि स्वागतासाठी पायदळी लाल लाल माती .मनाला नुसता विचार करून शांतता मिळवणारा तो परिसर .आता हा परिसर बदलला असेल का ? किती बदल झाला असेल ? आपले आज्जी - आजोबा खूप थकले असतील असे अनेक प्रश्न मनात साठवत तो कधी बसस्थानकाजवळ पोहोचला त्याला समजलंच नाही .तेवढ्यात कंडक्टर ओरडले " गाडीक्रमांक .१६५२ ,गणेशपूर (काल्पनिक गाव ) चला ."


           त्यांच्या आवाजाने दिव्येश भानावर आला आणि पटकन गाडीत चढला .दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणार दिव्येश आज प्रथमच सुट्टी टाकून गावी निघाला होता त्याने तसे आजी - आजोबाला कळवलेही होते .कंडक्टर ने टिंग टिंग अशी बेल दिली आणि गाडी चालू झाली .गाडी हळूहळू गणेशपूरच्या दिशेने निघाली .त्याला कंटाळवाणा प्रवास कधी संपेल असं झालं होत .त्या कंटाळवाण्या प्रवासात आता त्याला डुकला लागू लागला कधी मान इकडे तर कधी तिकडे आणि मध्येच बस आदळली की डोळे उघडायचे अन सावरून बसायचं असं चालू होत .कधी एकदाच गाव येतंय असं त्याला झाल होत .


           टिंग टिंग असा आवाज झाला आणि एका बस स्टॉपवर गाडी थांबली.आतले दोन तीन माणसं उतरली आणि थोडी गर्दी कमी झाली असं वाटलं की लगेच बाहेरची एक दोन आत चढली मनातली मनात वाटलं काय फरक पडला ? पण त्या एक दोन माणसात एक तरुण युवती चढली .वय दिव्येश इतकच असेल .तिला पाहताच दिव्येशची झोप कुठच्या कुठे पळून गेली.डोळे फाडून तो तिच्याकडे पाहत होता .तिने लाल साडी घातली होती ,केसांमध्ये गजरा माळला होता .त्या गजऱ्यातल्या मोगऱ्यांच्या फुलांच्या सुगंधाने सगळी बस दरवळून गेली असेल असं दिव्येशला वाटू लागलं .दिव्येश अजूनही तिझ्याकडेच पाहत होता .तिझे टपोरे डोळे ,त्यांना काजळ घालून रेखीव केलेलं असावं ,रंग गोरा ,थोडे जरी लाजले तरी गालावर लाली चढेल ,गोऱ्या रंगावर काळी उठून दिसणारी टिकली ,रेखीव कोरल्याप्रमाणे वाटणाऱ्या भुवया,ओठांना लाल लिपस्टिक लावून आणखी उठावदार बनवले होते .इतकी सुंदर गावाकडची मुलगी असू शकती का ? असा प्रश्न दिव्येशला पडला .पण खरी सुंदरता ही गावातच असतें हे त्याला ठाऊक नव्हतं .ती तरुणी एखाद्या लग्नातून आली असं वाटत होत .


           तो तिझ्याकडे पाहत असतानाच ती अगदी त्याच्या समोरच्या सीट येऊन बसली.टिंग टिंग आवाज झाला गाडी चालू झाली .त्या टिंग टिंग बसच्या घंटीच्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याने नजर त्या युवतीवरून बाजूला केली .युवतीही त्याच्याकडेच पाहत होती कारण दिव्येशही तसा देखणाच होता .ती काही क्षणातच दिव्येशच्या मनात घर करून गेली .दिव्येश हळूच अधून मधून तिझ्याकडे पाहू लागला .तीही त्याच्या चोरट्या नजरेला बरोबर पकडत होती .काही करून दिव्यशला शांत बसवेना.त्याने तिच्याशी बोलायचं ठरवलं. तो तसा धाडसीही होता .त्याने लगेच तिला प्रश्न केला ,कुठे जाणार आहात ? त्याचा प्रश्न कानी पडताच तुझ्यासोबत आजुबाजुचेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले जणू त्याचं काही चुकत आहे .पण तिने मात्र लाजून उत्तर दिले गणेशपूर .बास आता दिव्येश तर आनंदाने भारावूनच गेला .कुठे राहता ? काय करता ? असे अनेक प्रश्न विचारले .प्रत्येक प्रश्नासोबत आजूबाजूचे लोक त्याच्याकडे तिरस्काराने बघत होते .जणू तो काही वेडाच आहे .पण ती मात्र त्याला उत्तर देत होती म्हणून तो इतरांना दुर्लक्षित करत होता .कारण त्याला वाटलं इतकी सुंदर स्त्री आपल्यासोबत बोलत आहे म्हणून हे आपल्यावरती जळत आहेत .


           माणसं त्याच्याकडे पाहून एकमेकांच्या कानात कुजबुजत होती .तरीही तो त्यांना दुर्लक्षित करत होता .अचानक कंडक्टर ने बस थांबवली आणि चक्क दिव्येशला खाली उतरवले .त्याचं गाव तिथून अगदी एक दीड किलोमीटर वर राहिले होते .दिव्येश रागारागाने बोलला जळकुडे साले .पाठोपाठ तीही उतरली तसा त्याचा राग गायब झाला.तो मनोमन खूष झाला .आता दोघेही गप्पा मारत गावाकडे निघाले .येणारे जाणारे लोक दिव्येशकडे शंकेच्या नजरेने पाहत होते .दिव्येशला जाणवत होत हे पण त्याला वाटलं ही एवढी सुंदर तरुणी आपल्यासोबत लोकांना वाटतं असेल की दिव्यशने न सांगताच लग्न केल वाटतं .म्हणून लोक असं वागत असतील .बोलता बोलता गाव अगदी जवळ आलं .गावातल्या वेशीजवळच्या हनुमानाच्या मंदिराजवळ येताच ती म्हणाली मला इथूनच जावं लागल माझं घर इकडे आहे .दिव्येश ने तिला बाय बाय केला आणि ती तिझ्या वाटेने निघून गेली .


            तो घरी पोहचला .आजी - आजोबा वाट बघतच होते .थोडावेळ विचारपुस झाली .आपल्या नातवाला खूप दिवसांनी पाहून आजी आजोबांचे डोळे भरून आले . मस्त जेवण बनवलं होत .त्याला हातपाय धुवायला सांगितले आणि सगळे जेवायला बसले .जेवण झालं आणि एका स्वतंत्र खोलीत त्यांची राहायची सोय केली .तो कंटाळला होता तो खोलीत जाऊन अंथरुणात पडला होता पण त्याला ती बस मधली तरुणी काहीकेल्या झोपू देत नव्हती .दिव्येश गालावरती गोड हास्य आणून मनाशीच हसत होता .पण लगेच त्याला आठवलं की लोक आपल्याला कुत्सित नजरेने पाहत होते .जळकुकडे .

त्याला स्वतःचा अभिमान वाटला की ती फक्त आपल्याशीच बोलली .तो मनोमन खूष होता .पण थोडी अस्वस्थता होती त्यात .त्याला थकवा जाणवू लागला आणि थोडा ज्वर ही .तिझ्या आठवणीत तो कधी झोपी गेला त्याला कळलंच नाही .


           दिव्येश सकाळी उठला तेव्हा सूर्य चांगलाच डोक्यावरती आला होता .तो खोलीतून बाहेर आला तस आज्जीने विचारलं ,झोप आली का रे नीट ? दिव्येश ने होकार दर्शविला .कालची मुलगी आठवतच त्याने आवरले आणि तिझ्या शोधात निघाला .जाता जाता त्याच्या घराशेजारी त्याला एक मोठ्ठा वाडा दिसला .चिरेबंदी . त्याला भलमोट्ठ दार आणि तेवढच मोठं कुलूप .जुना झाल्याने समोरून वेली वगैरे भिंतीवरती स्वतःचा हक्क गाजवत होत्या .आजूबाजूला गवत माजलं होत .त्याला त्याचं आकर्षण वाटलं आणि तो त्या वाड्याकडे निघाला .गेट ला हात लावणार तोच पाठीमाघून आवाज आला .पोरा ....तो भारदस्त आवाज ऐकून तो घाबरला .तिकडं जाऊ नकोस .ती जागा चांगली नाही .तिथं अडकला तर आयुष्यभर अडकून राहशील .तिचा मोह आवर .त्याने पाठीमाघे ओळून पहिलं तर त्याला एक अर्धनग्न साधू दिसला .डोक्यवरच्या जटा वाढलेल्या ,हातात कमंडलू आणि एक वेडीवाकडी काठी ,अंगाला भस्म फासलेले .त्याला पाहून दिव्येश घाबरला होता .तो पुढे बोलू लागला ,"तिचा मोह आवर ,तुझे ग्रहमान ठीक नाहीत ,अडकला तर कायम अडकून राहशील ,ती खूप वाईट आहे ,तुझ्यासारख्या तरुणांना स्वतःच्या जाळ्यात ओढते " असं म्हणून त्याने एक तावीज हातात दिले आणि दिव्यशला घालायला दिले .साधू परत बोलला हे स्वतःपासून कधीच वेगळं करू नको .ते तुला प्रत्येक संकटातून वाचवल.परत या वाड्याकडे फिरकू नको .मी पाठीमाघे वाड्याकडे पहिले तर माझी खोलीच्या खिडकीतून त्या वाड्याची खिडकी दिसत होती .मी पुन्हा समोर पाहतो तर काय तो साधू गायब ...माझ्या पायाखालची जमीनच सरकली .तो कुठेच दिसत नव्हता .

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror