Sangieta Devkar

Drama Tragedy

4.7  

Sangieta Devkar

Drama Tragedy

खिडकी

खिडकी

4 mins
574


आज जरा मानसी निवांत होती. रविवार होता सकाळचे मस्त कोवळ ऊन खिड़कीतुन आत आले होते. अगदी प्रसन्न अशी सकाळ होती मानसी ने कॉफी बनवली आणि तिच्या बेडरुम च्या खिड़की जवळ उभी राहिली. सोसायटी च्या बाहेर गार्डन मध्ये अनेक लहान मूल खेळत होती. काही वयस्कर मंडळी गप्पा मारत बसली होती. तर कोणी जॉगिग करत होते. मानसी रोज सकाळी सात लाच ऑफिस साठी बाहेर पडायची त्यामुळे आजूबाजूला काय चाललय याची तिला माहिती नसायची. आज निवांत वेळ होता. म्हणून ती खिड़की जवळ येऊन बाहेर च्या दृश्याचा आनंद घेत होती. सहज च तिचे लक्ष समोरील बिल्डिंगकड़े गेले तिच्या फ्लॅटच्या खिड़की समोरच ती खिड़की होती तिथे एक मुलगा साधारण 15/16 वर्षाचा मुलगा मानसी कडेच पाहत होता. तिला पाहुन हसत होता. काहीतरी हातवारे करत होता. त्याला बघून मानसी ला राग आला.तिचा सगळा मूड खराब झाला तिने झटकन खिड़कीचा पडदा सरकवून टाकला. मानसी सव्हताचे आवरायला निघुन गेली. दुपारी जेवन वैगेरे झाल्यावर ती रूम मध्ये आली. तिला पुन्हा तो सकाळचा मुलगा आठवला तिने पडदा बाजूला केला तर तो मुलगा परत तिथेच त्या खिड़कीत बसलेला आणि मानसी च्या खिड़की कड़े च पाहत होता. रागाने मानसी ने खिड़कीच बंद करून टाकली. सकाळी लवकर उठून ती ऑफिस ला जायला निघाली. घाईत असल्याने तिने खिड़की कड़े लक्ष नाही दिले. संध्याकाळी मानसी घरी आली. तर खिड़की उघड़लेली होती. आई आई अग ही माझ्या रूमची खिड़की का उघड़ली ? मानसी ने आई ला विचारले.मानसी अग रोजच तर खिड़की उघड़ते न मी. सकाळ पासून उघड़ीच असते. नको उघडत जावूस. का काय झाले? आई समोरच्या खिड़कीत एक मुलगा बसलेला असतो त्याच सगळ लक्ष माझ्या रूमकडेच असते काल मी बघितले त्याला. मानसी काल बघितलेस पण म्हणून आज पन तो मुलगा तिथेच असेल असे नाही. मानसी ने समोर पाहिले बघ आई तो मुलगा म्हणत तिने समोर बोट दाखवले. तसा तो मुलगा छान छान असा इशारा हाताने करत होता. हा मानसी म्हणजे रोज हा तुला खिड़कीतुन बघत असतो का? काय माहित आई बघत असेल माझे लक्ष नसायचे कालच पहिल्यादा मि पाहिले.


मानसीने खिड़कीचा पडदा सरकवला. तिने फ्रेश होऊन कपड़े चेंज केले आणि पडदा बाजूला सारला अजुन ही तो मुलगा तिथे खिड़कीतच होता. काय लोक असतात निर्लज्ज. वागन्याचे काही ताळतंत्रच उरला नाही. मानसी सव्हताशी बोलत तिथुन बाहेर आली. रात्री झोपन्या पूर्वी खिड़की बंद करन्या साठी खिड़की जवळ गेली तिने पाहिले तो मुलगा काहीतरी खात तिथेच बसला होता. हद्द झाली या मुलांची इतका लहान असून असे चाळे आणि कायम खिड़कीत बसून इकडेच लक्ष देत असतो त्याच्या घरी जावून त्याला चांगले सुनावले पाहिजे असे मानसी ने ठरवले. दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी ने खिड़की उघड़ली इतक्या सकाळी पण तो मुलगा तिथेच होता आणि चक्क नुसता बरमूडा घालून उघड़ा बसलेला होता मानसी ला बघताच हासुन तो हातवारे करू लागला. रागात मग मानसी ने खिड़की बंद करून टाकली. संध्याकाळी ती घरी आली पन आज तिने आई ला आवर्जून सांगितले होते की खिड़की अजिबात उघड़ी ठेवू नकोस म्हणून ती बंदच होती. पुढचे दोन तीन दिवस मानसी ने खिड़की उघड़लीच नाही. असेच दहा पंधरा दिवसा नन्तर मानसी ने खिड़की उघड़ली आणि काय आश्चर्य तो मुलगा समोर च्या खिड़कीत नव्हता. रिकामी होती ती जागा. मानसी ला बरे वाटले. नन्तर चार दिवस होऊन गेले तरी त्या खिड़कीतिल तो मुलगा मानसी ला पुन्हा दिसला नाही. आज ही रविवार होता मानसी पुन्हा खिड़की जवळ चहा घेवून आली आणि बाहेर बघत राहिली. अचानक समोरच्या खिड़कीत तो मुलगा तिला दिसला. तिला पाहुन हसत होता.हातवारे करत होता.


आता मानसी ला राहवले नाही ती आई ला सांगून त्या समोरच्या बिल्डिंग कड़े गेली. आज त्याला चांगली अद्दल घडवनार असे ठरवून मानसी तिथे गेली. त्या फ्लैट ची बेल वाजवली. एक मध्यम वयीन बाई ने दरवाजा उघडला कोण पाहिजे आपल्याला? तिने मानसी ला विचारले. तुमच्या खिड़कीत जो मुलगा असतो त्याच्याशी मला बोलायचे आहे कुठे आहे तो? तुम्ही आत या असे दारात नका बोलू म्हणत त्या बाई ने मानसीला आत घेतले. कुठे आहे तो मुलगा सतत मला बघत असतो हातवारे करतो. सव्हताच्या वयाचे तरी भान हवे की नको. बोलवा त्याला. तुम्ही बसा प्लीज म्हणत त्या बाईनी मानसी ला बसन्यास सांगितले. तो मुलगा माझा मुलगा आशीष नाव त्यांच्. कुठे आहे तो बोलवा त्याला. मानसी म्हणाली. आता तो नाही येऊ शकणार? म्हणजे मानसी ने विचारले. आशीष वयाने मोठा झाला पन बुद्धि ने लहानच राहिला.तो मतिमंद होता. त्याला चालता येत नव्हते म्हणून तो खिड़कीत बसून असायचा सव्हताचे मन रमवायचा. व्हील चेयर वर बसून कांटाळून जायचा. त्याला आपण काय बोलतो काय करतो हे ही समजत नव्हते. सव्हताला असे बघून ख़ुप मनस्ताप करून घ्यायचा खात पीत नसायचा मग या खिड़कीत बसून बाहेर खेळनारी मुलं, रस्त्यावरच्या गाड्या बघत वेळ घालवायचा. सुटला एकदाचा बिचारा. आता कुठे आहे तो मानसीने विचारले. त्या बाई आशीषच्या आई म्हणाल्या आठवडाभर आजरी होता हॉस्पिटलमध्ये एडमिट होता. चार दिवसापूर्वीच त्याचे निधन झाले. मानसीला हे ऐकूनच धक्का बसला. मानसी घरी आली. तिने आईला आशीषबद्दल सांगितले. मानसी रुममध्ये आली,

खिड़कीजवळ येऊन उभी राहिली. समोरची खिड़की भकास आणि निर्जीव दिसत होती. भयान शांतता तिथे जाणवत होती. काल मानसीला आशीषचा भास झाला होता. राहुन राहुन मानसीचे लक्ष त्या खिड़कीकड़े जात होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama