का रे दुरावा ...
का रे दुरावा ...
सगळं चांगलं चाललेलं असताना माणसं दुरावतात कशी? मुल आईच्या कुशीत व मुशीत वाढत असतं तोपर्यंत सगळं ठीक असतं.स्वार्थाचं बीजारोपण झाले की सगळं कळायला लागतं. अनुवंशिकता व परिस्थिती स्वार्थाला खतपाणी घालते.
लहानपणी जेव्हा मुलगी आईबरोबर टेकडी उतरत असतें, तेव्हा आई म्हणते घाबरू नकोस घसरलीस तरी मी आहे, पण नंतरच्या जीवनात ज्याच्या त्यालाच घसरणं सांभाळावा लागतं. कुणाचे हात तितकेसें कामाला येत नाही. प्रत्येक घसरणं काहीतरी शिकवून जातं. लहानपणीचे घसरणं शारीरिक असतं, मोठेपणीचं घसरणं शारीरिक आणि मानसिक असतं. काळजी वाटणारें म्हणतात काळजी घ्यां, तेंव्हा खरच काळजी वाटते.
माणसे जवळचें भासवतात पण एकमेका पासून खुप दूर असतात. शरीर मिठी मारंत, मन कुठे मिठी मारतं. शरीराचा दुरावा मिटवता येतो पण मनाचा दुरावा मिटवता येत नाही. प्रत्येक वागण्याला जवळीक असते, प्रत्येक वागण्याला दुरावाही असतो. वागाल तरच वाचाल. जसे वागाल तसें वाचाल. वागणं ठरवतं जवळीक की दुरावा.
