Pallavi Udhoji

Drama

3  

Pallavi Udhoji

Drama

जीवन एक रंगमंच

जीवन एक रंगमंच

3 mins
700


”या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..." काल झालेल्या कार्यक्रमात अरूणाने हे गाणं म्हटलं. टाळ्यांचा प्रचंड गडगडाट झाला. कार्यक्रम आटोपल्यावर तिच्याजवळ येऊन प्रत्येकजण तिचं कौतुक करत होता. तिच्या डोळ्यातून गालावरुन अश्रुंचा लोट वाहू लागला. तो ती लपवण्याचा प्रयत्न करत होती आणि चेहर्‍यावर खोटे हसू दाखवत होती.


खरंच आपले जीवन एक रंगभूमी आहे. या धरतीवर प्रत्येकाला एक नाटक करावे लागते. अरुणा मनातून दुखावली होती. आपल्या खऱ्या आयुष्यात आपले दुःख विसरता यावे म्हणून तिने हे गाणे निवडले. संगीत हे असे माध्यम आहे त्यात आपण आपले दुःख विसरून त्यात रमून जातो.


घरी आली. आईने विचारले, तुझा कार्यक्रम कसा झाला?


काही न बोलता आपल्या रुममध्ये गेली. अरुणाला यातून बाहेर कसे काढावे याचा विचार तिची आई करू लागली. उद्या आपण हिला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाऊ हा विचार करून आई आपल्या रूममध्ये झोपायला गेली.


दुसऱ्या दिवशी सकाळचे नऊ वाजले तरी अरुणा अजून कशी उठली नाही म्हणून आई तिच्या रूममध्ये गेली, बघते तर काय अरुणाने आत्महत्या केली होती. हे पाहून तिच्या आईने हंबरडा फोडला. सगळेच सुन्न झाले होते. आईला तिचाच आधार होता. तोच आधार नियतीने हिरावून घेतला.


हे सगळे बघून असं वाटतं की, आयुष्य इतकं स्वस्त आहे का की सहजासहजी संपवावं लागतं? आयुष्य दोन घडीचा डाव असतो. जीवन हा एक संघर्ष आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येणार. हे आयुष्य सावलीचा खेळ आहे. सतत सुख किंवा सतत दुःख असं फार क्वचित आढळतं.


आपल्याला देवाने इतकं सुंदर आयुष्य दिले आहे की, त्या आयुष्यात आपल्याला खूप काही हवं असतं. पण जे हवं असतं ते मिळत नाही. एक उदाहरण म्हणून सांगते, आभाळात चांदण्या असल्या तरी आपल्याला आभाळ रिकामं वाटतं. आयुष्यात आपल्याला त्यापासून आनंद मिळतो त्या गोष्टी कराव्या. असे अनेक आविष्कार आहे, ज्याच्यापासून आपल्याला आनंद मिळेल.


कला, क्रीडा, संगीत, साहित्य, संशोधन क्षेत्रात आवड आहे त्या आवडीनुसार प्रत्येकाने निवडून आनंद घ्यावा. एकदा आपल्याला त्यात आनंद मिळाला की तो आपण दुसऱ्यालाही देऊ शकतो. खरे म्हणजे आपल्या आयुष्यात सगळ्या इतका आनंद दुसरा असूच शकत नाही.

हे मीच आहे आपल्या सुंदर आयुष्यात एखाद्या रंगपंचमी प्रमाणे दुसऱ्याच्या आयुष्यावर रंगाप्रमाणे सुखात क्षण उधळावे हा सोहळा साजरा करावा.


अरुणाप्रमाणे क्षुल्लक कारणाने दुःखी होऊन आपल्या मनातल्या मनात कुढत न बसता आयुष्याचे रंग येऊ द्यावे. संपूर्ण जीवन सुंदर करावे, असं मला वाटतं. त्याचा असा हिशोब करत बसू नये. आयुष्य ही मानवाला लाभलेली एक अनमोल देणगी आहे. त्याचा कसा उपयोग करावा हे ज्याच्या त्याच्या हाती असतं.


आपण काय करतो काही वाईट गोष्टी घडल्या तर त्या चघळत बसतो. समाजात जरा दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला दिसेल आपल्यापेक्षा खूप दुःखी लोक समाजात वावरत आहेत. अरे जो आंधळा आहे त्याचा तुम्ही एक डोळा बनू शकता. त्याला आनंद देऊ शकता. आपला आनंद त्याच्याजवळ वाटू शकता. आयुष्यातल्या सुंदर गोष्टीत त्याच्याजवळ सांगून त्याच्या चेहर्‍यावर हसू आणू शकता. एखादा अपंग असेल तर त्याचा पाय बनून आपल्या आयुष्याचा भाग बनून आनंद देऊ शकता. एखादा अनाथ आहे त्याचे पालकत्व स्वीकारून त्याच्या जीवनात आनंदाची वेळ फुलवू शकता. अशा कितीतरी गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुमच आयुष्य सुंदर करू शकता.


आपलं आयुष्य इतकं सुंदर आहे. या आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला अनुभव येत जाईल. शेवटी जाताजाता काही ओळी सांगव्याशा वाटतात-


"नाही देता आलं धन तरी

देता यावा निर्मळ आनंद

आपलं आयुष्य हे अमूल्य समजून

फुलवत जावं हास्य सारं"


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama