STORYMIRROR

komal Dagade.

Horror Thriller

3  

komal Dagade.

Horror Thriller

#झपाटलेला बंगला....

#झपाटलेला बंगला....

5 mins
378

           मोहन खूप दिवसापासून नवीन घराच्या शोधात होता , कारण त्याची बदली नाशिक हुन मेरठ ला झाली होती . त्याला त्याच्याच कंपनीतल्या मित्राने एक बंगला सुचवला , बंगला खूप मोठl अवाढव्य पुढे पूर्ण गार्डन असा 1करोड चा बंगला फक्त 25 लाखात मिळत होता , तो बंगला पाहताच क्षणी मोहनला खूप आवडला . तसें त्याने त्याच्या बायकोला म्हणजे रागिणी ला सांगीतले . रागिणी ही ऐकून खूप खुश झाली होती, आणि आपल्या मुलांना म्हणजे ईशा आणि वैभव ला ही सांगते मुलं ही खूप खुश होतात. सगळे मिळून सामानाची पॅकिंग करून ठेवतात. मोहन डील पक्की करून लगेच नाशिकला जातो. कारण दुसऱ्यादिवशी त्याला लगेच कामावर बोलवले असते. तोपर्यंत त्याच्या बायकोने सामान पॅक करून ठेवलेले होते. ते लगेच मेरठ जायला निघतात.


          दुपारपर्यंत ते बंगल्यावर पोचतात. बंगला खूप सुंदर आणि अवाढव्य असतो. पुढे बागबगीचे सुंदर फुलांनी नटलेली बाग पाहून सगळेजण भारावून जातात . पण बंगल्याच्या पलीकडे थोडसे पुढे लागूनच सम्शान भूमी असते. त्यामुळे त्याच्या बायकोच्या मनात कोठेतरी पाल कुचकुचती पण ती त्याकडे लक्ष देत नाही. प्रथम सगळं घर साफसफाई करून सगळे सामान नीटनेटके लावून घेतात. तोपर्यत त्यांना संद्याकाळी चे 7वाजलेले समजत नाही.

त्यामुळे ते आज बाहेर जेवायला जाण्याचा प्लांनिंग करतात. सगळे जण आवरून बाहेर जाण्यासाठी निघतात. बाहेर त्यांना एक म्हतारा माणूस थांबलेला दिसतो, तो त्यांना बघून म्हणतो.... खूप मोठी चूक केलीत...! इथे येऊन...., मागारी जा नाहीतर अनर्थ होईल !! सगळेजण खूप घाबरतात. मोहन चा मात्र याकडे अजिबात लक्ष देत नाही , त्याचा अजिबात यावर विश्वास नसतो. जेवण करून 11वाजता सगळे घरी येतात. घरासमोर इशाला एक मेलेल्या माणसासमोर खूप सारी माणसं पांढऱ्या कपड्यांमध्ये बसलेली दिसतात. ती जोरात ओरडते आई ते बघ काय आहे? आई बोलते काही नाही बाळा तुला भास होतोय तिथे काही नाही ! आता मात्र सगळ्यांची पाया खालची जमीन सरकते.


           मोहन पण आता हे विचित्र प्रकार बघून टेन्शन मध्ये असतो. त्याला आता कळते कि का 1करोड चा बंगला फक्त 25 लाखात का विकला गेलाय . संध्याकाळी सगळे जण झोपलेले असतात.

 

           रात्री 2च्या सुमारास ईशा ला मानेपाशी काहीतरी वळवळ होते आणि तिला जाग येते., ती बघते तर एक तुटलेला हात तिची मान दाबण्याचा प्रयत्न करत होता . ती सोडवण्याचा खूप प्रयत्न करते. ती खूप घाबरते जोरात किंचाळते. सगळ्यांना जाग येते. पण तिथे आता तो हात नसतो. तिला आई पाणी पिण्यासाठी देते. ती शांत झालेली असते. पण अजून ती त्याच विचारात असते.


                  सकाळी सगळ्यांना 9 वाजता जाग येते. मोहन आवरून ऑफिस निघून गेलेला असतो. पण तो ऑफिस मध्ये ही त्याचं विचारात असतो. या बंगल्याच्या बाहेर कस पडायचं याचाच विचार तो करत असतो.


ईशा खूप घाबरट असते म्हणून मात्र तिला सारखेच भास होत असतात. कोणीतरी तिच्या बरोबर सारखं असण्याचा भास तिला होत असतो. एक दिवस वैभव आणि इशा अभ्यास करत बसलेले असतात, अचानक इशाच लक्ष खिडकीत जाते तिला कोणीतरी डोकावून पाहत असते, ती बाहेर जाऊन पाहते तर कोणीच नसत. ती खूप घाबरते कोण असेल खिडकीत? या विचाराणे ती खूप घाबरते.


            असे दिवसामागून दिवस जात असतात. रोज काहीनाकाही त्यांच्या बरोबर घटना घडतच असतात. एक दिवस वैभव बॉल बरोबर खेळत होता. तो बॉल खेळता खेळता खूप लांब म्हणजे सम्शानात जाऊन पडतो, तो बॉल घेऊन येतो.पण तेव्हा खूप रात्र झालेली असते.सगळेजण गप्पागोष्टी करत असतात, पण वैभव मात्र झोपाळ्यात बसून राहिलेला असतो, आणि एकसारखं तो पाहत असतो.


            सगळेजण जेवणासाठी उठतात. आई त्याला हाक देते....! वैभव जेवायला ये....! मी जेवलोय असं ओरडून तिला सांगतो. आई त्याची दचकतेचं. आज जेवायला नॉनव्हेज केलेले असते पण आई बघते तर सगळा स्वयंपाक संपलेला असतो, आईला धक्काच बसतो. ते पाहून मोहनला ही आश्चर्य वाटते. वैभव चे हावभाव सगळे बदलले असतात, मधून च हसत असतो,तर मधूनच रडत असतो. त्याचे आई-बाबा ही आता काळजीत असतात.त्या रात्री सगळेजण झोपलेले होतें . वैभव ला रात्री जाग येते, आणि तो इशाचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करत असतो. तिला हातपाय ही हलवता येत नसतात. ती खूप सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण हा काही सोडतच नसतो, त्याच्या अंगात खूप बळ आलेले असते, इशा खूप जोरात ओरडते.आई बाबा...! दोघेही दचकून उठतात, आणि बघतात तर वैभव ईशा च्या अंगावर बसून गळा दाबत असतो. ते धावत जातात आणि सोडवण्याचा प्रयत्न करतात पण तो काही सुटत नसतो. मोहन त्याला जोरात ढकलून देतो तसा तो खाली बेशुद्ध होऊन पडतो, त्यांना मुलाचे असे वागणे बघून काळजी वाटायला लागलेली असते.


              दत्त जयंती असल्यामुळे सर्वजण दत्ताच्या पाया पडण्यासाठी मंदिरात जातात . जसे जसे मंदिर येते तसें तसें वैभव मागे मागे जाऊ लागतो, त्याला हाताला धरून नेण्याचा प्रयत्न करतात पण सगळं व्यर्थ होते. चार माणसांनादेखील तो ऐकत नसतो . हा सगळा विचित्र प्रकार असल्याचा मोहनच्या आता लक्षात आलेला असते. मोहन आता दत्ता च्या मंदिरात जातो तिथे तो एका पुजाऱ्याला सगळे घडलेल्या गोष्टी सांगतो. तेव्हा तो पुजारी म्हणतो खूप मोठी चुकी केलीस ते घर घेऊन आणि त्याला त्या बंगल्या ची कहाणी सांगण्यास सुरुवात करतो.


              खूप वर्षांपूर्वीचा गोष्ट आहे.त्या घरात एक नवरा बायको राहत असतात. घर सुखसमृद्धी ने परिपूर्ण असते. पण त्यांना मुलं होते नसते. नवरा बायकोच एकमेकांवर खूप प्रेम होतं . त्याची आई त्याला दुसरं लग्न करण्यासाठी आग्रह करत होती . पण तो काही केल्या तयार होत नव्हता . सासू सुनेला खूप त्रास देत , सारखी तिला अपशब्द वापरून अपमानित करत.एक दिवस घरात कोणी नसल्याचे बघून सासूने गॅस चालु करून ठेवला. त्या बाहेर निघून गेल्या . इकडे ती अंघोळ करून नुकतेच आलेली, आणि चहा करण्यासाठी गॅस पेटवते तसा स्फोट झाला,आणि ती तिथेच जळून मेली.जेव्हा नवऱ्याला कळाले.तेव्हा नवऱ्याने गळफास लावून घेतला , आणि मुलगा मेलेला पाहून आई वेडी होऊन मरून गेली अशा प्रकारे घर सम्शान झाले.पुजारी सांगत होतें, "तिथे कोणीही सुखाने राहिले नाही, अजूनही तिथे त्यांचे आत्मे फिरत असतात.


पुजारी एक दत्ताचा धागा संपूर्ण कुटूंबाला बाधण्यासाठी देतात . आणि मुलाला लिंबाच्या पानावर झोपवायचे दोन दिवसांनी मी येतो असा तो पुजाऱ्याने त्यांना सांगितले. त्या दिवशी मोहन घरी आला,आणि सगळ्यांना हातात धागा बांधला,आणि मुलालाही हाक दिली,पण मुलगा आला नाही. म्हणून सगळीकडे शोधाशोध चालु होते पण हा कोठेच दिसत नव्हता.. शेवटी तो स्म्शानभूमीकडे पाहण्यासाठी जातो. आणि समोरच तो फुटलेली कवटी, कच्च मांस अधाशीपणे खात बसलेला असतो. त्याचा चेहरा खूपच विचित्र झालेला असतो, ते दृश्य पाहून मोहनची वाचा जाते.


तो घरी खूप जोरात पळत येतो., आणि घडलेला प्रकार बायकोला सांगतो तिला पण धक्काच बसतो. संद्याकाळी वैभव घरात येऊन झोपलेला असतो. तो आला की, त्याला झोपलेल्या अवस्थेत त्याला बांधून लिंबाच्या पाने पसरलेल्या गादिवर झोपवतात. त्यामुळे त्या आत्म्याची शक्ती कमी झालेली असते. दोन दिवसांनी पुजारी येतात, मुलगा झोपलेल्या ठिकाणी लक्ष्मण रेषा काढतात आणि दत्ताचा मंत्र जपायला सुरुवात करतात तसा तो मुलगा खूप जोरात ओरडायला सुरुवात करतो. मी सोडणार नाही तुला...? असा जोराने ओरडत असतो. पण पुजारी मात्र खूप जोराने मंत्र बोलत असतो. नंतर त्याला दत्ताच्या काठीने मारायला सुरुवात करतात. पुजारी ओरडतो, "सोड या मुलाला याने काय बिघडवलाय तुझं...? अशा प्रकारे तो पुजारी दत्ताच्या काठीने खूप मारतो, वैभव आता शांत झालेला असतो. त्याच्या शरीरातून आत्मा निघून जातो.


     आत्मा निघून गेला की पुजारी त्याला दत्ताचा अंगारा आणि हातात दत्ताचा गोफ बांधतो.  मोहन तिथून लगेच जाण्याचा निर्णय घेतो, आणि अशा प्रकारे त्याची फॅमिली सुरक्षित ठिकाणी स्थायिक होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror