हरजीत पर्व नवे (भाग 7)
हरजीत पर्व नवे (भाग 7)
काय इतकं एकटक पाहतेस जान ? काय विचार काय आहे. - सुमित
काही नाही तुझे डोळे पहात होते.
का ग विचित्र आहेत का माझे डोळे?
नाही, सुमित. उलट छान आहेत. तपकिरी गूढ असे हरवून जायला होत तुझ्या डोळ्यां कडे पहाताना . खरच काय?
हो ,सुमित
तिथे मंदिरा जवळ थांब. गणपती मंदीर पाहत ती म्हणाली.
दोघे मंदिरात आले गणपतीचे दर्शन घेऊन निघाले. मतदान केंद्र एका शाळेत होते . लोकांची खूप गर्दी होती. आमदार साहेब म्हणजेच मामा आले होते सेनेचे सगळे कार्यकर्ते होते. सुमित प्रीती तिथे गेले. मतदानाला येणारी लोक मामांना हात मिळवून बोलुन जात होते . मामा ही सगळ्याशी आपुलकीने बोलत होते. तो त्यांचा स्वभावच होता आणि सुमित ही अगदी मामां सारखाच सगळ्यांना सांभाळून घेणारा म्हणूनच प्रीती ही निवडणूक जिंकणार यात दूमत नव्हते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्व मतदान झाले. दोन दिवसांनी निकाल लागणार होता. प्रीतीला घरी सोडून सुमित घरी गेला.
प्रीतीला मोहित चा कॉल आला. हॅलो प्रीती आली का घरी तू. हो मोहित आताच आले. काही नाही सहज केला फोन मतदान व्यवस्थित झाले ना काही अडचण नाही आली ना? नाही मोहित सर्व ठीक झाले. प्रीती मी आणि माझे काही मित्र आम्ही सर्वानी तुलाच वोट केले आहे. ओहह थँक्स मोहित! पण तू तुझ्या पक्षातील उमेदवाराला मत देऊ शकला असता ना? हो पण मला तुला जिंकलेले पहायचे आहे. ओके बघू काय लागतो रिझल्ट आता. तू नक्की जिंकणार नो डाऊट . हम्मम ओके बाय म्हणत तिने फोन ठेवला.
आज सकाळ पासून सगळे सेनेच्या कार्यालयात एकत्र जमले होते आज मतदाना चा निकाल होता. सुमित प्रीती आमदार साहेब,कार्यकर्ते सगळे निकालाची आतुरतेने वाट पहात होते. टि व्ही चालूच होता. कधी विरोधी पक्ष पुढे असायचा तर कधी प्रीती असे चढउतार चालू होते.आता मत मोजणी ची शेवटी ची फेरी सुरू झाली जो तो कान टवकारून निकाल ऐकण्यास सज्ज होता आणि शेवटी लागला निकाल सुमित च्या वार्ड मधून प्रीती भरगोस मतांनी विजयी झाली होती. सुमित ने प्रीती चा हात हातात घेतला अभिनंदन प्रीती ग्रेट !
सगळ्या कार्यकर्त्यांनी एकच तिच्या नावाचा जल्लोष केला. प्रीती नगरसेविका झाली होती. आमदार साहेबांच्या वॉर्ड मध्ये आता सेनेचे ची सत्ता होती. संध्याकाळी प्रीती ची मिरवणूक काढली गुलालात ती न्हाऊन निघाली होती. सुमित तिच्या सोबत होता. तिच्या नावाचा जयघोष करत मिरवणूक निघाली होती. तिच्या घरी आल्यावर मिरवणूक थांबली प्रीती च्या आई ने तिचे औक्षण केले. मग सगळे निघून गेले. फक्त सुमित आणि आमदार साहेब तिच्या घरी थांबले त्यांनी चहा घेतला. तिच्या बाबांना मामा म्हणाले, आम्ही परत लवकरच तुमच्या घरी तुमच्या प्रीतीला मागणी घालायला येणार आहोत. आमच्या सुमित साठी.आई बाबा खुश झाले. बाबा बोलले प्रीती तुमचीच आहे मामा साहेब कधी ही या स्वागत आहे. सुमित प्रीतीला हाताच्या कोपरा ने धक्का देत होता आणि हसत होता . ती त्याच्या कडे डोळे मोठे करून पहात गप बस त्याला म्हणत होती. आणि गालातल्या गालात हसत लाजत होती. चहा घेऊन सुमित आणि मामा निघाले.
बाबा प्रीतीला म्हणाले,बेटा छान झालं तू जिकुंन आली. आणि सुमित तर आम्हाला कधीच पसंत होता. तू खुश आहेस ना? हो बाबा मी येते आवरून माझे म्हणत ती गेली. लगेचच तिला मोहीत चा कॉल आला. हॅलो प्रीती खूप खूप अभिनंदन . मी पण आज खूप आनंदी आहे तू जिंकलीस . थँक्यू मोहीत तुम्हा सगळ्याचे आशीर्वाद पाठीशी होते म्हणून हे शक्य झाले. नाही ग तू खरच लायक होती या पदासाठी आणि तू आहेस पण हुशार. मोहित मला जिकुंन देण्या साठीच तू तुझ्या मिसेस ला माघार घ्यायला लावलीस हो ना?
अरे तसे काही नाही तिला हे जमनार नाही बोलली म्हणून मग मी माघार घे म्हणालो.
मोहित तू किती ही लपवलेस तरी मी तुला आज नाही ओळखत आहे समजलं.
हम्मम बर काळजी घे आणि पुन्हा एकदा अभिनंदन प्रीती.
हो तू ठेव फोन सुमित कॉल करत आहे मला.
तिने सुमित ला कॉल लावला हॅलो बोल ना का करत होतास फोन?
म्हणजे मी फोन करायचा नाही का? आणि किती वेळ एनगेज फोन तुझा.
सुमित मला तसे नव्हते म्हणायचे...आता तुला इथून जाऊन हार्डली 15 मिनिटेच झालीत म्हणून बोलले.
ओके कोणाशी गप्पा सुरू होत्या.
मोहित ने अभिनंदन साठी कॉल केला होता.
वा छान आहे अभिनंदन करायला इतका वेळ बोलावे लागते का?
सुमित तू असे का बोलतो कायम.
मोहित ने काय वाईट केले आहे तुझे आणि for your kind information मोहितने आणि त्याच्या मित्रांनी मलाच वोट केले होते.
अच्छा म्हणून तू निवडुन आली का ?
सुमित तुझ्याशी बोलण्यात अर्थच नाही मी ठेवते फोन.
वेट प्रीती मला इतकच म्हणायचे आहे की हा मोहित का आपल्या दोघांच्या मध्ये सारखा सारखा येतो?
क्रमश..

