komal Dagade.

Drama Classics Inspirational

4.0  

komal Dagade.

Drama Classics Inspirational

हो आहे मला आवड नटण्याची

हो आहे मला आवड नटण्याची

3 mins
214


               नुकतेच नवीन कपल रंजना आणि तिचा नवरा राजेश नवीनच सोसायटी मध्ये राहायला आले होते . रंजनाचं बोलणं, राहणीमान पाहून प्रत्येकजनाला तिच्याशी बोलण्याची इच्छा होत होती. रोज नीटनेटकेपणाने राहायला तिला खूप आवडत.

रोज सकाळी वॉकिंगला जाणारी रंजनाला पाहून मोकळ्या टपऱ्या टाकणाऱ्या बायकांची रोजची ती चर्चेचा विषय होती.


ती मात्र शिस्तप्रिय, हळवी, तेवढीच वागण्यात कठोर होती. बायकांचा रोजचा गलका तिच्याकडेच बघून काहीतरी बोलत. तिला माहित होत,पण ती त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायची. कारण अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ती स्वतःच्या कामाला आणि स्वतःला घडवण्याकडे प्राधान्य देईची.


रंजनाचा नवरा राजेश तेवढाच तिला साथ देणारा. बायकोच व्यवस्थित टापटीपीट राहणं त्याला खूप आवडे. तो ही कधी रंजनाला काही म्हणत नसे.


तिचा खर्च ही काही कमी नव्हता. वेगवेगळ्या प्रकारचं कॉस्मेटिक, त्यात आय लायनर, मस्कारा,फेसिअल चे किट, कॉम्पॅक्ट, हे तिच्या आयुष्यातील अविभाज्य घटक होतें.


साड्यानी आणि वेस्टर्न ड्रेसनी तिचं कपाट भरून गेलं होत.तरी शॉपिंग तिची कधी थांबत नव्हती. महिन्याला नवीन काहींना काही खरेदी तिची असायचीच.ज्वेलरी तर प्रत्येक साडीवर मॅचिंग असायची.


रोज सकाळी वॉकिंगला कल्पना जात. तिचं दिसणे, कपडे घालण्याची अनोखी स्टाईल ती खूप अट्रॅक्टटिव्ह वाटे.तिला ते छान उठूनही दिसें.


सकाळी तिला वॉकिंग करताना पाहून काही बायकांच्या मनातही येई, "का मला असं देवाने बनवले नाही..?


आज राजेशची ऑफिसची पार्टी होती.त्याने तिला आवरून ठेवायला सांगितल. आज ती ब्लॅक कलरचा शॉर्ट वन पिसमध्ये तयार झाली. त्यावर मॅचिंग इअररिंग, ब्रेसलेट.छान मेकअप डोळयांचा केला होता.त्यात तिचे घारे डोळे खूपच सुंदर दिसत होतें , नाकाची उभी दांडी, कलर केलेले केस मोकळे सोडले होतें. तिच्या गोऱ्या वर्णावर सगळं उठून दिसत होत.एखाद्या मॉडेलाही लाजवेल इतकी छान ती दिसत होती.


राजेश तिला बघताच घायाळ झाला. काय सुंदर दिसतेस..! असं त्याच्या तोंडून आपोआप बाहेर पडलं.ती त्याच्याकडे बघून लाजून हसली. दोघे पार्टीला हातात हात घालून गेले. पार्टीतही जो तो तिच्याकडे पाहत होता. राजेशचे मित्र ही त्याच्यासमोर बायकोचे कौतुक करत होतें.


पार्टीत खूप फोटो तिने काढले. सोसिअल मीडियावर टाकायचे ते ती विसरली नाही. छान छान कमेंट वाचताना तिला खूप बरं वाटतं होत. रात्री जेवण करून दोघे घरी आले.


मस्त आवरून ती सकाळी नेहमीप्रमाणे वॉकिंगला गेली. रोजच्या प्रमाणे आजही बायकांचा तिच्या सोसिअल मीडियावरील फोटो पाहून चर्चा होती. आजही तिच्याकडे बघून चर्चेला उधाण आलं होत. वॉकिंग झालं की ती घरी जायला निघाली. तेव्हा त्याच बायकांच्या ग्रुप मधून एक जण बोलत होती.


"काय बाई जमाना आहे...!काय ते नटण, काय ते राहणं, काय तो ड्रेस आजकाल गृहिणीला एवढं शोभत का..? दीडदमडीची कमवायची ना अक्कल आणि नवऱ्याच्या जीवावर किती ती मिजाश..!


"ते बोल ऐकताच रागाने ती लालबुंद झाली. पुढं जाऊन त्या बाईशी बोलू लागली.


"काय हो तुम्हाला काही त्रास आहे का..?मी तुमच्याकडे तर येत नाही ना मागायला..!मला नटायला आवडत. मी नटणार..! मला आवडत तसं मी राहते .माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून मी करते. तुम्ही बोलणाऱ्या कोण..? तुमच्या सुनेकडे बघा..?कशी ती गबाळ्यागत राहते. बहुतेक तुमचेच बुरसटलेले विचारच कारणीभूत आहेत. त्यामुळेच ती मन मारून राहत असेल. त्यामुळेच तिचा आत्मविश्वास कधी दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाही .दुसऱ्याच्या आयुष्यात धवळाढवळ करण्यापेक्षा स्वतःकडे आणि स्वतःच्या घरात लक्ष द्या.


" एवढं बोलून रंजना शांत झाली नव्हती, तुम्ही मला म्हणाला ना गृहिणी तर ऐका मी एक CA आहे. कमवती होतें. पण मला घर सांभाळायला आवडतं म्हणून मी घरी थांबते. कोणी सांगितलंय का असं की गृहिणीने मन मारून राहायच. नटायचं नाही म्हणून..!माझा नवऱ्याला आवडत ते मी करते.? तुम्ही परत मी कसं राहायचं सांगू नका....?


रंजना रागानेच तिथून निघून गेली. बाकीच्या बायकांही उठून निघून गेल्या शेजारच्या साधना काकूंना खूप अपमानित वाटत होत. त्या विचार करतच त्या ठिकाणी बसुन राहिल्या.


दुसऱ्या दिवशी रंजनाला ना कालच्या बायका दिसल्या, ना त्यांचा घोळका. ह्याची त्याची मापं काढणाऱ्या बहुतेक तिचं ऐकून सुधारल्या होत्या.


"गृहिणी आहे म्हणून काय झालं तिलाच का प्रत्येक वेळी बंधने...! स्वतः कमवती नसेल तरी, तीला छान राहण्याचा अधिकार आहे.तिलाही तिच्या मनासारख जगायचा अधिकार आहेच ना....!तिलाही मनासारखं जगू द्या. तिलाही आकाशात स्वछंदी विहार करुद्या.


कथा काल्पनिक आहे, आवडल्यास लाईक, शेयर, नक्की करा. तुमचा अभिप्राय मोलाचा आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama