हँग ओव्हर (भाग 7)
हँग ओव्हर (भाग 7)


रात्र होत आली होती अचानक काहीतरी तोड़फोड़ झाल्याचा आवाज ऐकू आला. तसे मीटिंग मधले सर्वजन बाहेर आले पाहता तर काय कोणी तरी मोहितच्या कार ची तोड़फोड़ केली होती. मागची पुढची काच फोड़ली होती .तिथे पार्किंग ला कोणी वॉचमन नव्हता म्हणून हे करायचे धाडस त्या लोकांनी केले होते. सगळे जन चर्चा करू लागले की हे कोनाचे काम असेल ? मोहित म्हणाला,मला पन माहित नाही मी पोलीस चौकिला कळवतो. मोहितने अजय ला कॉल करून झाला प्रकार सांगितला. अजय म्हणाला कोणी ही कार ला हात लावू नका. आम्ही येतो. थोड्या वेळात अजय दोन पोलिसांना घेवून आला कार चा पंचनामा करने गरजेचे होते, काही पुरावे मिळतात का पाहने गरजेचे होते. मोहित म्हणाला, अजय जो मला कॉल करतो ना त्याचेच हे काम असावे शंभर टक्के. हो मला ही तसाच डाउट आहे अजय म्हणाला. ही बातमी मितुला तिच्या ऑफिस मधून समजली पत्रकाराना ही खबर देणारे ख़बरी असतातच .
मीतु ने लगेच मोहित ला कॉल लावला, मोहित तू कुठे आहेस आणि कसा आहेस? मि ठीक आहे डोन्ट वरि जान. मोहित तू कार मध्ये नव्हतास ना? नाही माझी मिटिंग सुरु होती तेव्हा तोड़फोड़ चा आवाज झाला म्हणून आम्ही बाहेर आलो तर माझी कार फोड़ली होती. मोहित पन आज तू नव्हता कार मध्ये पण तुजया मागे ते लोक नसतील कशा वरुन ? ते तुला माघार घे म्हणून धमकी देतात ना उदया तुला काही केले तर.? मोहित आय एम सो मच वरीड अबाउट यू. असे म्हणत मीतु फोन वरच रडू लागली. अरे मीतु रडू नको यार मला काही होत नाही. अजय आला आहे इथे प्लीज तू रडू नको. मोहित तू कुठे आहेस मी येते तिथे मला भेटायचे तुला . मी ठीक आहे मला काही झालेले नाही. ओके तू नको मी लगेच येतो तुझ्या कड़े . हा म्हणत तिने फोन ठेवला. मोहित अजय सोबत जाऊन पोलिस चौकीत कंपलेंट देऊन आला. अजय म्हणाला मोहित आज तू थोडक्यात वाचला आहेस तुझ्या वर पण अटॅक होऊ शकतो मला वाटते तू तुझ्या सोबत बॉडीगार्ड कायम ठेव या निवडणुका होई पर्यंत. ओके अजय तू म्हणतो तसे आणि रिओल्वर पण आहे माज्या कडे विथ लायसन्स. हा ठीक आहे मग बट बी केयरफुल मोहित. हा अजय. मोहित तिथून लगेच मितु कडे आला. दारातच त्याला पाहून तिने मीठी मारली आणि रडू लागली. त्याने दरवाजा बंद केला . अरे जान मला काही ही झाले नाही रडू नको तू . मोहित पण विचार कर ना कार मध्ये तू असतास तर आय कान्ट इम्याजीन . मोहित ने तिचे डोळे पुसले म्हणाला, बस इथे तू हे बघ मला काही होत नाही मी इतका लेचापेचा नाही. हो माहीत आहे तू किती धाडसी आहेस ते पण मला भीती वाटते. अरे अजून भित्री भागू बाई तू पुण्याची आता हाफ कोल्हापूर ची झाली ना मग. मोहित मसकरी कशी काय सुचू शकते तुला ती रागात बोलली. अरे बर आय एम सॉरी जान म्हणत त्याने कान पकड़ले. हे बघ मीतु उदया पासून माझ्या सोबत एक बॉडीगार्ड असेल सो तू काही ही काळजी करू नकोस. खरच मोहित खर सांगतो न तू. हो ग राणी मी अजय ला भेटून च आलो आता. मोहित तू मला हवा आहेस मला खुप काळजी वाटतेय तुझी म्हणत मीतु ने पुन्हा त्याला घट्ट मीठी मारली. त्याने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला म्हणाला, नको इतकी काळजी करू काही ही होणार नाही मला. अजय लवकरच त्या माणसाला शोधून काढेल मग सगळ ठीक होईल. तिचा चेहरा हातात धरून म्हणाला, तू अशी रडू लागलीस तर मग माझे काय होईल मी कसा स्ट्रॉन्ग राहणार मग सांग? यू आर माय जान मीतु . मोहित नाही रडनार मी आता. नक्की देन गिव्ह मि अ स्वीट स्माइल . मीतु हसत त्यांच्या कड़े पाहत होती. अजुन एक मीतु तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? असे का विचारतो तू मोहित मि कधी अविश्वास दाखवला आहे का तुज़या वर. तसे नाही जान कोणती परिस्थिति कशी असेल किवा येईल आपल्याला ते माहित नाही. आता या निवडणूका होई पर्यंत काय होईल काही माहित नाही . यात तुझा माझ्या वरचा विश्वास खुप महत्वाचा असणार आहे . मोहित आय ऑलवेजस् ट्रस्ट यू . आणि मि कायम तुझ्या सोबत असेंन . ओके आता रात्र खुप झाली तू झोप मी निघतो. पन मोहित तू जाणार कसा ? कार नाही तुझ्या कड़े. अजिंक्य ला बोलवतो का? मोहित विचार करू लागतो इतक्यात अजय चा कॉल येतो. हेलो मोहित कुठे आहेस तू. मोहित -- मि मैथिली च्या घरी आहे. काय झाले? अजय -- मोहित आता तसा पन लेट झाला आहे तू राहतो एक तर आउट साइड ला तुझ्या कड़े गाड़ी पन नाही मला वाटते आज ची रात्र तू मैथिली कडेच थाम्ब . तसे ही आता तू बाहेर पडून रिस्क घेणे ठीक नाही. जर ते लोक तुझ्या मागा वर असतील तर ? ओके अजय तू म्हणतो तसे करतो. तो फोन ठेवतो.
क्रमश...