The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Sangieta Devkar

Drama Romance

4.3  

Sangieta Devkar

Drama Romance

हँग ओव्हर (भाग 11..अंतिम)

हँग ओव्हर (भाग 11..अंतिम)

8 mins
24.2K


दुपार नंतर मोहित ला कॉल आला आता इतकी बदनामी झाली तर माघार घे नाहीतर लोक तोंडावर तुला हारवतील . असे काहीसे तो फोन करणारा बोलत होता . मोहित ने त्याच्याशी बोलत बोलत त्या फोन नंबर चा स्क्रीन शॉट काढून विक्रांत ला सेंड केला . विक्रांत ने तो नंबर लगेच सायबर सेल कडे पाठवला आणि फोन कुठून आला ते लोकेशन लगेच पाठवायला सांगितले . लोकेशन आले कडमवाडी ते गांधीनगर या दरम्यान हाय वे वरचा टेलिफोन बूथ दाखवले. विक्रांत त्या भागाच्या आसपासच होता लगेचच त्या बूथ जवळ आला.एक छोटेसे हाय वे वरचे ते हॉटेल होते त्याच्या बाजूलाच टेलिफोन बूथ होता. मात्र तिथे फोन करताना कोणी नव्हत. विक्रांतने त्या बूथ मालका ला विचारले की आता पाच मिनिटां पूर्वी इथून कोणी कॉल केला. तसा तो मालक म्हणाला,माहीत नाही कोणी केला माझे लक्ष नव्हते. विक्रांत ला माहीत होते की अशा लोकांशी कोणत्या भाषेत बोलायचे . विक्रांत ने आपले आय कार्ड त्या माणसाला दाखवले म्हणाला,मी सायबर क्राईम चा इन्स्पेक्टर आहे सांग कोणी कॉल केलेला नाहीतर तुला मला उचलून न्यावे लागेल. तसा तो पोपटा सारखा बोलू लागला. साहेब ते उमेश आला होता फोन करायला . या आधी पण 2 वेळा आलेला. कोण उमेश कुठे राहतो . उमेश राऊत इथंच राहतो कडमवाडीत . पूर्ण पत्ता सांग मग त्या माणसाने उमेश चा पत्ता विक्रांत ला सांगितला. विक्रांत लगेचच त्या पत्यावर पोहचला. पण तो घरात नव्हता. गावात गेला होता .

गावात चौकात 4/ 5 मुले गप्पा मारत उभी होती. तिथल्याच एका माणसाला विक्रांत ने उमेश कोण हे विचारले. त्या मुलांच्या घोळकयात निळा टी शर्ट घातलेला उमेश होता. विक्रांत ने त्याच्या मागून जात त्याला पकडले म्हणाला ,अजिबात पळायचा प्रयत्न करू नकोस मी विक्रांत सायबर पोलिस. आणि त्याने उमेश ला आपल्या कार जवळ आणले आणि आत बसवले. उमेश म्हणाला,अहो साहेब मला का पकडले आहे तुम्ही काय केले आहे मी. चल सांगतो म्हणत विक्रांत ने कार सुरू केली आणि हाय वे वर आला एका बाजूला कार थांबवली . उमेश राऊत ना तू ? हो साहेब . तू मोहित देशमुख ला फोन करून धमकी का देत होतास? त्याचा तुझा काय संबंध ? नाही साहेब मी नाही कोणाला फोन केला. हे बघ उमेश मला सगळं माहीत झालं आहे माझ्याकडे तू केलेले फोन चे डिटेलस पण आहेत आणि 2 दिवसा पूर्वी मोहित बरोबर हॉटेल मध्ये तू काय डाव केलास ते सुद्धा माहीत आहे मी मोहित चा एकदम जवळ चा मित्र आहे तू बऱ्या बोलाने सगळं कबूल कर नाहीतर इथेच तुला शूट करायला मला वेळ नाही लागणार तसे पण या हाय वे वर कोणाला काही समजणार पण नाही. बघ ठरव तू नाहीतर आहेच मग 10 वर्ष तुरुंगात खडी फोडायला जा. तू नाही बोललास तरी सोनल ने सगळं कबूल केले आहे आणि ती माफी चा साक्षीदार होणार आहे ती आता आमच्या ताब्यात आहे. आता उमेश पूर्णपणे विक्रांत च्या जाळ्यात अडकला. साहेब मी खर खर सांगितले तर मला पण शिक्षा माफ होईल काय? हो नक्कीच सांग खर खर.मग उमेश ने हे काम कोणाच्या सांगण्यावरुन आणि का केले हे सांगितले . सोनल ला त्या रात्री उमेश ने पळवले होते आणि एका फार्म हॉउस वर तिला ठेवले होते सेफली. विक्रांत म्हणाला आता हे जे तू मला सांगितलेस ते सगळ मोहित आणि पोलिसां समोर सांगायचे तरच तुझी सुटका होईल . उमेश खुप घाबरला होता सो तो सगळ कबूल करायला तयार झाला. विक्रांत ने अजय ला कॉल केला आणि अशा अशा ठिकाणी एक फार्म हॉउस आहे तिथे जावून ताबड़तोड़ सोनल ला अटक कर असे सांगितले. आणि तिला व दोन पोलिसांना सोबत घेवून मोहित च्यां घरी यायला सांगितले तसेच मितुला ही मेसेज केला की लगेचच मोहित कड़े ये गुन्हेगार सापडला आहे. विक्रांत ने दिलेल्या पत्यावर अजय ने धाड़ टाकली आणि तिथे असणाऱ्या लोकांना अटक केली त्या लोकांना चौकीत पाठवून फक्त सोनल ला आपल्या सोबत घेवून तो मोहित कड़े आला. दहा मिनीटात विक्रांत तिथे उमेश ला घेऊन पोहचला मीतु पन आली होती. उमेश ला बघुन मोहित म्हणाला,अरे उमेश तू ? मोहित तुम्ही दोघ एकमेकांना ओळखता का? हा अजय आम्ही एकाच कॉलेज मध्ये होतो सोनल सुद्धा. मोहित म्हणाला. विक्रांत ने उमेश च्यां कॉलर ला पकड़ले म्हणाला,मला जे सांगितलेस ते सांग आता. सांगतो साहेब म्हणत उमेश बोलू लागला. मि मोहित सोनल एकाच कॉलेज मध्ये होतो. मोहित दिसायला स्मार्ट,अभ्यासात पन हुशार म्हणून सगळेजन विद्यार्थी शिक्षक त्याचेच कौतुक करायचे मूली तर त्याच्या मागे मागे करायच्या इतके कमी होते की काय मोहित बास्केटबॉल मध्ये ही चैंपियन होता त्याच्या मुळे कॉलेज ला भरपूर बक्षीसे मिळायची. मि ही बास्केटबॉल खेळायचो पन मोहित चे पारडे कायमच भारी असायचे. त्याच्या मुळे आमच्या सारख्या मुलां सोबत कोणतीच मुलगी बोलत नसे यामुळे मोहित कायम डोक्यात जायचा माझ्या. त्याचा द्वेष करायचो मी. माझ्या कड़े पन पैसा होता पॉवर होती पन किंमत कोण देत नव्हते कारण मोहित तो पैसेवाला श्रीमंत आमदारांचा मुलगा असून ही त्याला कशाचा गर्व नव्हता. यामुळे तो कॉलेज मध्ये फेमस होता हा राग कायम माझ्या मनात होता. याचा काटा एक ना एक दिवस मी काढ़नार असे ठरवले..

कॉलेज संपले पन मोहित बद्दल चा राग मनात होता जेव्हा मला हे समजले की रावसाहेब पाटिल आणि मोहित देशमुख यांचे राजकारना मुळे वैर आहे तेव्हा मला आयती संधीच मिळाली मी रावसाहेबाना भेटलो आणि त्याच्या साठी काम करण्याची तयारी दाखवली. आता मोहित आमदारकी साठी उभा राहणार हे समजले तसे त्याला बदनाम कसे करायचे,लोकांच्या नजरेतुन त्याला कसे खाली पाडायचे याचा च प्लान मी बनवत होतो. मला ही गोष्ट माहित होती की सोनल मोहित वर प्रेम करायची कॉलेज मध्ये असतानाच पण मोहित ने तिला भाव दिला नाही. तिचा अपमान केला होता एकदा त्याचा राग तिच्या मनात होता. मग जेव्हा राव साहेब म्हणाले की या मोहित देशमुख च काहितरी केले पाहिजे नाहीतर आमची हार नक्की आहे. मग मीच हा सगळा प्लॅन बनवला . सोनल ला फेसबुकवर शोधले आणि तिच्याशी कॉन्टॅक्ट केला तिला ही मोहित ने केलेल्या अपमाना चा बदला घ्यायचा होता म्हणून ती माझ्या प्लॅन मध्ये सामील झाली. मग मीच मोहित ला फोन करून धमकी देत होतो पण तो काही बधत नवहता मग विचार केला की याला आता बदनामच करायचे खूप मिरवतो हा लोकांमध्ये याची नाचक्की करायची . जेव्हा मला त्या मिटिंग बद्दल समजले तेव्हा सोनल सोबत मी हा डाव रचला. मीच दोघाचे फोटो काढले. हॉटेलमधील वेटर ला हाताशी धरून त्याला पैसे देऊन मोहितच्या कॉफी मध्ये गुंगीचे औषध टाकले. . त्यांनतर मी तिथून निघून गेलो कारण सोनल म्हणाली आता या पुढे काय आणि कसे करायचे हे मी पाहते तू फक्त वेळेत इथे ये आणि मला घेऊन जा. विक्रांत म्हणाला, सोनल मॅडम आता तुम्ही सांगा पुढे काय घडलं. आणि हे सगळं बोलणं अजय रेकॉर्ड करत होता आणि एक पोलिस लिहून घेत होता. सोनल बोलू लागली . उमेश हॉटेल मधून निघून गेला मग मी आणि मोहित कॉफी घेत होतो त्यांनतर मोहित ला गुंगी येऊ लागली मी त्याला त्याच हॉटेल च्या रुम मध्ये घेऊन गेले . त्याचा शर्ट काढला . मोहित आता पूर्ण बेशुद्धावस्थेत होता. मला फक्त ड्रामा करायचा होता की मोहित आणि मी एकत्र रुम मध्ये होतो. आणि मोहितने माझा गैरफायदा घेतला. मोहित 2 तास बेशुद्ध होता मी फक्त तिथे बसून होते मोहीत ने माज्या अंगाला स्पर्श देखील केला नाही. तसेच मी ही त्याला स्पर्श केला नाही. फक्त त्याला बदनाम करायचे म्हणूनच हा डाव आखला आणि मोहित त्यात अडकला. आय एम सॉरी मोहित . अजय म्हणाला,आता तुम्ही दोघांनी हे सगळं कोर्टा समोर सांगायचे आणि कॉन्स्टेबल ला म्हणाला घेऊन जा रे यांना. मोहित ने विक्रांत ला मिठी मारली म्हणाला, विक्रांत कसे आभार मानू तुझे खूप काही केलेस तू माझ्या साठी. इट्स ओके मोहित अजय थँक् यु सो मच भावा म्हणत त्याला ही मिठी मारली. बाबा म्हणाले अखेर सत्य हे सत्य असत ते लपून राहत नाही. सत्याचा आणि चांगुलपणाचा विजय हा होतोच. काय मित्या खुश ना आता विक्रांत मितु ला म्हणाला. हो विक खूप खुश आहे मी. तसा मोहीत मितु कडे आला तिचा हात हातात घेत म्हणाला,थँक यु मितु माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. आई साहेब म्हणाल्या थांबा मी काहीतरी गोड आणते सर्वां साठी . किचन मध्ये गेल्या त्या आणि देवा समोर साखर ठेवली. मिठाई घेऊन बाहेर आल्या. तोपर्यंत मीना ने सर्वाना चहा नाष्टा आणला. विक्रांत ने कसे उमेश ला पकडले हे सविस्तर सांगितले. सगळं छान मूड मध्ये गप्पा मारत नाष्टा करू लागले. मोहित खूप रिलॅक्स फील करत होता. त्याच्या मनावरचे खूप मोठे ओझे आता दूर झाले होते. बाबा म्हणाले,सुनबाई तुमच्या आई बाबा ना बोलवून घ्या लग्नाची बोलणी करून टाकू लवकरात लवकर. हो बाबा मितु म्हणाली. अजय पोलिस चौकी ला निघून गेला. विक्रांत म्हणाला,मोहित मी ही आता निघेन पुण्याला . नो नो विक्रांत आज मी तुला ट्रीट देणार पार्टी करू मग जा उद्या. हो विक्रांत थांब आजचा दिवस मितु ही म्हणाली. बर थांबतो तो म्हणाला. रात्री मोहित मीतूला पीक अप करायला आला. मितु ही आज खूप छान दिसत होती तिच्या मनावरच टेंशन दूर झालं होत. खूप खुश होती. मोहित ला पाहून घट्ट मिठी मारली. मोहीत खूप मोठं संकट टळले आपल्या वरचे . हो स्वीटू आता कुठे निवांत श्वास घेतोय अस वाटतयं. विक्रांत अजय यांच्या मळे यातून बाहेर पडलो मी. आता बस लवकर तू माझी हो कायमची अजून काही नको मग. मितु म्हणाली हो म्हयु मी फक्त आणि फक्त तुझी आहे कायमची.. मोहित ने तिचे दीर्घ चुंबन घेतले. चल विक्रांत पोहोचेल हॉटेलमध्ये. ते दोघे हॉटेल सयाजी ला आले. पाच मिनिटात विक्रांत ही आला.तिघांनी मस्त डिनर केले. मितु ने तिच्या घरी कळवले मोहित निर्दोष आहे हे सांगितले.ते लवकरच कोल्हापूर ला येतो म्हणाले.विक्रांत दुसऱ्या दिवशी पुण्याला गेला. मोहीत ने दावा दाखल केला होता तो निकाल त्याच्या बाजूने लागला. उमेश सोनल ने त्यांचा गुन्हा कबूल केला. मोहित ची इज्जत प्रतिष्ठा याला आजिबात धक्का लागला नाही उलट त्याचा सन्मान अजून वाढला. साहजिकच त्यांच्या भागात मोहीत आमदार म्हणून निवडून आला. मितु चे आई बाबा कोल्हापूर ला आले ते मोहीत च्या घरी आले. लग्नाची तारीख काढली . मोहीत चे खूप स्नेही,मित्र नातेवाईक सगळे कोल्हापूर मध्ये असल्या मुळे लग्न कोल्हापूर लाच करण्याचे ठरले. मितु च्या नातेवाईकांचे मानपान हे त्यांचे त्यांनी करावे आणि मोहीतच्या पाहुण्यांचे त्यांचे त्यांनी करायचे असे ठरले. अर्थातच लग्नाचा सगळा खर्च मोहीतच करणार असा त्याचा हट्ट होता त्या पुढे मितु च्या आई बाबांचे काहीच चालले नाही. कोल्हापूर ला एका मोठ्या भव्य ग्राऊंडवर लग्नाचा मंडप उभा केला होता अगदी शाही थाटात मितु मोहीत चे लग्न झाले. मितु चे आई बाबा खूप खुश होते की त्यांना इतका चांगला जावई मिळाला . मितु तर सातवे आसमान पर होती . लग्न झाले आता दोघ हनीमुन ला जाणार आहेत सिंगापूर थायलंड ला.. त्या दोघाना खूप खूप शुभेच्छा आणि कथा इथेच संपवते. तुम्हा सर्वाना आवडली का ही मोहित मितु ची कथा? जरूर कमेंट करा.. कथा लाईक आणि शेयर करायला विसरू नका.. धन्यवाद..


*All rights rests with the writer. Any kind of copying will result in legal consequences. 

         

         

         


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama