Raj Mohite

Comedy

3  

Raj Mohite

Comedy

हळद - Comedy Part.

हळद - Comedy Part.

4 mins
374


आता मित्राने आमंत्रण दिले म्हणजे लग्नाला जाणे गरजेचे होते. पकडली ट्रेन आणि सरळ मालवण.

त्याने दिलेल्या पत्त्यावर योग्य त्या वेळी पोहचलो. आधीच त्याचा तगादा काही झाले तरी हळदीला पोहच. आता आपल्याला बुवा नाच गाणे नाही जमत आगदी अंगावर कुणी खाजेची पावडर टाकली तरी आपण नाचणे कठीण.

तरी त्याच्या मैत्री खातर पोहचलो हळदीच्या दिवशी.

सकाळी जेमतेम १२.३० ला दुपारी त्याच्या गावी पोहचलो. त्याने आधीच एका त्याच्या नातेवाईकाला पाठविले होते मला स्टेशन हून न्यायला. अगदी थोडा का होईना माझ्या उपस्थितीने त्याच्या जीवात जीव आला होता.

तसा ही एकटाच पडला होता नवरदेव त्याची अवस्था अगदी खाटकाच्या दोरीला बांधलेल्या बकऱ्या सारखी होती. मला पाहून थोडासा तोही वाघ झाला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

स्वागत तर अगदी मस्त झाले माझे मांडवाच्या शेजारीच लहान कारटयांनी अंबा खावून साळी टाकल्या होत्या. त्यावरून पाय घसरून दांनदिशी आपटलो. मायला हापूस आंब्याचा भाव कसा घसरावा तसा लांब पर्यंत बुटाचा पाय घसरला.

मंडपात एकच हश्या पिकाला.

त्या पुढे आजुन एक फजिती ऐका.

हाथ भरलेले कपडे खराब आधी त्याला म्हटले.

" बाकी राहूदे मला आधी आंघोळीला जाऊदे" त्याने मला दुरून घराच्या बाजूचा बाथरूम दाखविला.

बॅग मधून कपडे टॉवेल सर्व घेवून निघालो आंघोळीला

आधीच फजिती झालेली मूड खराब बाथरूम चा दरवाजा ढकलला.

*हरामखोर, नालायक, हलकट "

नको नको त्या शिव्या ऐकल्या आधी मित्राला आवाज दिला

" बाबा हे आधी काय ते बघ माझी चुकी नसताना "

त्या बाथरूम मध्ये त्याच्या मामाची मुलगी अंघोळ करत होती.

मित्र तिला समजावू लागला

" सानिका त्याची काही चुकी नाही मीच त्याला पाठविले.

बिचारा आल्या आल्या पडला कपडे खराब झाले होते त्याचे

त्याला काय माहीत आत कुणी आहे का नाही.

येवढे बोलून त्याने समजुत काढली तिची.

आणि निघून गेला. ती बाहेर आल्यावर माझे डोके पण सुपीक चुकून बोलून गेलो.

sorry मला नॉक करून यायला हवे होते पण खरेच मी काही पाहिले नाही आत काळोख होता.

" अच्छा काळोख होता मग लाईट लावून दाखवू का?????

शेवटी सानिका पुन्या हुन आली होती मस्त पुणेरी शब्दात सूनाविले.

" तुझा गैरसमज होतोय मला असे म्हणायचे न्हवते."

मी समजुत काढली.

" मी मुंबईच्या सर्व टपोरी भाषेला चांगली ओळखते"

तुम्ही मुंबई वाले बोलता एक आणि तुमचा अर्थ एक असतो. बोलता भजी नजर वडापाव वर...!

असे टपोरी मी खूप बघितलेत मुंबईचे. मी पण पुण्याची आहे कमी नको समजू... बोलत पाय आपटत गेली.

आता माझ्या साधे पणाचा तिने मस्त रेप केला होता.

तुम्ही सांगा हयात शहर प्रांत वाद येतो कुठून ????

अंघोळ झाली मित्राने एक एक करून सर्वांची ओळख करून दिली. ओळख करून देताना सर्वच हसत होते.

आल्या आल्या मांडव मोडला होता दांनदिशी आपटून त्याची खिल्ली उडवत होते. इतका हशा निवडणुकीत पडलेल्या उमेदवारांची होत नसेल.

ज्या वेळी सानिकाचा नंबर आला

"ही सानिका माझ्या मामाची मुलगी पुण्याला असते"

law करतेय.

" हो युक्तिवाद पहिला मी मगाशी"

काय म्हणालात ?????

भेट म्हटले झाली मगाशी जरा सारवा सारव केली.

"कान आहेत मला वकील आहे न्यायाधीश नाही"???

मित्राने पण समजावून सांगितले

"बाबा जरा जपून त्या अंबाबाई पासून "

पण हळदी ते लग्न आमची टक्कर होत राहिली.

मी खरेच असे लग्न कधीच पाहिले न्हवते. त्या घरात नाही तरी १०० ते १२५ माणसे असतील. लहान मुले पाहून तर तो मांडव सर्कसचा तंबुच वाटत होता. सर्व घर भर मुले.

अंघोळ झाली आता वाट चहा आणि नाष्टाची सर्वात उशिरा मीच पोहचलो होतो तर एकटाच बाकी चहाचा

अलगत हातात चहाचा trey घेवून दुश्मनच चहा घेवून येत होता.

सानिका टोमणा मारत

" चहा घ्या दमला असाल ना प्रवासात???

" हो खूप पण इथे आलो अंघोळी अगोदर सूर्य दर्शनाने सर्व थकवा निघून गेला"

गप्प चहा देवून निघून गेली. मी त्या चहाच्या कपा कडे पाहत बसलो ६ इंच कप पूर्ण भरलेला पण त्यात चहा एक इंच पण नसेल. मी म्हटले मालवण कराना हा कप भेटला तरी कुठे????

मुंबईची सवय पाहिला चहा एक ग्लास भरून पिण्याची. जेवणाची वेळ त्यात दिलेले कांदा पोहे जेवण समजूनच खाल्ले.

मित्र आपल्या रिती रिवाज लग्न घाई मधे व्यस्त. आता नवखे गाव जाणार तरी कुठे ?? काही नातेवाईक मंडपात पत्ते खेळत होते. बसलो त्यांच्या सोबत मेंडीकोट खेळत.

संध्याकाळ झाली ७.०० वाजता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. मला सोडून मित्राचे सर्वच नातेवाईक तर्राट आणि जो तो येवून मला नाचण्यासाठी ओढू लागला.

आपण कधी बाप जन्मात नाचलो नव्हतो सर्व महिला मंडळ लहान मुले आता मुंबईकर काही नवीन स्टेप्स दाखविणार म्हणून आतुर होते.

शेवटी मित्राने समजुत काढलीं सर्वांना सांगितले म्हणून नशीब. नाही तर माझा मायकल जॅक्सन नक्की केला असता. एकुलता एक मित्र म्हणून जितकी हळद नवऱ्याला लावली नव्हती त्याही पेक्षा जो तो मला फासत होता.

आता सानिकाला तर बदला हवाच होता तिने ही हवी तितकी हळद मला लावली.

माझा हल्दीराम झाला होता.

सर्व आटपून मित्र आला मला एका बाजूला नेले

" pls नाही नको म्हणू "

कशाला मी आश्चर्याने विचारले

" हे बघ मी डान्स करत नाही तुला माहीत आहे "

"डान्स नाही रे??? बस एक बिअर pls ,

बघ मला नाही जमत उगाच आग्रह नको

भरपूर समजवून शेवटी त्याच्या आग्रहाला बळी पडलो.

एक एक करत ३ बिअर कधी रिकाम्या झाल्या कळले नाही.

आणि आता खरा माझ्यात मायकल जॅक्सन शिरला.

आता मी लोकांना नाचण्यासाठी खेचू लागलो.

सर्व नाचायचे थांबले बस नाचणारे आम्ही तिघे मी नवरदेव आणि सानिका. तिचा पाय घसरला आणि ती पडली माझ्यावर. जो तो हसू लागला..


मी विव्हळत होतो. पूर्ण अंग हळदीने भरलेले आणि एक म्हातारा माणूस जवळ येवून बोलला

हळदीचा लेप लावा आराम येईल...

सानिका मला पाहून म्हणाली

आजुन हळद लावायची गरज आहे ??????



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy