sarala deshmana

Drama

3  

sarala deshmana

Drama

हक्क तिचाही...

हक्क तिचाही...

2 mins
248


आज डोंगराआडून रवी उगवला... तसा आजचा दिवस काय घेऊन आला होता माहित नाही. पण झाडावरच्या घरट्यात चिऊची पिल्ले अधिकच चिवचिवाट करत होती. त्यांच्या चिवचिवाटाने सारा आसमंत उजळून निघाला होता.


बाळांनो मी येते हं चारा-पाणी घेऊन तुम्हाला... मायेची नजर फिरवून चिऊताई भुर्रकन उडाली.


पिलांना चारा पाणी आणायला आजचा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा. आकाशात सारे पतंग. पक्षी कोणता अन् पतंग कोणता असा प्रश्न पडत होता. सारी मुले सकाळपासूनच पतंग उडवायला बाहेर पडलेली. जिथे जागा मिळेल तिथे मुले.


मुलांना सांगत असतो आम्ही अरे मांजा नका वापरू पण मुलं ऐकायलाचं तयार नाही. चिऊताईला बिचारीला हे कुठे माहित. मुले ‘पतंग कटली रे...’ असे ओरडत पतंग उडविण्यात दंग तितक्यात चिऊताईला मांजा न दिसल्याने तिच्या पंखाला धक्का लागला. चिऊताई चिवचिव करत क्षणात खाली पडली. मुले गोळा झाली. राजुने तिला अलगद उचलले. शेजारच्या डाॅ. काकांकडे नेले. ती चिऊताई निपचित पडून होती. तिच्या पंखाचे रक्त पुसले. दोन तासांनी तिला बरे वाटले असावे पण उडता येत नव्हते. एक दिवस सगळ्यांनी तिची खूप काळजी घेतली तिच्या पिल्लांच्या ओढीने ती दुसऱ्या दिवशी थोडी उडायला लागली नि खरंच ती उडून गेली, भुर्रकन... आपल्या घरट्याकडे...


पिल्ले बिचारी... वाट पाहून दमली होती... अंगाची लाही लाही होत होती कालपासून पोटात अन्नाचा एक कणही पडला नव्हता. पण आई येईल या एका आशेवर तग धरून बसली होती... आईला पाहून त्यांची तहान-भूक हरपली होती... अन् पिल्लांची आई त्यांना भेटली होती...


या पक्ष्यांनाही जगण्याचा हक्क आहे. फक्त त्यांना आपल्यासारखे बोलता येत नाही इतकेच. आपण माणूस म्हणून जगतोच पण त्यांनाही आपण त्यांचा हक्क मिळवून देऊया... या चिमणीपाखरांना मुक्त विहरण्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama