The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

sarala deshmana

Others

1  

sarala deshmana

Others

जरा मागे वळून पाहतांना...

जरा मागे वळून पाहतांना...

3 mins
451


जीवन प्रवास...लेखिका सौ रंजना महेंद्र शेलार, या संवेदनशील दिदिंचे पुस्तक आज हातात आले. प्रथम कवी व लेखक विजयकुमारजी मिठे यांचे मनोगत वाचून पुस्तकात काय असावे याविषयी ...उत्सुकता लागली.. शेलार कुटुंबातील या दोघा उभयंतांचे मुक्या प्राण्यावरील अनिवार प्रेम...खूप काही सांगून गेले.दोघा उभयंतांना झालेला पुत्रशोक माझ्या ह्रदयाला खोलवर स्पर्शुन गेला.

  

रंजना ताईंचा जीवनप्रवास या पुस्तकातून एखाद्या फुलाच्या पाकळ्या उमलत जाव्या तसा उलगडत गेला. व त्याचेच आज सुंदर फुल उमलेले दिसते आहे. त्यांनी कधीही अतिशयोक्ती केली नाही. आहे त्या परिस्थितीत तोंड द्ययचं व पुढे जायचं.वेळ कधीही वाया जाऊ दिला नाही.संसारासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जाणून त्याप्रमाणे वागत राहिल्या. सर्वच गोष्टी पैशात नाही मोजता येत.


चांगली संगत चांगलेच देऊन जाते याचा अनुभव घेतला. सुवर्णाताई महाबळ यांचेकडून *ज्ञानेश्वरी व दासबोध* वाचनाची गोडी लागली.जीवनावर भरभरून प्रेम करणाऱ्या या माझ्या सखीला माणसं जमवायला फार आवडते. सकारात्मक दृष्टिकोनाची ही सखी अनेक मैत्रिणी एकत्र जमविते. नशिबापेक्षा या सखीचा आपल्या कर्तृत्वावर खूप विश्वास आहे ही गोष्ट मला खूप आवडली.या मानवी जन्माचे ही सखी मनापासून आभार मानते त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांविषयी सखी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करते. सखीचे मनोगत या जीवनप्रवासत सुंदर साज चढवून जाते. शेणामातीची सारवलेली धाब्याची घरे,संतांच्या पालख्या,पंढरीनाथाच्या परिसरातील भक्तीमय वातावरण,श्रावणातली आओलीचिंब महादेव भक्ती,रेणुकामातेचं,महालक्ष्मीचं मंदिर,झुळझुळणारे झरे,ओढे,दाटलेली हिरवळ..व चरणारी जनावरे...आज हरवलेले राम राम हे शब्द..


पंढरपुरचा बाजार ,अर्धा दिवसाची शाळा,शिक्षकांविषयी आजही असणारी आपुलकी,कांदेपोह्यांची आजही आठवणीत राहणारी चव...बैलगाडीतून परीक्षेला जाणं,आजीची आठवण.शिवाशिवी,काचपाणी,सागरगोटे हे गमतीशीर खेळ,मुंबईला जातांना लेखिकेची पंढरपुराकडे अडखळलेली पावले.अन् अकरावीत झालेली वधूपरीक्षा...अन् विवाहसोहळा...मला वाचतांना खूप भूतकाळात घेऊन गेला.

 

 लग्नानंतर स्त्रिला घरात कसे जुळवून घ्यावे लागते याचे प्रातिनिधीक रूपात उदाहरण रंजनाताईंकडून मिळते.पत्रसंस्कृती जपणाऱ्या व सासरच्या लोकांचे मन जपणाऱ्या रंजनाताई .लिहितांना मनातलं परखडपणे म़ांडणाऱ्या रंजनाताई .पहिले कन्यारत्न अन् स्त्रीला अनुभवा लागतो तो प्रसंग पण प्रत्येक स्त्रीला लिहिता येत नाही असा डिलिव्हरीचा प्रसंग रंजनाताईंकडून शब्द न् शब्द मांडला गेला...


शिरपूर,साक्री येथील वास्तव्य,योगेशचा जन्म..संगोपण,नंदुरबारचे नवीन वातावरण,पतीने दिलेली खंबीर साथ रंजनाताई मान्य करतात.

लासलगावचे नवीन वातावरण,नाशिकला येण्याचं प्रयोजन,नाशिक ते लासलगाव ..मुलांचा प्रवास,हे सगळे करुन एम .ए ची पदवी मिळविली.मंगलताईचं सहकार्य. यशवंती ब्युटीपार्लर व टू व्हिलर ट्रेनिंग सुरु केले.हे ताईंकडून शिकण्यासारखे आहे.योगेशचा अचानकपणे धक्कादायक घडलेला प्रसंग..जीवनातील ठळक घडामोडी वाचून त्यावर मात करत पुढे कसं जावं....हे लक्षात येतं.मुलांचे अनेक प्रसंग ... यातून मातृह्रदयी माता माझ्या नजरेतून हेरली जाते..ती सखी रंजनाताई.


जीवन जगतांना कधीही ओझं समजून जीवन न जगता त्याला समजून घेणारी ही सखी...नातेवाईक व मित्रपरिवारात रमणाऱ्या रंजनाताई एकलकोंड जीवन जगण्याला विरोध करणाऱ्या आहे .हे मानवी जीवनाचं एक गोड औषध वाचकांना पाजून जातात.


वयाच्या उतरत्या कमानीत लेखिका इंद्रधनुचे सप्तरंगी रंग या जीवनप्रवासरूपी लेखनीतून अगदी सहजपणे उधळतांना दिसते.पतींबद्ल भरभरून आदर व प्रेम असणारी ही सखी महेंद्रजींना सुंदर शब्द सुमनात गुंफतांना दिसते.प्राणीमात्रांवर दया करणारे महेंद्रजी वाचून मला माझे वडिलांची आठवण झाली.

   असा हा रंजनाताईंचा जीवनप्रवास माझ्या मनाला भावून गेला.विविध सुंदर फोटो न्याहाळतांना खूप आनंद वाटला कवी कुसुमाग्रजांचे आशीर्वाद घेतांनाचा क्षण ...अविस्मरणीयच...पण योगेश व राणीचा निवांत क्षणी फोटो आहून माझ्या डोळ्यात टचकण पाणी आले.नातवात रमलेले हे शेलार दांपत्य मला आज एक नवीन जीवनप्रवासाकडे घेऊन गेले.

   

शेवटी कवयित्रीची असा मी कविता वाचली.व खरोखरच आनंदाचे झाड झालेली ही सखी निर्विवाद प्रेमसुमने वाचकांना देत ...राहिली. कादवा शिवारने प्रकाशन सुंदर असे केले आहे. मुखपृष्ठ व मलपृष्ठ दोन्हीही छानच...खळखळणाऱ्या मुक्त झऱ्यासारखे...मैत्रीत वयाचे बंधन नसते तसेच आमचे दोघींचे नाते आहे. त्या वयाने मोठ्या व मी लहान तरीही आम्ही मैत्रीणीचे नाते गुंफुन आहोत....हे आवर्जून सांगावेसे वाटते. अशा या सखीला मी पुढील लिखानास खूप खूप शुभकामना देते.


Rate this content
Log in