STORYMIRROR

sarala deshmana

Others

1  

sarala deshmana

Others

ह्दयस्पर्शी...

ह्दयस्पर्शी...

2 mins
478


आपण ज्या परिसरात राहतो तो सर्व परिसर खरचं आपल्याला माहिती असतो का?

आपल्या परिसराची परिपूर्ण ओळख आपल्याला व आपल्या मुलांना असणे खूप आवश्यक आहे .या जाणिवेतूनच आम्ही आज दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.

 महाराष्ट्रातील अग्रगण्य सहकारी साखर कारखाना म्हणून समजल्या जाणाऱ्या कादवा सहकारी साखर कारखान्याची सुरूवात कर्मवीर कै.राजाराम सखाराम वाघ यांनी केली.

उत्तम व निस्वार्थी व्यवस्थापन यामुळे हा कारखाना आजही नफ्यात चालतो आहे. या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 1978 साली सुरू झाला.या कारखान्यासाठी कच्चा माल ऊस दिंडोरी,निफाड,नाशिक,कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उपलब्ध होतो.

   प्रत्येक घरात लागणारी साखर आपण रोजच बघतो. घरात आणलेली साखर पाहिजे तितकी वापरणे एवढेच आपल्याला माहिती असते पण ही साखर तयार करण्यामागे ऊस पुरवठा करणारे शेतकरी ,मजुरवर्ग ,सर्व कामगार वर्ग,तज्ञ अभियंता टिम यांचा किती मोठा सिंहाचा वाटा आहे हे तिथे गेल्यावर आपल्याला कळू शकते.

   दूरवरून दिसणारा कारखान्याचा बाँयलर कारखान्याची दुरूनच ओळख करून देत होता. हिरव्यागार झाडांनी परिसर खुलून दिसत होता. गेटजवळ वाहनतळ होते.मुख्य प्रवेशद्वारावर द्वारपाल होते व परवानगीशिवाय मधे प्रवेश नव्हता पण आम्ही आधीच चिफ इंजिनिअर सरांना फोन केल्यामुळे आम्हाला त्वरित प्रवेशाचे कुपन मिळाले.प्रथमदर्शनी साधारणपणे फार मोठेही नाही असे प्रवेशद्वार पाहून काही विशेष असे वाटले नाही.पण आतमधे प्रवेश केल्यावर नजरेस पडल्या त्या नजरेतही न मावणाऱ्या अशा प्

रचंड मोठमोठ्या मशिन्स व कानावर ऐकू आला तो कानालाही सुन्न करणारा मशिनरींचा प्रचंड असा आवाज...की आपण काही बोललो तर समोरच्याला ऐकायलाही आपला आवाज जात नव्हता. सगळीकडे वेगळाच ऊस व साखरेचा गर्द असा गोडच गोड वास.....मोठमोठ्या टाक्या व त्यातून निघणारी प्रचंड वाफ व उष्णता...थोडे ओपन भागातून बाहेर डोकावले तेथे ऊस क्रेनने कारखान्याच्या दिशेने सोडत होते यासाठी क्रेन व मनुष्यबळाची ...कसरत बघतच राहिलो .

    सर्व कर्मचारी आलेल्या लोकांना माहिती देत होते. शंकांचं निरसन करत होते. ऊसावर प्रक्रिया करून साखर कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष पाहिले. प्रच़ड मोठ्या मशिन्स बघून बघणाऱ्याला नवल न वाटावे तर नवलचं

     मशिनमधून बाहेर पडलेली गरम साखर कर्मचारी हातावर टेस्टसाठी देतात तेव्हा क्षणभर आश्चर्यचकित होतो. या तयार होणाऱ्या साखरेच्या मागे किती कष्ट आहेत येथील सर्वांचेच ...हे प्रत्येकाने बघितले पाहिजे व जाणले पाहिजे . एकूण साडेतीनशे कामगार वर्ग येथे काम करतात. रात्री जेव्हा आपण आरामशीर झोपतो तेव्हा हा कारखाना दिवसाप्रमाणे वर्षातील पाच महिने अविरत सतत चालू असतो.

      प्रचंड आवाज व उष्णता सहन करत सर्वजण आनंदाने आपापले काम करतांना दिसले.

प्रशासकीय कार्यालयाचे वेगवेगळे विभागही दिसले.

 या कादवा सहकारी साखर कारखान्यास आपण आवर्जून भेट द्यावी व माहिती मिळवावी.

असा हा आज बघितलेला कादवा सहकारी साखर कारखाना आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहिल....अगदी ह्रदयस्पर्शी...अविस्मरणीय...


Rate this content
Log in