STORYMIRROR

sarala deshmana

Others

3  

sarala deshmana

Others

गजरा

गजरा

3 mins
1K


वेलीवरची फुले नि निरागस बागडणारी मुले म्हणजे माझ्या संवेदनशील मनाला अतिशय भावणारे.... साने गुरुजी माझे आवडते लेखक व आदर्श गुरुजी. "शामची आई" पुस्तक वाचताना मी अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते.मनावर संस्कार करणाऱ्या गोष्टींचा प्रभाव* *माझ्याही मनावर पडला.त्यातील "मुकी फुले" ही गोष्ट मला फारच भावली नि माझे फुलांवरचे मुके प्रेमही वाढतच गेले.


आपण देवपुजेसाठी कुठूनतरी चार फुले शोधून आणावी व ती देवाला मनोभावे अर्पण करावीत. मनसुखावते.अगदी तसेच माझ्या वर्गातील निरागस चिमुकल्या मला दररोज गुलाबाची सुंदर फुले देवाला वहावीत तशी माझी वाट बघतात नि मला ही फुले देतात.कधी लाल भडक,कधी पिवळे धमक तर कधी गुलाबी शिडकावा असलेले,कधी पांढरेशुभ्र,कधी केशरछटा असणारे विविधरंगी फुले तर कधी हिरव्यागार पानासह पांढराशुभ्र मोगरा...


सकाळी सकाळी माझी वाट बघत असतो.टिचर...टिचर....हे घ्या फुल.तुमच्यासाठी आणले.मला अगदी देवाप्रमाणे फुले अर्पण करतांना माझ्या या निरागस चिमण्यांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंदाचा झरा वाहताना दिसतो. ही फुले हातात घेऊन न्याहाळत बसायचे अन् "कुठून आणले गं हे सुंदर फुल" असे विचारताच ...कधी बागेतून तर कधी आत्याकडून अशी प्रत्येकीची वेगवेगळी उत्तरे मिळतात. ही सुंदर फुले मी कधीच माझ्या लांबसडक व काळ्यभोर केसात माळली नाही.या फुलांची रूपे किती साठवून ठेवावी मनाच्या कुपीत.फुल झाडावरंच शोभून दिसतयं छान आईच्या कुशीत.मला झाडापासून फुल तोडणं मुळीच आवडत नसले तरी या लहान चिमुरड्यांचे मने दुखावणेही नाही जमत.

अशी ही गोड फुले नि निरागस मुले...तोडणं नाही जमत.


मग ही फुले कधी वाढदिवसानिमित्त भेट देते मुलांना,कधी पाहुण्यांना तर कधी फुलदाणीत ठेवते.

अशा या चिमुरड्या सतत माझ्याभोवती भिरभिरतात अगदी फुलपाखरासारख्या.

आज एक गंमतच झाली आज खरचं एक सुंदर फुलपाखरू आमच्या वर्गात चुकून आले. निळसर पांढरे फुलपाखरू वर्गात स्थिर झाले.

सगळ्या मुलांनी त्याचे निरीक्षण केले. फुलपाखरू....फुलपाखरू म्हणून सारे ओरडत होते. क्षणभर वाटले माझ्या वर्गात नेहमी फुले असतात म्हणूनच ते इथे आले असावे. शेवटी एक दिवस मुक्काम केला त्याने वर्गात.....दुसऱ्या दिवशी ते

उडून गेले.

आज शाळा सुटण्याची वेळ झाली. नयना मँडम दाराजवळ येऊन उभ्या राहिल्या. मैत्रीत वय नसते त्या सेवानिवृत्त झाल्या तरी आमची मैत्री अजूनही टिकून होती. अगदी फुलांप्रमाणे त्या आजही स्वतःचे छंद जोपासतांना दिसत होत्या.


नयना मॅडमच्या दारापुढे मोठा जुईचा वेल. त्याचा सुगंध गल्लीभर पसरे. नयना मॅडम फुलांचा सुई न वापरता अतिशय छान गजरा करत ही त्यांची हातोटी. आम्ही एकमेकींना खूप दिवसांनी भेटत भेटलो की काहीतरी भेट वस्तु देत असत. आज त्या दाराजवळ येताच त्यांचे अस्तित्व मला जाणवले.

मी त्यांना स्मितहास्य केल नी म्हणाले "वा! गजरा माळला वाटतं केसात!"त्यांची चाहूल मला जुईच्या गजऱ्याच्या फुलांनी दुरूनच लागे....

त्या पाठमोऱ्या झाल्या नि म्हणाल्या,"हो माळला ना गजरा, हा बघ."

अन् एक गजरा माझ्या हातावर ठेवला नि म्हणाल्या "हा घे तुझ्यासाठी गजरा आणला."

खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो.जुईचा सुगंध वर्गभर पसरला होता. तसा मनातील शब्दकल्लोळही ओठावर आला होता. नयना मॅडम उद्या धारवाडला जाणार होत्या. जाता जाता मला जुईचा गजरा देऊन गेल्या. मी तो केसात माळला नि घरी आले.


कधीही गजरा न माळणारी मी. आज हिने गजरा कसा माळला केसात!घरी येताच प्रश्नांची सरबत्ती. मी ही आज सरळ नाही बोलायचे ठरविले. आजपर्यंत मी त्यांच्या गजऱ्याशिवाय कधी कुणाचा गजरा माळला नव्हता केसात... नवऱ्याचं माझ्यावर असणार अतिप्रेम आता उतूच गेल. नि मला म्हणाले,"कोणी दिला तुला गजरा?"मी हसून उत्तरले."कोणी नाही...परत दुसऱ्यांदा..."कोणी दिला गजरा?...सांग राणी."मी पुन्हा उत्तरले "एका मुलीने."

तिसऱ्यावेळी,"नाही खरे सांग ...राणी...कोणी दिला..तो गजरा...?"

"एका...मैत्रिणीनेे.."नाव काय तिचं???" शेवटी दिले सांगून एकदा नाव ...नयना मॅडम भेटल्या आज...त्यांनी दिला तो गजरा...तेव्हा ते ही मनोमन हसले ...नि मी मात्र खुर्चीत बसले...नाही माळायचा गजरा पुन्हा केसात...तसाच जपून ठेवायचा....हातांच्या ओंजळीत नि ...मनाच्या कुपीत... पांढऱ्याशुभ्र फुलांचा ग....ज....रा..


शेवटी गजरा तो गजराच

जुईचा असो नाहीतर मोगऱ्याचा...

सारा आसमंत सुगंधी करणारा

नि पाढऱ्याशुभ्र सुमनांचा...


Rate this content
Log in