sarala deshmana

Others

1  

sarala deshmana

Others

आनंदयात्री...

आनंदयात्री...

2 mins
339


सखी जयश्रीताई बापट यांसी सादर प्रणाम.

काल रात्री खूप दिवसांची माझी इच्छा म्हणून मला माझ्या चिमणी पाखरांनी (अनिश व अबोली) हिरकणी हा चित्रपट दाखविला.रात्री उशिरापर्यंत चित्रपट पाहिला म्हणून माझ्या डोळ्यासमोर सकाळीही हिरकणीतील दृश्य येत होते.मी या हिरकणीला मनोमन सलाम केला .प्रत्येक स्त्रीने बघावा असा हा चित्रपट .

   सकाळी पावणेबारा वाजता दरवाजासमोर पोस्टमनने हातात दिले ते पुण्याहून आलेले कुरियर.

    पुण्याच्या एका हिरकणीनं मला ते पाठवलं होतं .माझ्या चिमणी पाखरांना ते पाहण्याची खूप उत्सुकता.मला हातही लावू न देता चिमणीपाखरांनी त्याचे कव्हर पाँकेट फोडून मला हातात पुस्तक दिल ते आनंदयात्री...

 सौ जयश्री बापट.

मुखपृष्ठावरील जयश्री बापट ही बोलकी मुर्ती मी किती वेळ न्याहाळली .तीत मला एक साकात्मक दृष्टी दिसून आली.

मी डाँ सरदेसाई सरांची सुंदर प्रस्तावना वाचली व आनंदयात्रीचा सांगाती कडे वळले.मला सर्वात जास्त कौतुक माझे पितृतुल्य असे *अशोक बापट* सरांचे करावे वाटते आहे.जयश्रीताई तुम्ही पुस्तकातून व्यक्त झालात.पण तुमचे सांगाती अनेक प्रसंगी तुम्हाला साथ देतांना किती खंबीरपणे साथ देतात ,किती सहन करतात हे आनंदयात्रीचा सांगाती केवळ या

मनोगतातून व्यकत होणे अशक्यच..त्यांच्या सहनशिलतेला मी सलाम करते.

  रायगडावर अडकलेल्या  हिरकणीनं आपल्या बाळासाठी अतिशय भयानक असा रायगडाचा अवघड कडा उतरावा तसा जयश्रीताई तुम्ही या तुमच्या वैवाहिक जीवनाचा हा कठीण व खडतर प्रवास तुमच्या अभिषेक साठी करत आलात .हे वाचतांना मी खूप विचामग्न झाले.बरे नसतांनाही एक आई आपल्या बाळासाठी किती काही करते हे तुमच्यातील आईनं जगापुढं आणलेलं हे एका आईच समर्पक रूपडं.

सासर,डॉक्टर,सुनबाई यांचेविषयी आलेले अनुभव परखडपणे मांडलेत की ज्यातून दुसऱ्याला त्रास होऊ नये.एखाद्या गोष्टीची वेळ घड्याळातील आकड्यानुसार किती अचूक लिहिलीत.कुटुंबातील बारीक सारीक मांडलेले अनुभव वाचकांना खूप काही सांगून जातात .सासू सासरे ,माहेरची सर्व मंडळी , जाऊ,नणंद,डॉक्टर यांचेविषयी कृतज्ञताही व्यक्त करतात.जे पटले नाही ते परखडपणे मांडणारी ही लेखिका सतत शारीरिक त्रासाने त्रस्त असूनही स्वतः मात्र दुसऱ्याला जगण्याचा *आधारस्तंभ* बनते आहे ती आपल्या आनंदयात्रीतून व लेखणीतून.कँन्सरसारख्या असाध्य आजाराला चौथ्या स्टेपला जाऊनही सकारात्मकतेने लढा देणारी ही हिरकणी...

शेवटी अनेक डॉक्टर साहेबांची सुंदर मनोगतं वाचली.जयश्रीताईंचीअनेक पुस्तके प्रकाशित असून आतापर्यंत एकूण ५७ राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणारी ही कवयित्री व लेखिका दुर्मिळच....

  हे पुस्तक वाचताना माझे मन हेलावले ते दोन गोष्टींनी.जयश्रीताईंना झालेला कन्सर व सून प्रितिदाचा घर सोडून जाण्याचा निर्णय.

जयश्रीताई तुमचे हे आनंदयात्री पुस्तक कँन्सररुग्नांसाठी नक्कीच आशेचा एक किरण आहे यात शंका नाही.तुम्ही व तुमचे कुटुंबातील व्यक्तींनी यासाठी किती सहन केलंय हे मी आनंदयात्रीतून समजू शकते .कारण मीही एक संवेदनशील मनाची स्त्री आहे.तुमची आनंदयात्री ही पुस्तकची भेट मी कायम जपून ठेवीन.व त्यातून इतरांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करीनं.

शेवटी एकचं की मी देवाकडे तुमचेसाठी सहनशिलतेची शक्ती मागते.


या आनंदयात्रीसी तू

सहनशिलता दे देवा....

आनंदयात्री दे जगी तुझ्या

अनुभवाचा हा मौल्यवान ठेवा...


Rate this content
Log in