SMITA GAYAKUDE

Drama

2.5  

SMITA GAYAKUDE

Drama

हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

हॅप्पी व्हॅलेंटाईन डे

4 mins
517


आज व्हॅलेंटाईन डे.. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून ऑफीसला जायची तयारी केली.. 

"आज लवकर येईन गं.. तूपण लवकर ये.. मस्त कॅण्डल लाईट डिनरला जाऊया..”

"वाह नवरोबा..आज काय एकदम मूडमध्ये.. कॅण्डल लाईट डिनर.. हम्म्म्म्म..”


दोघेही लवकर यायचं ठरवून ऑफिसला गेलो..

ऑफिसमध्ये कामात काही लक्ष लागत नव्हतं.. संध्याकाळी डिनरला जाताना कोणता ड्रेस घालायचा, मेकअप कसा करायचा असे सगळे विचार डोक्यात चालू होते.. मेकअपसाठी youtube चा फेरफटका मारूनही झाला.. स्टाफमध्ये आज काय स्पेशल वर प्रत्येकाची चर्चा चालू होती.. मीही आनंदाने कॅण्डल लाईट डिनरचा प्लॅन असल्याचं सांगत होते..


"मागच्या महिन्यात घेतलेला वन पीस घातलाच नाही अजून एकदाही.. आज तोच घालूया.. रेड कलरचा वन पीस आणि त्यावर हलकासा मेकअप छान दिसेल.."


"अरे घराजवळ ते नवीन कपड्यांचं दुकान नाही का चालू झालं.. आज लवकर निघते घरी.. बाजूची रमा नव्हती का बोलत तिथे couple tshirts चांगले आहेत म्हणून.. वाह भन्नाट आयडिया आहे ही.."


"देवा आज वेळ का जात नाहीय.. घड्याळ बंद तर नाही पडलं ना.. मगाशी तरी 2.30 वाजलेले.. मला वाटलं एक तास झाला असेल पण आता कुठे 10 मिनिट्स झालेत.. आज काहीही करून 5ला ऑफिस मधून निघायचं.."


असे विविध विचार डोक्यात चालू होते.. 5 वाजले आणि लॅपटॉप घातलं बॅगेत आणि घराजवळच दुकान गाठलं..


दुकानात खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे couple tshirts होते.. त्यात रेड कलरचे "King" आणि "Queen" लिहीलेले tshirts घेतले (खरंच राजा-राणीचाच संसार आहे आमचा..) आणि घरी आली..

चहा घेतला आणि नवरोबाला मेसेज केला.. "reached home..waiting.."


मी डिनरला जायच्या तयारीला लागले.. मस्त अंघोळ केली आणि आणलेला "Queen" वाला tshirt आणि ब्लॅक कलरची जीन्स घातली.. हलकासा मेकअप केला..आणि वाट बघू लागले..


"मेसेजचा रिप्लाय नाही..अरे विसरला की काय हा..कॉल करून बघते.."

"The person you are calling is not answering your call..please try later.."


विसरला बहुतेक हा.. सात वाजले तरीही कॉल आणि मेसेजचा पत्ता नाही.. थोडीशी नाराज होऊन आत बाहेर करू लागली.. थोड्या वेळात मेसेज चा टोन वाजला.. 


"एका मीटिंगमध्ये अडकलोय.. थोड्या वेळात कॉल करतो डिअर.. "

"अरे यार आज पण मीटिंग.. दररोजचं आहे याचं हे.."

"सगळे फेसबुक, व्हाट्सअॅपला स्टेटसवर डिनर, मूवीचे photos पण ठेवले.. मी मात्र इतकी छान तयार होऊन वाट बघत बसलीय.. निघता येत नाही का याला लवकर.."

"जाऊदे बिचारा.. वर्क प्रेशर खूप आहे म्हणत होता मागच्या काही दिवसापासून.. निघता नसेल आलं.."


9.30 वाजता कॉल आला.."डार्लिंग सॉरी गं.. एक production मध्ये क्रिटिकल प्रॉब्लेम झालाय.. त्यासाठी मीटिंग चालू आहे क्लायंट सोबत.. तो issue लवकर solve नाही झाला तर खूप सारे impacts होतील म्हणून urgent resolve करायचंय.. तू टेन्शन नको घेऊस.. मी येतो लवकर.."

रात्रीचे 11.00 वाजले..दारावरची बेल वाजली..


"सॉरी डिअर..खुप उशीर झाला.. खरंच खूप प्रॉब्लेम झालेला गं ऑफिसमध्ये.."

"चिडली आहेस का तू.. बोलत का नाही आहेस.."

"अगं बोल ना.. खरंच राणी खूप प्रयत्न केले मी लवकर निघायचं पण नाही जमलं.. आणि इतकं क्रिटिकल issue असताना निघून येणं बरोबर नाही वाटत ना.."

"चल पटकन फ्रेश हो.. जेवायला बसुयात.."

"म्हणजे तू चिडली नाहीस ना.."

"जा आधी आवरून घे.. हा tshirt घाल किंग वाला..एक शब्दही न बोलता आवरून ये पटकन.."

"अरे काय चालूय हे.."


तो गेला आवरायला.. मी मस्तपैकी पुरी आणि बासुंदी बनवली होती.. आणि बेडरूममध्ये खूप सारे कॅण्डल लावून कॅण्डल लाईट डिनरचं वातावरण तयार केलं होतं.. मोबाईलवर शांत असं music चालू होतं.. नवरोबाचं आवरून झालं तसं मी त्याला बेडरूममध्ये घेऊन गेले..


"नवरोबा..Happy Valentine's day.."

काहीच न बोलता तो इकडे तिकडे बघत होता..

"चला कॅण्डल लाईट डिनर करूयात.. बस इथे.. हे बघ पुरी बासुंदी केलीय.. तुला आवडतं ना.."

"Wow..एक सेल्फी तो बनता है.."

Music चा आनंद घेत काहीच न बोलता एकमेकांच्या डोळ्यात बघत कॅण्डलच्या प्रकाशात जेवण झालं.. दोघे काहीच बोलत नव्हतो कारण त्या क्षणी एकमेकाबद्दलचं प्रेम, काळजी, आदर अशा खूप साऱ्या गोष्टी अनुभवत होतो..


"आज मला आकाशात उडत असल्याचा फील होतोय ना तो असा आधी कधीच नाही आलाय.. थँक यु फॉर एव्हरीथिंग डिअर.. खरंच तुला राग नाही आला माझा?"

"आलेला ना.. पण नंतर विचार केला की तू मुद्दामहून तरी नाही करत आहे ना.. ऑफिसमध्ये असं unexpectedly issues आले तर तू तरी काय करणार.. आलेली परिस्थिती बदलता येत नाही त्यामुळे मूड खराब करून घेण्यापेक्षा मनस्थिती बदलून पुढची परिस्थिती नक्कीच बदलता येते.. आल्यावर तुझ्यावर राग राग करून व्हॅलेंटाईन डेचा शेवट करण्यापेक्षा आनंदाने हा suprise देऊन करण्यात जास्त मजा होती.. नाही का? 

खूप वेळ तो माझ्याकडे एकटक बघत होता..


"आजचा व्हॅलेंटाईन डे माझ्या आयुष्यभर लक्षात राहील.. लव्ह यु डिअर.. अरे मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी.."

असं म्हणत त्याने बॅगेतून गुलाबाचं फुल आणि ग्रीटिंग कार्ड काढलं..

"एवढंच आणू शकलो मी तुझ्यासाठी..."

"हेही खूप आहे माझ्यासाठी"

म्हणत मी ग्रीटिंग कार्ड बघू लागले. हळूच त्याने ओठ माझ्या कपाळावर टेकवले.. आणि घड्याळाने बाराचा ठोका दिला..


Rate this content
Log in