हे सारं काही लॉकडाऊनमुळे - भाग दुसरा
हे सारं काही लॉकडाऊनमुळे - भाग दुसरा


भाग दुसरा
सुयोग ला आठवलं तो जेव्हाही यायचा तेव्हा दाराबाहेर छान रांगोळी काढून, पणत्या लावून सजवलेलं असायचं. हसतमुख असणारी मेघा दार उघडून समोर त्याला पाहिलं की मेघाच्या चेहऱ्यावर अजुन उत्साह येई. तो किती वेळा म्हणायचा हा काय बालिशपणा करते नेहमी रांगोळी त्यावर दिवे. नको करत जाऊ मला अवघडल्या सारखं वाटतं. पण आज तेच बिना रांगोळी काढलेलं दार पाहून त्याला वाईट वाटलं. तो यायचा तेव्हा मेघा सकाळपासून कामाला सुरुवात करायची. त्याच आवडत जेवण बनवायची. एक उत्साह असायचा तिच्यात. आई बाबांना बोलवून घ्यायची मग सोबत त्याच्या आवडीच जेवण. आज त्याला अस सुन सुन घर पाहून त्या सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या.
मेघा ने आत जाऊन त्याच्यासाठी पाणी आणलं. सुयश ला उठवायला गेली पण तो उठायचं नावं च घेईना मग तिने पप्पा आल्याचं सांगितलं तसा तो धावत जाऊन सुयोग ला बिलगला. मेघा दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली. जेवण झाल्या नंतर सुयोग ला थोडा थकवा आला असल्याने तो आत बेडरूम मध्ये झोपायला निघून गेला. मेघा ही किचन मधल सगळ आवरून सुयश ला त्याच्या खोलीत झोपवून स्वतःही त्याच्या बाजूला झोपून गेली.
फोन च्या आवाजाने सुयोग ला जाग आली. वकिलांचा फोन होता. मोदींनी आपल्या देशात सगळीकडे लॉक डाऊन केल्याने आजची मीटिंग कॅन्सल झाल्याचं सुयोग ला कळवल. सुयोग ची खूप चिडचिड झाली. त्याने चरफडत हॉल मध्ये जाऊन टीव्ही ऑन केला. कोरोनामुळे मोदींनी देशात सगळीकडे लॉक डाऊन केल्याने कोणीच बाहेर पडू शकणार नव्हते. कोरोना संक्रमित होऊ नये यासाठी परदेशातील आत येऊ शकत नव्हते आणि इथले परदेशात जाऊ शकत नव्हते. सगळी विमानतळे बंद करण्यात आली. त्याने इथे तिथे फोन फिरवले पण आता तो लॉक डाऊन संपे पर्यंत परदेशी जाऊ शकत नव्हता. ऑफिमधून बॉस चा कॉल आला आणि त्यांनी लॉक डाऊन संपे पर्यंत घरून फक्त कस्टमर चे कॉल्स अटेंड करण्यासाठी सांगितले. मेघा ला जाग आली तशी ती बाहेर येऊन पाहते तर सुयोग डोक्यावर हात लावून सोफ्यावर बसला होता. समोर टीव्ही वर असलेले हेड लाईन वाचून ती सगळ समजून गेली. आता तिलाही काळजी वाटू लागली.
(क्रमशः)