akshata kurde

Drama Romance Others

3  

akshata kurde

Drama Romance Others

हे सारं काही 'Lockdown'मुळे...

हे सारं काही 'Lockdown'मुळे...

2 mins
11.7K


(अंतिम)

पुढले पाच दिवस असेच निघून गेले. कोणीच पुढाकार घेऊन बोलत नव्हतं. दोघांमध्ये कामापुरता संवाद होत होता. पण या पाच दिवसात मेघाची रोजची तारेवरची कसरत पाहून त्याला तिच्याबद्दल खूप काळजी वाटे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत ती कामाला जुंपलेली असते. तिची दमछाक होऊनही एका शब्दाने कधी मला काही बोलली नाही उलट माझ्या आनंदासाठी काही ना काही करत असते, मी मात्र तिला कधीच प्रेम दिलं नाही. फक्त एक नवरा असण्याचं कर्तव्य पार पाडत आलो. आता त्याला तिची किंमत कळत होती.


तिकडे मेघा सुयोग दिवसभर किती काम करत असतो हे पाहात होती. तिला नेहमी वाटतं राहायचं की तिकडे तो मजेत असतो. पण आज त्याचे काम पाहून तिला त्याच्या कामाबद्दलचा प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा दिसला. तासनतास चालणारे फोन कॉल्स, कामाचा लोड यामुळे घरात असूनही त्याला जेवणाची आठवण नव्हती हे बघून तिला तो तिथे स्वतःची काळजी घेत नसेल याची खात्री झाली. त्याचे सगळे प्रयत्न आपल्या संसारासाठी चाललेत आणि मी मात्र त्याचा वेळ मिळत नाही म्हणून इतका मोठा निर्णय घेऊन मोकळे झाले. त्याची संसारासाठी चाललेली धडपड त्यातली काळजी कधी दिसलीच नाही.


दोघांना एकमेकांची किंमत कळाली होती. आता त्यांना एकमेकांना अजिबात गमवायचं नव्हतं. म्हणून सुयोगने यावेळी पुढाकार घ्यायचा ठरवलं. विक ऑफ असल्याने सुयोग आज निवांत बसला होता. त्याला असं पाहून मेघालाही बरं वाटलं. मेघाही घरून ऑफिसची कामं करत होती. सुयोग मुद्दाम सुयशच्या बेडरूममध्ये जाऊन बसला कारण त्याला माहित होत की तो तिथे असल्याने ती तिथे येऊ शकणार नव्हती. नेमकं तसंच झालं रात्रीची कामे झाल्यानंतर सुयोगला सुयशच्या रूममध्ये पाहून मेघा त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन तिची राहिलेली ऑफिसची कामं करत बसली.


सुयशला झोपवून सुयोग त्यांच्या बेडरूममध्ये आला. त्याने पाहिलं, मेघा तिची कामं करता करता तिथेच झोपून गेली. त्याने हळूच बेडवरचा लॅपटॉप आणि तिची फाईल्स टेबलावर ठेवून तिच्या बाजूला येऊन झोपला. मेघाला त्याच्या हालचालीने जाग आल्याने तिने डोळे उघडले तसे पाहिलं की सुयोग तिचा हात हातात घेऊन बाजूला झोपला होता. ती हात सोडवणार होती की लगेच त्याने तिचा हात घट्ट धरला. दोघांना आपल्या चुकीची जाणीव झालेली. दोघेही डोळ्यांतून तसे व्यक्त होत होते. सुयोगने तिची मनापासून माफी मागितली. पुन्हा कधीही तिला एकटं वाटू देणार नाही याची खात्री त्याने तिला दिली आणि मेघानेही त्याला माफ करून क्षुल्लक कारणावरून तिने घेतलेल्या मोठ्या निर्णयाचीही माफी मागितली. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. लॉकडाऊननंतर तो मुंबईमध्ये बदली करून मेघाला सरप्राइज देण्याच्या विचारात असतो तर तिकडे मेघा हे सारं काही 'Lockdown'मुळे झाल्याने तिचा संसार मोडता मोडता वाचला होता त्यासाठी ती लॉकडाऊनचे मनापासून आभार मानत होती...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama