हैंग ओव्हर - भाग 4
हैंग ओव्हर - भाग 4
पण मैथिलीच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिचा मूड ठीक करायला मोहित म्हणाला,
मीतू चल आपण बोटिंग करू ऊठ.
नाही मोहित नको मला भीती वाटते पाण्याची.
तसा मोहित मोठयाने हसू लागला नि म्हणाला, तरीच पुणेकर आहेस भित्री.
हो असु दे ती रागाने म्हणाली.
तसा तो अजुन चिडवू लागला भिऊ नकोस मला स्वीमिंग येते, तू काय पडणार नाहीस पाण्यात मीतू.
नको मी नाही येणार.
अरे तू देशमुखांची सून होणार आहेस बी ब्रेव्ह आणि वाघाला वाघीणच शोभते चल काही होत नाही मी आहे, असं म्हणत मोहित मीतूला बोटिंगसाठी घेऊन आला.
दोघांनी सेफ्टी जॅकेट्स घातले आणि मोहित स्वतः बोट चालवू लागला. मैथिली मोहितच्या दंडाला घट्ट पकडून बसली होती. तिला बघून मोहित हसत होता. पूर्ण राऊंड होईपर्यंत मीतू त्याला पकडून बसली होती. रात्री ते घरी परत आले. मोहित तिला सोडुन गेला. घरी पोहचल्यावर कॉल करतो म्हणाला. मितुला त्याची काळजी वाटत होती. घरी गेल्यावर मोहितने तिला कॉल केला. तिला त्याच्या काळजीने झोप येत नव्हती. मोहितच्या विचारातच कधी ती झोपी गेली ते तिलाही नाही समजले. सकाळी उठल्यावर तिने मोहितला गुड मॉर्निंगचा मेसेज केला.
मोहित म्हणाला, मी आज तुझ्याबद्दल घरी सांगतो. मितुला बरे वाटले. जितक्या लवकर होईल तितके आपले मोहितशी लग्न व्हावे असे तिला आता वाटू लागले होते कारण तिला त्याची खूप काळजी वाटत होती. मोहित स्वतःचे आवरून नाष्ट्याला आला. ते सगळे एकत्र नाष्टा करत. नाष्टा करून अजिंक्य, मोहितचा भाऊ कॉलेजला जात असे. तो इंजिनियरिंगच्या लास्ट इयरला होता.
सगळे जमले तेव्हा मोहित म्हणाला, आई तू पण ये लवकर मला बोलायचे आहे थोडं.
हो आले हा नाष्टा आणते टेबलवर. बाबा पण आले.
आई म्हणाली, बोल आता काय बोलायचे.
आई बाबा मला एक मुलगी आवडते ती पुण्याची आहे. गेली तीन वर्षे आम्ही एकत्र आहोत आता ती इथेच कोल्हापूर सकाळला मुख्य पत्रकार म्हणून जॉइन झाली आहे.
अरे वा पत्रकार आहे का मग छानच बाबा म्हणाले.
तिचे नाव काय आणि घरी कोण कोण असत आई ने विचारले.
आई तिचे नाव मैथिली माने आई-वडिल आणि छोटा भाऊ आहे तिला. वडिल रिटायर झालेत नुकतेच ते सरकारी नोकरीत होते.
तुला आवडली आहे ना मग झाले तर लवकरच लग्न उरकून टाकू आई म्हणाली.
दाद्या अरे वहिनीचा फोटो तरी दाखव अज्जू म्हणाला.
हो दाखवतो म्हणत त्याने मैथिलीचा काल काढलेला सिंगल फोटो दाखवला.
सर्वांना मितु आवडली.
मोहित आजच मैथिलीला घरी घेऊन ये कधी तिला भेटते असं झालं आहे,आई म्हणाली.
अहो मोहितच्या आई जरा दमान घ्या, मैथिलीला तिच्या घरीसुद्धा सांगू द्या आधी... बाबा म्हणाले.
माझा मोहित लाखात एक आहे त्यांना आवडणारच हो
आई आणतो तिला घरी खूश...
अजिंक्य म्हणाला, दाद्या अजून बघू फोटो फोनमधले.
तसा मोहित हसत म्हणाला, नाष्टा कर आणि जा कॉलेजला नंतर दाखवतो फोटो आणि त्याचा गाल ओढला.
अरे दादा माझे गाल नको ओढू वहिनीचे ओढ आता. तसे सगळे हसू लागले.
नाष्टा करून मोहित बाहेर पडला. अजयला भेटायला गेला. एका हॉटेलमध्ये त्यांनी भेटायचे ठरवले होते. मोहित पोहोचला. पाच मिनिटांत अजय पण आला.
अजय-कसा आहेस मोहित..
मी ठीक आहे... काल परत कॉल आला पुन्हा धमकी, मला वाटते नक्की कोणी तरी माझा दुश्मन आहे ज्याला मला ही
निवडणूक लढू द्यायची नाही.
असू शकेल मोहित राजकारणात तुझे खूप विरोधक असतील पण हा जो कोणी आहे फोन करणारा तो नक्की भाड्याचा तट्टू असणार.
हो मलाही असंच वाटतंय अजय पण माझ्यामुळे माझ्या घरच्या लोकांना त्रास नको आणि विशेष करून मैथिलीला.
आता ही मैथिली कोण मोहित?
मोहित हसला आणि त्याने त्याच्या आणि मितुच्या रिलेशनशिपबद्दल अजयला सांगितले.
ओह्ह असे आहे तर... पण ती रिपोर्टर आहे सो तिला कोणी त्रास देईल असे मला नाही वाटत मोहित.
पण अजय मितु माझा वीकपॉईंट म्हणून तिला त्रास दिला तर मी ही हार मानेन असे नाही का समोरचा विचार करणार.
तुझे बरोबर आहे मोहित मग तुम्ही शक्यतो बाहेर भेटू नका.
हो अजय पण सध्या ती एकटीच राहते इथे सो आय एम वरीड.
अजय विचार करू लागला यावर काय करता येईल. तो म्हणाला, मोहित इलेक्शन होईपर्यंत तुझ्या घराबाहेर पोलिस प्रोटेक्शन तसेच मैथिलीच्या सोसायटी बाहेर दोन पोलिस असे करता येईल पण सोसायटीवाले परवानगी देणार नाहीत.
मोहित म्हणाला, फक्त माझ्या घरी पोलीस प्रोटेक्शन असू दे. मैथिलीची काळजी मी घेईन.
ओके म्हणत अजयने पोलिस चौकीत फोन लावला आणि मोहितच्या घरी पोलीस पाठवायला सांगितले तसेच काल आलेल्या कॉलचे डिटेल्स मागितले.
दोघांनी कॉफी घेतली. तोपर्यंत कॉलचे डिटेल्स आले अजयला.
अजय म्हणाला, मोहित काल आलेला कॉल हा शिरोलीमधुन केला होता. हा जो कोणी आहे तो फार हुशार आहे. दर वेळेस वेगवेगळ्या ठिकाणाहून कॉल करणार तुला.
हम्मम्म मोहित इतकच बोलला.
मोहित तू कायम सावध रहा आणि काही समजले तर कळव मला.
हो अजय. चल निघू या आणि वहिनीची भेट घालून दे तुला सवड असेल तर अजय हसतच म्हणाला.
काय अजय तू पण फिरकी घेतो माझी भावा, आता डायरेक्ट साखरपुड्याला ये.
बरं बरं म्हणत अजयने त्याला शेकहॅण्ड केला. एकमेकांचा निरोप घेतला.
कार सुरू करत मोहितने मितु ला कॉल लावला. हॅलो जान काय करतेस. मोहित राजे आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत बोला काय काम होतं.. मैथिली राणी सरकारांकडे आमचं महत्वाचे काम होते भेटतील का त्या? ना इथे कोणी राणी सरकार नाहीत इथे फक्त पत्रकार मैथिली आहेत समजले का मिस्टर देशमुख..बरं तुमच्या पत्रकार मॅडमना सांगा की त्यांना देशमुखांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे हे ऐकून मितु खुश झाली म्हणाली, मोहित खरंच सांगतोस.
हो ग राणी मी खोटं बोलत नाही हे तुला माहीत आहे ना.
तू सांगितलेस आपल्याबद्दल सगळं.
होय म्हणूनच आई ने तुला बोलवले आहे. संध्याकाळी तयार राहा मी येतो घरी.
ओके लव यु स्वीटहार्ट म्हणत मितु ने फोन ठेवला.
मितु ऑफिसमधुन घरी आली फ़्रेश झाली. कोणता ड्रेस घालू ती विचारात पडली आणि एकीकडे धाकधूकही होती की मोहितच्या घरी जायचे. सगळे ड्रेस तिने बेडवर काढून ठेवले यातला कोणता घालू तिला समजेना तोपर्यंत मोहित आलाच. ती अजून तयार नव्हती.
तिला पाहून म्हणाला, काय हे मितु अजून तू तयार नाही...
मोहित मला समजत नाही कोणता ड्रेस घालू?
बेडवरचा पसारा बघून तो म्हणाला, हा ढीग लागला आहे ना कपड्यांचा तरी तुला सुचत नाही.
मोहित तूच सांग आता कोणता ड्रेस घालू?
स्वीटू सगळ्याच ड्रेसमध्ये तू छान दिसतेस. हा पिस्ता टॉप घाल चल आवर लवकर.
मग तू जा ना बाहेर बस.
नाही मी इथेच बसणार मोहित म्हणाला....