हैंग ओव्हर - भाग 3
हैंग ओव्हर - भाग 3


बराच वेळ दोघं बोलत होते. मग ते झोपी गेले. दोन दिवसांनी मैथिलीला ड्रेसिंगला बोलवले होते म्हणून मोहित आज येणार होता तिला हॉस्पिटलला न्यायला. मीतू छान तयार झाली स्काय ब्लू कुर्ता आणि व्हाइट जीन्स तिने घातली होती, सुंदर दिसत होती. मोहित आला
तिला पाहून म्हणाला, काय मीतू कोणाला बेहोश करायचा विचार आहे काय दिसतेस तू एकदम नाद खुळा !
काय रे मोहित नाद खुळा काय.
हा मग आमच्या कोल्हापुरात असंच बोलतात.
हम्म्म्म चला राजे निघू या का आता.
चल म्हणत त्याने तिच्या गालावर किस केला.
दोघे हॉस्पिटलला आले. ड्रेसिंग करून निघाले तिला डॉक्टरांनी ऑफिस जॉइन करायला परवानगी दिली.
मोहित म्हणाला, मीतू चल आपण बाहेरच जेवण करू.
हु चालेल ती म्हणाली.
ते हॉटेल ओपलला आले
मोहित म्हणाला, मीतू आता मी आमदारकीसाठी फॉर्म भरणार आहे. तीन महिन्यांनी इलेक्शन आहे सो आता माझी थोड़ी धावपळ वाढणार त्यातूनही मी तुला वेळ द्यायचा प्रयत्न करेन. तू ही मला समजून घे ओके.
हा मोहित नक्कीच आय एम विथ यू ऑलवेज. तू टेंशन घेऊ नकोस.
नक्की ना नाहीतर मागच्या वेळी रूसली तशी रुसून बसशील.
मोहित नाही रुसणार आय प्रॉमिस.
बघ हा जान म्हणत त्याने तिचे नाक ओढ़ले.
ती हसली फक्त. गप्पा मारत त्यांनी जेवण केले. मोहितला एक कॉल आला लँडलाईन नंबर होता. त्याने घेतला कॉल.
हॅलो कोण बोलतय.
समोरून आवाज आला मी कोण कुठला हे जाणून घ्यायची तुला गरज नाही. मी काय सांगतो ऐक तू आमदारच्या पदासाठी फॉर्म भरणार नाहीस नाहीतर गाठ माझ्याशी आहे समजलं...
तसा मोहित चिडला म्हणाला, अरे तू कोण आहेस ते सांग आधी आणि मी इलेक्शनला उभा राहीन किंवा नाही तुला काय करायचे आणि हे बघ मी कोणाच्या बापाला भीत नाही असल्या धमक्या मला देवू नकोस... असे बोलून त्याने कॉल कट केला.
मीतूला काळजी वाटू लागली ती म्हणाली, मोहित कोणाचा होता फोन आणि काय म्हणत होता तो? मीतू तू नको टेन्शन घेऊ अगं राजकरण म्हटलं की असे असतेच पण मी खंबीर आहे. यू डोन्ट वरी, असे म्हणत त्याने तिच्या हाताला थोपटले.
मोहित तू काळजी घे मला भीती वाटते रे... तुला काही झाले तर मी काय करू आय वान्ट यू मह्यू.
अरे जान अस भिऊन कसे चालेल... हा तू पुण्याची भित्रीभागुबाई... म्हणत तो तिला चिडवू लागला.
मोहित काय पण तुला मस्करी सुचते कधीपन.
अगं नको इतका विचार करू... आय विल टेक केयर ऑफ मी ओके.
चल आता काय गाल फुगवून बसली स्माईल प्लीज.
मीतू त्याच्याकड़े पाहत हसली. त्याने तिला घरी सोडले तो ही त्याच्या घरी आला. मोहितचे आजोबा आणि वडिल दोघेही राजकारणातच सक्रिय होते. त्याचे वडिल
दिनकरराव देशमुख माजी आमदार होते. त्यांचा समाजकार्याचा आवाका, गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती प्रामाणिकपणा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय होता. त्यांनी राजकारण केले पण त्यात प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठा जास्त होती. राजकारणातून समाजकारण हे त्यांचे सूत्र होते. त्यांचे चारित्र्यही निर्मळ होते. गावात त्यांचा खूप नावलौकिक होता आणि हेच बाळकडू मोहितला मिळाले होते तोही अगदी सचोटीने आणि प्रामाणिकपणे राजकारणात सक्रिय होता. देशमुखांकडे कोणी मदतीला आला आणि रिकाम्या हाताने गेला असे कधीच घडले नाही. साहजिकच साध्या सरळ रस्त्याला जसे गतीरोधक असतात तसेच काहीसे मोहितबाबत होते, म्हणजे सरळमार्गी व्यक्तीच्या वाटते विरोधक असतातच असतात. या वेळेस मोहित आमदारपदासाठी निवडणूक लढवू नये, असे बऱ्याच त्याच्या विरोधकांना वाटत होते म्हणूनच त्याला असे निनावी कॉल येत होते. घरी आल्यावर मोहित आपल्या वडिलांशी या विषयावर बोलला.
तेव्हा दिनकरराव म्हणाले, मोहित तुझा हा आमदार होण्यासाठीचा प्रवास इतका सोपा असणार नाही. बऱ्याच अडचणींना तुला तोंड द्यावे लागेल. विरोधकांना आपली हार झालेली पाहायची आहे, तुझ्या मार्गात ते आडकाठी आणणार. या अडचणींवर मात करतच तुला तुझे ध्येय प्राप्त करावे लागणार आहे. त्यात आपले हितचिंतक जरा जास्तच आहेत त्यामुळे आपला विजय नक्की आहे पण हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. तू मात्र तुझ्या मतावर ठाम रहा.
हो बाबा माझी पूर्ण तयारी आहे हे सगळं सोसण्याची आणि मी माघारही घेणार नाही. कितीही अडचणी येऊ देत मी डगमगणार नाही.
मग तर झालं तू तुझं काम करत रहा. पण सावधही रहा मोहित.
हो बाबा तुम्ही काळजी नका करू.
मोहित, त्याचे आई-बाबा, एक लहान भाऊ आणि बहीण तिचे लग्न झाले होते, असा परिवार होता त्याचा. घरातला मोठा मुलगा म्हणून मोहितवर सगळी जबाबदारी होती आणि हे इलेक्शन होईपर्यंत त्याला मोकळा श्वास घेणं थोडं कठीण होतं. मोहितने त्याचा मित्र डीएसपी अजयला कॉल केला आणि त्याला आलेल्या त्या धमकीच्या फोनची माहिती दिली.
अजय म्हणाला की, तो नंबर मला सेंड कर, मी पाहतो पुढे काय करायचं ते...
(क्रमशः)