STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Drama Romance

3  

Author Sangieta Devkar

Drama Romance

हैंग ओव्हर - भाग 2

हैंग ओव्हर - भाग 2

4 mins
359

मोहितने मैथिलीला तिच्या घरापर्यंत सोडले. मीतू वेळेवर औषध घे आणि काळजी घे. ओके मी उद्या भेटतो. हा, बाय मोहित. आणि ती फ्रेश व्हायला निघुन गेली. आज ती खुप खुश होती मोहित आज अचानक आला काय आणि हे असं घडले पण छान वाटत होते तिला. तिला लागले होते पण त्याचा त्रास मोहितलाच जास्त होत होता हे त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होते. रात्री पुन्हा मोहितने कॉल केला तिची चौकशी केली मग ती शांत झोपी गेली. सकाळी नेहमीप्रमाणे मीतू उठली आता दोन दिवस तिने रजा घेतली होती. थोड्या वेळात तिच्याकडे कामाला येणाऱ्या मावशी आल्या.

काय ओ ताई काय झालं हे काय लागलं?

अहो मावशी काही नाही थोडं काल गावात दंगा झाला ना तिथे लागले मला... काही काळजी करण्यासारखं नाही.

बरं ताई काय जादा काम असल तरी बी सांगा मला नाहीतर मी सांच्याला पन येऊ काय... तेवढच गरमगरम खायला करून देइन.

नको ओ मावशी मी ठीक आहे. तुम्ही त्रास नका करून घेवू. बरं मी लगोलग न्याहारी करते बसा तुम्ही. म्हणत मावशी कामाला लागल्या.


दाराची बेल वाजली तिला वाटलेच मोहित असणार तिने दार उघडले मोहितच होता, गुड़ मॉर्निंग जान हाऊ यू फील नाऊ?

मी छान आहे. फीलिंग बेटर ये ना आत मोहित.


तिने मावशींना आवाज दिला एक ग्लास पानी आना मावशी. मोहित आज पहिल्यांदा तिच्या घरी आला. मीतू एका 1 बीएचके फ्लॅटमध्ये रेंटने रहात होती. तिचे आई बाबा आणि छोटा भाऊ पुण्यालाच होते. मोहितने तिच्यासाठी एक येलो रोझेसचा बुके आणला होता. हे तुझ्यासाठी मीतू. ओह्ह थँक्स मोहित. तुला अजुनही लक्षात आहे की मला येलो रोझ आवडतात ते. हो मी काहीच विसरलो नाही ग जान अजुन एक सरप्राइजपन आहे तो म्हणाला. दे ना मग लवकर मोहित. तितक्यात मावशी आल्या.

ती म्हणाली मावशी हे मोहित देशमुख माझे मित्र आहेत. यांनीच काल मला दवाखान्यात नेले.

मावशीनी मोहितला नमस्कार केला.

काय घेणार तुम्ही चहा की कॉफी मावशी ने विचारले. नाहीतर जेवूनच जावा की.

नको नको आता फक्त कॉफ़ी आना जेवायला नंतर येईन मोहित म्हणाला.

बरं म्हणून मावशी किचनमध्ये गेल्या.


मोहित दे ना काय आणले आहेस तू.

अरे दम घे जरा लहान आहेस का मोहित मुद्दाम तिला चिडवू लागला.

पन माझ्यासाठी आणलेस ना मग. देतो थांब म्हणत मोहितने शर्टच्या खिशातून एक कॅडबरी डेयरी मिल्क काढली.

मोहित सो स्वीट ऑफ यू मीतू हसत म्हणाली.

त्याला माहित होते कॅडबरी हा मीतू चा वीक पॉइंट! त्याने हातात धरली होती कॅडबरी.

दे ना मोहित आता. देइन पण याच्या बदल्यात मला काय देणार स्वीटू? 

असे रे काय मोहित सांग काय पाहिजे तुला?

तसा मोहितने आपल्या ओठावर बोट ठेवले म्हणाला, हे पाहिजे मला.

तशी मीतू लाजली आणि नजर खाली घातली.

अरे वा पत्रकार मॅडम तुम्हाला लाजता पण येतं तो म्हणाला.

मोहित काय रे जा नको देवू मला कॅडबरी.

मैडम आम्ही कोल्हापूरकर आहोत शब्दाला जागनारे तुमच्यासाठी आहे ना हे चॉकलेट मग ते तुमचेच समजले का?

हो का दे मग म्हणत तिने त्याच्या हातातून चॉकलेट घेतले.


तो तिचा हात धरनार इतक्यात मावशी आल्या. दोघांनी कॉफी घेतली. मीतू म्हणाली मोहित ये ना तुला फ्लॅट दाखवते. ओके म्हणत मोहित उठला. हॉलला लागून गॅलरी होती आणि बाजूला बेडरूम होती.

मीतू म्हणाली कसे आहे घर?

छान आहे म्हणत मोहितने मीतूचा हात पकडला नि म्हणाला मग मीतू डार्लिंग मी चॉकलेट दिले ना आता माझे चॉकलेट दे.

त्याने तिला आपल्याजवळ ओढ़ले आणि अलगद तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले आणि प्रदीर्घ चुम्बन घेतले. खूप दिवसांनी त्यांनी एकमेकांचा स्पर्श अनुभवला. मीतूने त्याला घट्ट मिठी मारली नि म्हणाली, मोहित तू फक्त माझाच आहेस ना?

तिला अजुन घट्ट आपल्या मिठीत घेत तो म्हणाला, हो गं जान मी फक्त आणि फक्त तुझाच आहे कायम. तुला कधीही अंतर देनार नाही मी.

मीतू त्याच्या मिठीतून बाजूला होत म्हणाली, आय लव यू मोहित

आय लव यू टु मीतू असे म्हणत त्याने पुन्हा एकदा तिला किस केले.


हे बघ मी निघतो आता तू औषध वेळेवर घे आणि आराम कर मी कॉल करतो मोहित म्हणाला.

ओके बाय मोहित. आणि तो तिथुन निघाला. 


मावशी काम आवरुन निघुन गेल्या. मीतू बेडवर पडून मोहितचा विचार करत होती सकाळचा त्याचा सहवास आठवून ती पुन्हा पुन्हा एकटीच हसत होती. खूप छान वाटत होते तिला. इतक्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिले विक्रांत होता

हॅलो विक काय म्हणतोस

अरे मित्या कशी आहेस तू... आता जस्ट न्युज पहिली मी तुला जास्त लागले तर नाही ना?

नाही रे थोडं डोक्याला आणि हाताला लागले आहे बट डोन्ट वरी काल मोहित माझ्या पाठोपाठ होता म्हणून मला वेळेवर त्याने हॉस्पिटलला नेले.

ओहह दॅट्स ग्रेट. पण तू बरी आहेस ना.

हो एम फाईन. बर काळजी घे मी करेन कॉल पुन्हा बाय.

बाय विक म्हणत तिने कॉल कट केला.


विक्रांत तिचा कॉलेज फ्रेन्ड. ग्रॅज्युएशन होईपर्यंत ते एकत्र होते. अगदी बेस्ट फ्रेंड. ती त्याला विक म्हणायची आणि तो कायम मित्याच म्हणायचा तिला. नंतर त्याने लॉ केले आणि अॅडव्होकेट झाला. आता तो पुण्यात सायबर सेलमध्ये होता आणि मैथिलीने पत्रकारीता केली पन त्यांची मैत्री कायम होती. विक्रांतला मोहितबद्दल सगळ माहित होतं. रात्री पुन्हा मोहितने तिला कॉल केला. बराच वेळ दोघं बोलत होते. मग ते झोपी गेले.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama