Sangieta Devkar

Drama Romance

4.0  

Sangieta Devkar

Drama Romance

हारजित पर्व नवे (भाग 5)

हारजित पर्व नवे (भाग 5)

3 mins
336


त्याचं काय आहे ना सुमित मी राजकारणी माणूस त्यामुळे सगळ्या गोष्टीकडे मला लक्ष ठेवावे लागते. आणि कालची तुझी गाण्याची चॉईस पण छान होती आवडली मला.


मामा हसत होते. म्हणजे मामा तुम्ही पण काल त्या हॉटेलमध्ये होता.


हो सुमित माझी पण पार्टी होती.


मग आम्हाला आवाज का नाही दिला.


आवाज दिला असता तर तुमचं सिक्रेट कसे समजले असते मला.


असे होय ओके येतो आम्ही म्हणत सुमित प्रीती केबिनच्या बाहेर आले.


सुमित, ऐक ना प्रीतीने त्याला आवाज दिला. पण सुमित ऐकून न ऐकल्यासारखे करत पुढे गेला. केबिनमध्ये आला.


सुमित काय झालेय तुला असा का वागतो आहेस. तरी तो गप्पच होता. ओके तुला तो मोहित निंबाळकर खटकतो ना? मी त्याला आता सगळीकडून ब्लॉक करते मग तरी तुझे समाधान होईल ना! असे बोलून प्रीतीने पर्स मधून तिचा फोन काढला.


तसा सुमितने तो फोन आपल्या हातात घेतला म्हणाला, काही गरज नाही त्याला ब्लॉक करायची. असू दे नाहीतर मी खूप narrow minded पर्सन आहे असे तुला वाटेल.


नको सुमित दे माझा फोन काही गरज नाही. तुला आवडत नाही ना मग नको तो कुठेच ऐड.


प्रीती मी सांगितले ना राहू दे म्हणून आपले फोटो बघून जळू दे अजून तो.


सुमित यु आर जस्ट इम्पॉसिबल... इतकं बोलून ती तिथे चेयरवर बसली. सुमित सगळं इलेक्शनचे काम बघत होता. तसे कार्यकर्त्यांना काम सांगत होता. प्रीती मात्र तिचे काम करत शांत बसली होती. सुमितच्या वागण्याचा तिला काहीच अर्थ लागत नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर सुमित रोज प्रीतीला घरी सोडत असे. आजही तो तिला सोडायला निघाला. प्रीती आय एम सॉरी. तरी ती काहीच बोलली नाही. तो पुन्हा म्हणाला, प्रीती आय सेड सॉरी. नसेल बोलायचे तर राहू दे, म्हणत त्याने कार सुरू केली.


प्रीती रागात होती तिने आताही सीट बेल्ट लावला नाही. तिला ते लक्षात राहत नव्हते. सुमितने पाहिले ती तशीच बसली होती. मग त्यानेच तिचा सीट बेल्ट घेऊन तिला बांधला. तोही आता रागातच होता, एक तर तो सॉरी बोलला होता. तरी ही काहीच बोलत नवहती आणि त्यातून सीट बेल्ट लावला नाही मग तर कहरच!


प्रीती मी पुन्हा सांगणार नाही सारखं सारखं तू लक्षात ठेवून कारमध्ये बसल्या बसल्या सीट बेल्ट लावायचा समजले.


एक दिवस नाही लावला तर काहीही होत नाही. मी विसरले.


हे बघ काही होण्याची वाट बघत बसणार आहेस का तू, जे सांगितले ते लक्षात ठेव. पण प्रीती काहीच बोलली नाही कारच्या बाहेर ती पाहात राहिली. मग सुमितही शांतपणे कार चालवत होता. तिचे घर आले ती कारमधून उतरली आणि त्याला बायसुद्धा न म्हणता निघून गेली. सुमित मनातच म्हणाला इतका राग असेल तर बसू दे मी पण नाही बोलणार. आणि तो घरी आला.


प्रीतीला घरी आल्यावर वाईट वाटू लागले की आपण सुमीतशी बोललो नाही. आणि इकडे सुमित तिच्या बोलण्याची वाट पाहात होता. दोघांना एकमेकांशिवाय चैन पडेना. मग सुमितनेच प्रीतीला कॉल केला, हॅलो प्रितु जेवलीस का?


नाही अजून, तू जेवला का?


नाही प्रीती अजून रागावली आहेस माझ्यावर?


तसे प्रीतीला त्याची जरा मस्करी करू वाटली, ती बोलली, हो अजून राग नाही गेला माझा.


हो का मग लगेच कॉल रिसिव्ह का केलास.


ते असंच तुझी दया आली ना म्हणून.


अच्छा मग अजून तू रुसलीच आहेस माझ्यावर.


हो खूप राग आला आहे तुझा.


ठीक आहे तुझा राग जात नाही तोपर्यंत मी जेवणार पण नाही. असे म्हणून सुमितने फोन कट केला. प्रीतीला समजेना असा काय हा. म्हणून तिने परत त्याला कॉल बॅक केला तर सुमित लवकर कॉल घेईना तिचा. तिला माहीत होते तो खूप हट्टी आहे तो खरंच जेवणार नाही. तिने पुन्हा त्याला कॉल केला बराच वेळ रिंग होत होती मग थोड्या वेळाने सुमितने कॉल घेतला.


म्हणाला, बोल का फोन करतेस?


सुमित अरे किती राग आहे तुला? मी काय बोलते जरा ऐकून तरी घ्यायचं लगेच कॉल कट केलास.


मग काय करू तुला माझा राग आला आहे ना आणि मला नाही जमत ते रुसवा काढत बसायला.


हो का आणि काय हे नाटक जेवणार नाही वगैरे.


हो मला भूक नाही म्हणून.


भूक नाही ना मग मीही जेवणार नाही, ओके. ती ही रागात बोलली.


ये प्रितु असे काही नाही करायचे तू जेवणार आहेस तुला माझी शपथ आहे.


तू जेवणार असशील तरच मी जेवेन समजले.


बरं बाई जेवतो मी. आणि मीही तुझी चेष्टा करत होते मॅड आहेस.


हो आहे मी मॅड. बरं जेव जा आता इतके बोलून प्रीतीने फोन ठेवला. तिला समजून चुकले की सुमित किती हट्टी आहे आणि त्याला रागही जास्तच येतो. तिच्यासाठी तो खरंच वेडा होता. म्हणूनच मोहित कुठे तरी त्याला खटकत होता. पण मोहित कसा आहे हे फक्त प्रीती जाणुन होती.

 

क्रमश...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama