हारजित पर्व नवे (भाग 4)
हारजित पर्व नवे (भाग 4)
सुमीतने आपले ओठ तिच्या ओठांवर अलगद ठेवले आणि तिचे दीर्घ चुंबन घेतले. प्रीती ने त्याला घट्ट मिठी मारली. मग जाऊ ना आता मी प्रितु त्याने विचारले. ती मिठीतुन बाजूला होत म्हणाली, हो उद्या भेटू ऑफिसला ओके गुड नाईट. गुड नाइट जान तो म्हणाला. प्रीती कार मधून उतरून तिच्या घरा कडे चालली. मग सुमित ही निघाला. रात्री प्रीती ला झोप येईना सारखी सुमित ची आठवण तिला होत होती. त्याचा स्पर्श,त्याची मिठी पुन्हा पुन्हा तिला आठवत होती. त्याच्याच आठवणीत केव्हा तरी तिला झोप लागून गेली. इकडे सुमित ला ही झोप लागत नवहती. प्रीती ची आठवण त्याला ही छळत होती. आज पहिल्यादा त्याने तिला स्पर्श केला होता तिला किस केले होते. खूप खुश होता सुमित त्याच प्रेम त्याच्या सोबत होत. तिच्या विचारात तो ही झोपून गेला.
सकाळी प्रीती आपले आवरून ऑफिसला जायला निघाली. आता दोन दिवसांवर निवडणूक आली होती. काय होईल काही सांगता येत नव्हते. काल हॉटेलमध्ये तिचा आणि सुमित चा काढलेला सेल्फी तिने एफ बी वर पोस्ट केला सुमित ला ही शेयर केला होता. लगेचच तो फोटो मोहीत ने लाईक केला. सुमित ने ते पहिले त्याला राग आला मोहीतचा. पण प्रीती ने याला अजून फ्रेन्डलिस्ट मध्ये ठेवला आहे याचा जास्त राग आला. त्याने प्रीती ला कॉल लावला,हॅलो निघाली का तू ऑफिसला ? हो सुमित पाच मिनिटांत निघेन. अजून एक तो मोहित तुला अजून ही एफ बी वर अँड आहे? सुमित काय झाले तो माझा मित्र म्हणून राहू शकतो ना? तो चुकीचा वागला म्हणून आपण लगेच त्याला ब्लॉक करायचं असे नसते. प्रीती अजूनही त्याच्या बद्दल तुला सॉफ्ट कॉर्नर आहे इतके होऊन सुद्धा! सुमित तू असा विचार का करतोस? मग कसा करू सांग . सुमित मी तुला
खूप वेगळा समजत होते तू मला माझी स्पेस देणारा मला समजून घेणारा, तू असा विचार का करतोस? प्रीती आज त्याने तुझा फोटो लाईक केला उद्या चाट सुध्दा करेल तुज्याशी. सुमित अरे त्याने आपल्या दोघांचा फोटो लाईक केला आहे . मला नाही आवडले ते ओके. सुमित आता तू खरच जलस फील करतो आहेस हे चुकीचे आहे. प्रीती यावर मला काही बोलायचेच नाही बाय म्हणत त्याने फोन ठेवला. प्रीतीला समजेना की हा असा का रिऍक्ट करतो आहे. मान्य आहे मोहित तिचा एक्स बॉयफ्रेंड होता पण आता त्याचे लग्न झाले आहे. मी सुमितला होकार दिला आहे तरी ही हा असा का वागतो . ती आवरुन बाहेर पडली. सेनेच्या कार्यालयात आली. सुमित अगोदरच आला होता. ती ही सुमित च्या केबिन मध्ये बसत असे. हॅलो सुमित कधी आलास तू? झाले दहा मिनिटं. तो रागातच दिसत होता पण प्रीती ने लक्ष नाही दिले.
थोडयाच वेळात मामांनी म्हणजेच आमदार साहेबांनी त्या दोघांना आपल्या केबिनमध्ये बोलावले. मामा म्हणाले,सुमित आता दोन दिवसांनी निवडणूक आहे तेव्हा प्रीती आणि तू जास्त बाहेर जाऊ नका. आणि सुमित प्रीती कडे लक्ष दे तू कारण विरोधकाना कधी काय सुचेल आणि काय डाव करतील आपल्याला नाही समजणार. हो मामा माझे आहे लक्ष तुम्ही काजळी नका करू. प्रीती कडे पहात मामा बोलले काय मग प्रीती तुझ्या घरी तुझ्या आई बाबांना भेटायला कधी येऊ आम्ही सगळे. तशी ती लाजली म्हणाली, तुमची इच्छा मामा कधी ही या. सुमित म्हणाला,पण मामा तुम्हाला कसे काय समजले? त्याच काय आहे ना सुमित मी राजकारणी माणूस त्यामुळे सगळ्या गोष्टी कडे मला लक्ष ठेवावे लागते . आणि काल ची तुझी गाण्याची चॉईस पण छान होती आवडली मला. मामा हसत होते.
क्रमश.....