हारजीत
हारजीत
आज शहरातील प्रमुख नेत्यांची मिटिंग होती. या मध्ये आमदार साहेब,महसूल मंत्री,पालकमंत्री,सगळेच आपल्या पक्षातील मुख्य सभासदा सोबत हजर राहणार होते. जो तो आपला पक्ष कसा आहे,चांगले काम कोण करत याच प्रेझेंटेशन करणार होता. प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता पूर्ण तयारीनिशी इथे आला होता. आमदार साहेब ,त्यांचा भाचा सुमित आणि त्यांच्या प्रवक्त्या प्रीती त्यांची सेने ची संपूर्ण टीम अगदी पूर्ण तयारीने आले होते. पण प्रीती ची बाहेर इतक्या लोकांसमोर बोलण्याची ही पहीलीच वेळ होती. त्यामुळे तिला थोडे टेन्शन आले होते. पण सुमित होता तिच्या सोबत सो ते दोघ प्रेझेंटेशन देणार होते. अकरा वाजता मिटिंग सुरु होणार होती. प्रीती नोट्स काढून ते वाचण्यात मग्न होती. तेव्हा सुमित तिला पाहून म्हणाला,प्रीती डोन्ट बी टेन्स,,रिलॅक्स ती म्हणाली,अरे इतक्या लोकांसमोर मी फर्स्ट टाइम् बोलणार ना म्हणून थोड टेन्शन आले आहे. अग,मी आहे ना का काळजी करतेस? ठेव ते पेपर बाजूला आपण काही परीक्षा द्यायला नाही आलो असं म्हणत सुमित ने तिच्या समोरचे नोट्स उचलले. प्रीती त्याच्या कडे पाहून हसली. मिटिंग सुरु झाली, एकएक पक्ष त्यांचा प्रवक्ता आपआपले पक्षाचे काम, माहिती,भविष्यातील योजना यांचे प्रस्ताव सादर करू लागले.
आता प्रीती आणि सुमित स्टेज वर आले,सुमितने सुरवात केली. तो विद्यार्थी सेने चा प्रमुख होता सो विद्यार्थ्यांच्या गरजा,अँडमिशन,कॉलेज याबद्दल बरच बोलला,प्रीतीनेही चांगले प्रेझेंटेशन दिले. तिचे बोलणे खरंच छान होते,म्हणूनच सुमित ने तिला आपल्या पक्षात सेनेची प्रवक्ता म्हणून घेतले होते. ते दोघे बोलून आपल्या जागेवर आले. प्रीती चे सहज बाजूच्या टेबल कडे लक्ष गेले,आणि ती किंचित दचकली,बाजूलाच मोहित बसला होता. तिने पुन्हा नीट पहिले,तो मोहितच होता. तो तिच्या कडे पाहून हसत होता. त्याने तिचे प्रेझेंटेशन ऐकले होते. तेव्हाच तो आला होता. पण ती बोलण्यात गुंग होती सो तिचे त्याच्या कडे लक्ष गेले नाही. आता ही तो तिच्या कडेच पाहत होता,ब्लु जीन्स आणि फुल व्हाईट शर्ट मध्ये तो खूपच रुबाबदार दिसत होता. पण हा इथे कसा हा प्रश्न तिला पडला होता. इतक्यात सुमित ने तिला बस म्हणून खुणावले,तशी ती भानावर येत खुर्चीत बसली. मोहित उठला आणि स्टेजवर गेला. त्याने आपली ओळख करून दिली,तो भाजप चा कार्यकारी सदस्य होता. पाचगाव,कंदलगाव,या गावचे काम तो पहात होता. आता तिला समजले की तो सुद्धा राजकारणात आला होता तर!! तो ही चांगलाच बोलला,त्याचे बोलणे पहिल्या पासूनच तडफदार,स्पष्ट,आणि अचूक पटवून देणारे होते. हे तिला माहीतच होते ना,,आफ्टरऑल तिच्या मह्यु ला तिच्या पेक्षा जास्त कोण ओळखत होते? हो तिचा मोहित प्रेमाने ती त्याला मह्यु म्हनायची. पाच वर्षे एकत्र होते ते जीवापाड प्रेम केले होते एकमेकांवर,पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यातलं नातं संपून गेलं होतं,दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले होते. त्याला पाहून ती अस्वस्थ झाली होती. तिथे तिचे लक्ष लागत नव्हते ,शून्यात नजर लावून बसली होती ती,मोहित कधीच त्याच्या जागेवर जाऊन बसला होता. तिची अस्वस्थता सुमितच्या नजरेतून सुटली नाही,त्याने हातानेच इशारा करत तिला विचारले,काय झाले? तिने फक्त काही नाही अशा आशयाने मान हलवली. मिटिंग संपली,आमदार साहेबांनी सुमित ला बोलावले,तो तिकडे गेला,प्रीती एकटीच टेबला जवळ होती,मोहित तिथे गेला,म्हणाला,प्रीती कशी आहेस? ठीक मजेत.... तू कसा आहेस? आणि हे भाजप सदस्य कधी झालास? तो म्हणाला,मी पण ठीक आहे चार महिने झाले मला भाजप ने हे पद दिले. तू इथे भेटशील असे स्वप्नात पण नाही वाटले,तू एकदम राजकारणात कशी?
सुमित माझा बेस्ट फ्रेंड आहे,आमदार साहेबांचा भाचा,त्यानेच मला सेनेत घेतले,आणि तसे ही काही आठवणी विसरण्या साठी या रुक्ष राजकारणात येण,कधीही चांगलेच नाही का मोहित?? मोहित काही बोलणार इतक्यात सुमित आला म्हणाला,प्रीती चल,मामा बोलवतात तुला. मोहित ला एक्सक्युज मी म्हणत ती सुमित सोबत गेली. पाठमोऱ्या जाणाऱ्या प्रीती कडे भरल्या डोळ्याने तो पहात राहिला. डोळ्यातील पाणी आणि आठवणी इतकंच तर त्याच्या प्रेमाची निशाणी मागे उरली होती.
सुमित प्रीती सेनेच्या कार्यालयात आले,साहेबानी प्रीती चे खूप कौतुक केले,तिचे प्रेझेंटेशन छान झाले होते,सुमित ने कॉफी मागवली,,कॉफी घेऊन ते घरी जाणार होते,सुमित तिला म्हणाला,प्रीती तू इतकी डिस्टर्ब का दिसत होतीस,तुझे लक्ष नव्हते,
सुमित कुठे काय,मी फक्त शांत बसले होते.
काहीपण नको बोलुस मी पाहिले होते तुझ्या चेहऱ्यावर रंगच उडून गेला होता. खूप टेन्स दिसत होतीस,काय झाले होते?
अरे काही नाही,सुमित तुझा गैरसमज होतोय काहीतरी.
प्रीती मी तुझ्या चेहऱ्या वरची रेघ आणि रेघ वाचू शकतो काय,,मी पॉलिटिशन जरी असलो तरी त्या आधी मी एक लॉयर आहे हे विसरू नकोस..
माहित आहे तू लॉयर आहेस. असं म्हणत प्रीती हसली.
हसू नकोस उगाच काय ते सांग.आता सुमित पासून काही लपवणे ठीक नाही हे समजून ती म्हणाली,सुमित तो भाजप चा कार्यकर्ता मोहित निंबाळकर ,,,हा त्याचे काय ? सुमित बोलला,
तो मोहित म्हणजेच माझा,,तिला मध्येच तोडत सुमित म्हणाला अच्छा अच्छा तुझा मोहित तो हाच मोहित असे होय..
होय सुमित ,सो आय एम डिस्टर्ब.
ओह,देन व्हाय यू डिस्टर्ब? आता तर आणखीनच मजा येणार या खेळात.
तशी प्रीती म्हणाली,सुमित काय बोलतोस,खेळ काय,मजा काय,काय विचार आहे तुझा,?
अग,प्रीती राजकारणाच्या पटलावर समोर जर आपला शत्रू असेल तर भारी रंगतो हा खेळ.
प्लिज सुमित,काही हि बडबडु नकोस. मोहित चा आणि तुझा काहीच संबंध नाही,त्यामुळे कसले ही डावपेच करायचे नाहीत. ती थोडे रागानेच बोलली.
सॉरी प्रीती,मी हेच पाहात होतो की रादर यू हेट हिम,ऑर स्टील लव्ह हिम,,ऍण्ड आय रियलाइज दयाट यू लव्ह हिम असे म्हणत सुमित ने एक दीर्घश्वास घेतला.
तसं काही ही नाही सुमित ,माझा त्याचा आता काहीही संबंध नाही. तुला सगळं माहित आहे तरी असे का बोलतोस.?
मग इतकी अस्वस्थ का होतेस तू प्रीती,?
सुमित किती ही झाले तरी एकेकाळी माझं त्याच्यावर प्रेम होत.त्यामुळे थोडं मन अस्वस्थ होणारच ना!
कशासाठी पण ? त्याने तुला त्याच्या आयुष्यातून सहज बाहेर काढुन टाकले ,त्याच्यासाठी तू का अस्वस्थ होतेस?
प्रीतीला त्याचा रोष समजत होता,सुमित खूप आधी पासून तिच्या प्रेमात होता,त्याला स्वप्नात पण वाटले नव्हते की आपण त्याच्या प्रपोजल ला नकार देऊ,जेव्हा तिने मोहित आणि तिच्या रिलेशन बद्दल सांगितले तेव्हा एकदम शांतपणे तो बाजूला झाला मात्र सच्च्या मित्राचे कर्तव्य पार पाडत राहिला तिला गरज लागेल तेव्हा तिच्या मदतीला धावून यायचा. तिचा शब्द प्रमाण मानायचा आणि जेव्हा तिचा मोहित शी ब्रेकअप झाला ,तेव्हा तिला अश्रू ढाळायला सुमित चाच हक्काचा खांदा होता. तेव्हा तो म्हणाला,प्रीती आता एकदाच रडून घे भरपूर पुन्हा या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं. ज्याला तुझी,तुझ्या प्रेमाची कदर नाही अश्या माणसा साठी अश्रू वाया घालवायचे नाहीत समजलं. अशा दोस्तीच्या हक्काने सुमित ने तिला दटावले होते.
सुमित म्हणाला,हे बघ प्रीती राजकारण आणि पर्सनल लाईफ या मध्ये कधी सरमिसळ करायची नाही,इथे भावनांचा विचार करायचा नाही. खूप कठोर पणे निर्णय घ्यावे लागतात.
हो ना मग तू ही तसंच कर सुमित माझं आणि मोहित च जे होत,ते संपलय आता सो इथे त्याचा काही संबंध नाही.
नाही ना संबंध ,मग का डिस्टर्ब होतेस तू प्रीती? सुमित तिच्या हातावर थोपटत म्हणाला,डोन्ट वरी तुला त्रास होईल असे काही ही मी करणार नाही पण तू रिलॅक्स रहा,ओके. ती काही नाही बोलली.
प्रीती घरी आली बेडवर डोळे बंद करून पडून राहिली,पण डोळया समोरून मोहित चा चेहरा बाजूला होतच नव्हता,त्याच्या आठवणी ,त्याच बोलणं,सगळंसगळं तिला आठवत राहील. मन खूप उदास झालं. डोळे आपोआप पाझरू लागले . आता कुठे ती या धकक्यातून सावरत होती. पुन्हा मोहित च तोंड पाहायचे नाही असे तिने ठरवले होते,पण नियतीने पुन्हा एकदा त्याला तिच्या समोर आणून उभे केले. त्याचे नाही माहित तिला,,पण तिने मात्र त्याच्यावर जीवापाड प्रेम केले होते,कसे आपण स्वहताला त्याच्या पासून दूर ठेऊ शकणार आहोत हाच प्रश्न तिला सतावत होता. तिचा फोन वाजला,अननोन नंबर होता,कामाचा असेल म्हणून तिने घेतला,,,हॅलो,प्लिज प्रीती फोन कट करू नकोस. मी मोहित बोलतोय.
काय काम आहे बोल
मला भेटायचे आहे तुला प्लिज एकदा भेट
आता काय भेटण्या सारखं राहिलंय मोहित?
थोडा वेळ ये,मला बोलायचे आहे प्लिज,मोहित तिला खूपच विनवणी करू लागला. तेव्हा ती म्हणाली,ठीक आहे,पण सारखं सारखं मी तुला भेटायला येणार नाही समजलं.
ओके,प्रीती अँड थॅंक यू. संध्याकाळी भेटू मी एस एम एस करतो तुला बाय,, म्हणत त्याने फोन ठेवला.
तिला समजेना की याला आता काय बोलायचे आहे बोलण्यासारखं काही उरलं पण नव्हत . मोहित चा एस एम एस आला,@ 6 pm at हॉटेल सारथी मंगळवार पेठ. तिने त्याला ओके असा मेसेज केला.
तिचा फोन पुन्हा वाजला,पहिले तर सुमित चा होता,तिने उचलला,,बोल सुमित,
अग संध्याकाळी ऑफिस ला ये,मामांनी बोलावले आहे.5,30 पर्यंत ये.
पण सुमित माझे थोडे काम होते,थोडं उशीरा आले तर चालेल का?
व्हाय,,? काय काम आहे ?
काम असे काही नाही,मोहितने भेटायला बोलावले आहे सो.मोहित चे नाव ऐकून सुमित ला राग आला.
तो रागानेच बोलला,त्याला कशाला भेटायचे? आर यू मॅड प्रीती? काय अर्थ आहे का याला.
अरे त्याला काही बोलायचे आहे म्हणून ये म्हणाला.
आणि तू लगेच तयार झाली.
नाही सुमित त्याने खूप विनवणी केली.
अच्च्छा,तुला कळतय का,त्याला भेटणे तेही एकटीने हे सेफ आहे का प्रीती?
अरे सुमित तो मला का त्रास देईल
कारण आता तू त्याच्या विरोधी पक्षात काम करतेस,तुला समजत कसे नाही.
पण मला तसे नाही काही वाटत ,तो तितका रुड नाही.
म्हणजे तू तयारी केलीच आहेस त्याला भेटायची,पण मी तुला एकटीला नाही जाऊ देणार.
सुमित,मी काय लहान आहे का? तो काही करू शकणार नाही,रादर करणार नाही.
ओह,,इतका विश्वास,,तो उपहासानेच म्हणाला.
ते काही नाही,मी तुझ्या सोबत येणार.
पण हे बरोबर नाही ना सुमित!!
मी सोबत येतो आणि कार मध्येच बसतो ओके,पण तू एकटी नाही जायचेस.
बरं ये सारथीला जायचे सहा वाजता.
ओके येतो मी.
प्रीतीला समजत होते,सुमित ला तिची खूप काळजी वाटते,या काळ्जीपोटीच तो सोबत येतो म्हणाला. त्याच तिच्यावर प्रेमही तितकंच खरं आणि निरागस आहे,हे ही तिला समजत होते. पण तिनेच त्याच्या कडे थोडा वेळ मागितला होता. संध्याकाळी सुमित प्रीती सारथीला आले,तो कार मध्येच बसून राहिला,तिला म्हणाला काही वाटलं तसंच तर मला कॉल कर. होय,नको इतकी काळजी करू.असे म्हणत ती हॉटेल कडे आली,हॉटेल च्या दारातच मोहित तिची वाट बघत होता, तिला पाहून हसला म्हणाला,चल आत जाऊ. एका रिकाम्या टेबल कडे ते आले मोहितने विचारले,काय खाणार तू प्रीती,नेहमीचे तुज्या आवडीचे सँडविच घेणार का? नको,फक्त कॉफी सांग,,ती बोलली.
मोहित ने दोन कॉफी ची ऑर्डर दिली,तो म्हणाला,हे बघ प्रीती,मी तुला यासाठी बोलावले की आपल्यात आता कोणतं नातं नाही, म्हणून त्याचा रोष तू मनात ठेवू नकोस,आपण या राजकारणा मूळे कुठे ना कुठे सतत भेटत राहणार त्यामुळे उगाच एकमेकां बद्दल वैर किंवा कटुता बाळगायला नको.
मला माहित आहे,तुझ्या बद्दल माझं काहीही मत असलं,तरीही त्याचे सावट माझ्या वागण्यातून कधी नाही दिसणार,मी प्रेम केलं होत तुझ्यावर,तुझा तिरस्कार करण मला कधीच जमणार नाही.तिला मध्येच तोडत तो म्हणाला,आय नो प्रीती आय विल हर्ट यू सो मच. पण मी काही करू शकत नव्हतो,माझ्या कडे दुसरा पर्याय नव्हता . तू समजू शकतेस.
मोहित मागचे सगळं बोलायला मी इथे आलेली नाही. तो विषय पण काढु नकोस.
सॉरी प्रीती पण तुला त्रास होईल असं माझ्या कडून काहीही होणार नाही. आफ्टर ऑल यू आर माय विकनेस नाऊ अ डेज स्टील. तू माझे पाहिलं प्रेम होतीस आणि कायम राहशील.
प्लिज मोहित या बालिश गप्पा पुरे कर तुझे बोलून झाले असेल तर निघूया आपण.
प्रितु व्हाय डोन्ट यू अंडरस्टॅन्ड मी.? तुला पहिले की आज ही मी कमजोर पडतो,आय फील गिल्टी रिअली.
मोहित स्टॉप इट नाऊ,काही समजण्याच्या आणि समजून घेण्याचा पलीकडे गेलीय मी,सो मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस मोहित .तो हसत तिच्या कडे पहात राहिला,कारण मोहित कायम हे वाक्य बोलायचा आणि आज हेच वाक्य प्रीती बोलली होती जे तिला आवडत नव्हतेे. तिच्या हे लक्षात आलं तसे ती म्हणली,
नाही ते सवयीने आले असेल,बाकी काही नाही.
प्रीती काही सवयी या जन्मभर आपल्या सोबत राहतात,नाही सुटत त्या इतक्या सहजासहजी..
मोहित मी निघते आता,ती बोलली.
हो,फक्त इतकंच सांगायचे होते की ,इथे सांभाळून राहा डावपेच खेळणारे खूप जन असतात आणि माझ्या पासून तुला कोणताच त्रास नाही होणार
ओके,तू नको माझी काळजी करू,मी पाहीन
अच्छा,ओह्ह,तुझी काळजी घेणारा आहे नाही का?
मोहित,,उगाच काही ही बडबडू नकोस बाय,,खाली सुमित आला आहे मी जाते.
ओके बाय,टेक केयर अँड रिमेम्बर आय ऑलवेज मिस यू लॉट..
प्रीती झटकन खाली आली,तिला पाहून सुमितने कार तिच्या दिशेने घेतली तिच्या जवळ येत त्याने दार उघडले ,ती आत बसली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता. तो काही बोलला नाही,ती म्हणाली सुमित मला घरी सोड.
ठीक आहे म्हणत त्याने कार सुरु केली,एफ एम चालू केले,तर जगजीत सिंग ची गजल लागली होती,"
कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे
तूने आँखों से कोई बात कही हो जैसे
जागते जागते एक उम्र कटी हो जैसे
जान बाकी है मगर साँस रुकी हो जैसे,,,तिने पटकन रेडिओ बंद केला,सुमित म्हणाला,का ग तुझ्या आवडीच्या जगजीत ची गझल होती ना,,मग बंद का केलेस.
ती म्हणाली,सुमित मला नाही ऐकायची ,का जबरदस्ती आहे तुझी?
तो म्हणाला,माझी जबरदस्ती असती तर कधीच तुझ्या कडून होकार मिळवला असता ,असा वाट बघत थांबलो नसतो.
सॉरी पण माझा आता मूड नाहीये गाणं ऐकायचा .
बरं शांत बस. सुमित बोलला.
तुझी इच्छा असेल तर सांग,काय म्हणाला मोहित निंबाळकर?
काही नाही जुनीच कॅसेट पुन्हा रिवाइन्ड करत होता.
म्हणजे? मला नाही समजले.
म्हणत होता,आपला ब्रेकअप झाला त्याचा राग मनात ठेवू नकोस माझ्या कडून तुला काही त्रास होणार नाही आपण आता सारखं भेटत राहणार सो त्याचा आणि आपल्या कामाचा संबंध जोडू नको असे.
शहाणा आहे तर,,आणि त्याने त्रास दिला तर आम्ही काय इथे बांगड्या भरल्या आहेत का हातात?
सुमित तसे नव्हते म्हणायचे त्याला,
मग कसे? त्याने विचारले
तो म्हणाला आजही तू माझा विक पॉईंट आहेस,तुला पाहिले की मी खचून जातो आय फील गिल्टी.
ओह्ह मग इतके प्रेम होते तर ब्रेकअप का केलं त्याने?
हेच त्याचा नाईलाज होता पर्याय नव्हता त्याच्या कडे
अरे वा,आता बरे हे त्याला बोलायला सुचते, हे का नाही सांगत की तुझी कास्ट वेगळी त्याची वेगळी सो त्याच्या घरच्यांनी तुला स्वीकारले नाही,आता कोणत्या तोंडाने हा बोलतो नाईलाज होता म्हणून,हरामखोर,,इतकं म्हणत सुमित थांबला ,त्याच्या तोंडात शिव्या येत होत्या पण प्रीती कडे पाहून गप्प बसला.
जाऊ दे ना सुमित नको इतका त्रागा करून घेऊस. तिच्या घरापर्यंत येईपर्यंत ते काहीच बोलले नाहीत.
सकाळी नेहमी प्रमाणे प्रीती कार्यालयात आली सुमित लवकरच यायचा,तिला पाहून म्हणाला,गुड मॉर्निंग प्रीती,हाऊ आर यू?
मॉर्निंग सुमित आय एम फाइन.
सुमित म्हणाला ,प्रीती नेक्स्ट विक आपल्याला कॉन्फरन्स साठी मुंबई ला जावे लागणार आहे.
सुमित मी यायला हवे का?
म्हणजे,अग तू तर मेन आहेस आता,आमच्या पक्षाची स्पिकर नको का? काही अडचण आहे का ?
अडचण नाही पण,,,
ओ आय नो तो मोहित पण असणार सो पुन्हा तू डिस्टर्ब होणार असेच ना?
हो,सुमित म्हणूनच,
पण मी कालच तुला बोललो ना,इथे भावनांना महत्व द्यायचे नाही फक्त कर्तव्य काय!!
ओके आय विल ट्राय माय बेस्ट,ती म्हणाली.
पुढच्या विक मध्ये सुमित प्रीती आणि इतर सदस्य मुंबई ला गेले.मोहित ही आलाच होता. सुमित प्रीतीला अजिबात एकटे सोडत नव्हता सतत तिच्या सोबत होता जेणेकरून मोहित तिच्या पर्यंत येऊ नये बोलू नये यासाठी. प्रीतीला सुमित चे वागणं जाणवत होते पण ती काहीच बोलली नाही. मिटींग ला जेवण,चहा यावेळेस सगळे एकत्र असायचे ,मोहित दुरूनच तिला पहात राहायचा. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सुमित कायम सावली सारखा तिच्या सोबत होता. दोन दिवस ते सगळे मुंबईत होते,वेळ मिळेल तसा सुमित आणि प्रीती ने तिथे फिरून घेतले . थोडे शॉपिंग ही केले. या दरम्यान प्रितीने अनुभवले की सुमित तिची हर प्रकारे काळजी घेत होता तिला त्रास होणार नाही याकडे लक्ष देत होता. न बोलता शांतपणे एखाद्यावर कसे प्रेम करता येते हेच सुमित च्या वागण्यातून दिसत होते. सेमिनार संपल्यावर सगळे कोल्हापूर ला परत आले.
कार्यालयात साहेबांनी ताबडतोब सुमितला बोलावून घेतले होते तो त्यांच्या केबिन मध्ये आला,म्हणाला काय झाले मामा,इतके अर्जेन्ट का बोलावले?
तू बस आधी मग सांगतो,मामा म्हणाले.
सुमित मामांच्या समोर खुर्चीत बसला.
मामा म्हणाले,हे बघ सुमित आपला वॉर्ड हा राखीव झाल्याचे आताच मला समजले,आणि तो महिला उमेद्वारां साठी आहे तेव्हा तुला आता निवडणुकी साठी नाही उभे राहता येणार.
ओके मामा चालेल मला,मग महिला उमेदवार कोण आहे का आपल्याकडे ?
अशी एक उमेदवार आहे आपल्या पक्षात जी हुशार पण आहे.
कोण ? तुम्ही ओळखता तिला?
हो सुमित ,तू ही ओळखतो तिला,आपल्या वॉर्ड मधून आपण प्रीतीला उभे करायचे.तुला काय वाटते?
दयाटस ग्रेट मामा,,पण ती तयार व्हायला हवी ना?
ते काम आता तुझं तू तिला तयार कर ,ती खरच लायक आहे या पदा साठी.
बघू मी बोलून बघतो तिच्याशी.
सुमित आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ,लवकर हालचाल कर,ओके.
हो मामा म्हणत तो केबिन बाहेर आला.त्याने पाहिले अजून प्रीती आली नव्हती,सो त्याने तिला कॉल केला,
हॅलो प्रीती येतेस ना ऑफिस ला?
होय ऑन द वे आहे आलेच,,म्हणत तिने कॉल बंद केला.
दहा मिनिटात प्रीती ऑफिस ला आली,सुमित त्याच्या केबिन मध्ये बसला होता प्रीती तिथेच गेली दोघ इथंच एकत्र काम करायचे,प्रीती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली.
सुमित म्हणाला,प्रीती मला आपल्या वॉर्ड मधून उमेदवारी नाही करता येणार,
का ,काय प्रॉब्लेम आहे?
हो,आपला वॉर्ड हा महिला उमेदवार साठी राखीव झाला आहे.
मग आता काय ठरवले आहेस तू?
मी आणि मामांनी असे ठरवले आहे की आपल्या पक्षातून तुला उभे करायचे निवडणुकी ला.
काय? नाही सुमित मला नाही जमणार.
का नाही जमणार,तू हुशार आहेस आणि या पदा साठी लायक पण आहेस.
तरीही नको सुमित मला नाही जमणार ही जबाबदारी प्लिज.
अरे पण अडचण काय त्यात,तुझ्या इतकी कोणी हुशार उमेदवार नाही आपल्या कडे आणि मी पाहीन सगळं कामच ,तू नको काळजी करू.
पण सुमित....तिला मध्येच थांबवत तो म्हणाला,काही पण बिन नाही ,आपल्या कडून कोणी उमेदवार नसेल तर विरोधी पक्ष आपल्यावर हसायला मोकळे,ते चालेल तुला,प्लिज प्रीती माझ्या साठी.
बरं,सुमित तू म्हणतोस तर मी तयार आहे.
गुड,मग हा फॉर्म भरून टाक लगेच असे म्हणत त्याने उमेदवारी चा फॉर्म तिच्या समोर ठेवला,तो तिने भरला.
तसा सुमित म्हणाला,थँक यू सो मच,,
आता रोजच कार्यालयात येणं,कामाची रुपरेषा,विभागणी करणे क्रमप्राप्त होते सो प्रीती रोज कार्यालयात यायची. सुमित सोबत काम करताना तिला छान वाटायचे,त्याचे विचार ,समाजा बद्दल त्याची असणारी जबाबदारी निष्ठा याने ती भारावून जायची. तिला ही समाजसेवा करायची खूप इच्छा होती. इथे सगळा स्वच्छ कारभार होता,मुळात आमदार साहेबच कामाप्रती निष्ठावान होते त्यामुळे पक्षात हेवेदावे,फसवणूक असे काही घडत नव्हते. केबिन मध्ये सुमित आणि प्रीती बोलत बसले होते तर त्यांचे दोन कार्यकर्ते तिथे आले,आणि म्हणाले सुमित भाई हा पेपर पाहिला का?
का रे अस काय आहे पेपर मध्ये.त्याने तो पेपर सुमित पुढे ठेवला,सुमितने पाहिले त्यात एक मोठे पोस्टर होते ,भाजपा मधून निवडणुकी साठी कर्तबगार महिला उमेदवार सौ शैलजा मोहित निंबाळकर ,असे ते होर्डिंग होते. सुमितने तो पेपर प्रीती कडे सरकवला म्हणाला,बघ,,तिने तो पेपर पाहिला,त्या पोस्टर मध्ये एका बाजूला मोहित चा फोटो तर दुसऱ्या बाजूला त्याच्या बायकोचा फोटो होता. ती काहीच बोलली नाही. तेव्हा सुमित म्हणाला,आता खरी मजा येणार,हा खेळ खेळायला बघूयाच कुणामध्ये किती दम आहे तो.
प्रीती म्हणाली ,सुमित मी मागेच तुला बोलले ना,,
होय मला माहित आहे पण बघ तू उभी राहिलीस ते एका अर्थी चांगलेच झाले,कोण समजतो तो स्वहताला,,त्याला चांगले प्रत्युत्तर देण्याची ही वेळ आहे. प्रीती तू ही काही कमी नाहीस हे दाखवून दे त्याला.
सुमित बास,,असे काही बोलू नकोस,,
प्रीती बाहेर ये त्या भूतकाळातून ,काही उरलेले नाही आता तिथे ,त्याचे लग्न झाले आहे.
मला माहित आहे सुमित,चार महिन्या पूर्वीच त्याच लग्न झाले.
अच्छा,तरीही तू डिस्टर्ब होतेस,कशासाठी प्रीती?
तुला नाही समजणार सुमित.
ओह्ह,,मला नाहीच समजणार,आम्ही कुठे प्रेम केलं कोणावर जीवापाड.? प्रीतीला वाईट वाटले त्याचे बोलणे ऐकून ती म्हणाली,सो सॉरी सुमित मला म्हणायचे होते की,,,,राहू दे प्रीती आय अनडरस्टँड सुमित तिला पुढे काही बोलू न देता म्हणाला,चल बाय मला काम आहे नंतर बोलू आणि तो उठून बाहेर गेला.
प्रीतीचे डोळे भरून आले पण तिलाच समजत नव्हते मोहित आता तिचा राहिला नव्हता तरी मन आतुन त्याच्या कडे ओढ घेत होते,आणि इकडे सुमित तिच्या प्रेमाच्या प्रतिसादा साठी आस लावून बसला होता.
तिला काय करावे सुचेनाच तशीच बसून राहिली शांतपणे...
आज पासून प्रचाराला सुरवात झाली होती. खूप मोठ्या संख्येने महिला,पुरुष प्रीती सोबत आले होते. सुमित प्रीती सर्वात पुढे त्यांच्या मागे त्यांचा पक्ष घरोघरी जाऊन प्रत्येकाशी बोलत होते. पत्रके वाटत होते. अचानक समोरून एकदमच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या घोळक्याने आले,सुमित प्रीती समोरच मोहित आणि त्याची बायको शैलजा आमने सामने ठाकले,त्याही परिस्थितीत मोहितने प्रीती कडे पाहून स्मितहास्य केले,तसे प्रीतीने दुसरी कडे तोंड फिरवले.
त्यांचे कार्यकर्ते मोठमोठ्याने शैलजाच्या नावाने घोषणा देत राहिले,मग इकडे सेनेचे लोक पण प्रीतीचा जयजयकार करू लागले. जणू एकमेकात तिथे स्पर्धा चालली होती. कोणीच थांबायला तयार नव्हते . अचानक भाजप चा एक कार्यकर्ता पुढे आला आणि म्हणाला,बाजूला व्हा,आम्हला जायचे आहे. तसा सुमित त्याच्या समोर गेला आणि म्हणाला,काय रे तुझ्या बापाचा रस्ता आहे काय,,नाही बाजूला होत काय करणार?
तो म्हणाला,साहेब मी शांतपणे सांगतो आहे उगाच.
काय उगाच तू बाजूला हो आम्हाला जायचे आहे
प्रीती ने ओळखले की सुमित मुद्दाम भांडण उकरून काढेल मोहित मुळे,सो ती त्याच्या कडे गेली तसा मोहित पण त्याच्या कार्यकर्त्या जवळ आला.
प्रीती म्हणाली,सुमित प्लिज इथे काही भांडण नको आपण सभ्य आहोत.
तसा तो कार्यकर्ता भडकला आणि म्हणाला,ओ मॅडम तुम्ही सभ्य आणि आम्ही काय रानटी आहोत काय?
तसा मोहित ने त्याला गप्प केले आणि प्रीती ला म्हणाला,सॉरी मॅडम तुम्ही जा,,असे बोलून तो त्याच्या कार्यकर्त्याला घेऊन गेला. सुमित ने रागानेच मोहित कडे पहिले जणू तो त्याला खाऊ की गिळू या नजरेने पहात होता.
दोन्ही ग्रूप निघून गेले,दिवसभर प्रचार करून सगळे कार्यालयात परत आले सुमित ने सगळ्यांना कॉफी ऑर्डर केली. जो तो भाजप चा मोहित कसा निवळला,घाबरला याचीच चर्चा करत हसत होता,पण प्रीती खिन्न झाली होती,तिच्या साठी तो गप्प बसला हे फक्त तीच जाणून होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रीती कार्यालयात आली सुमित आलेलाच होता. मामां सोबत बोलत बसला होता,तिला पाहून मामा म्हणाले,ये प्रीती तुला माहित आहे का सगळीकडे आपल्याच नावाची चर्चा आहे,तू नक्की निवडून येणार यात शंका नाही. तशी प्रीती म्हणाली,हे सगळं आपल्या लोकांमुळे ,त्यांच्या सहकार्यां मूळे शक्य होणार. तसा सुमित म्हणाला हो नक्की विजय आपलाच...!!!मामांनी दोघांचा निरोप घेतला आणि निघून गेले.इतक्यात प्रिती चा फोन वाजला तिने पाहिले मोहित कॉल करत होता,कॉल घेऊ की नको असा ती विचार करत होती त्याच्यात कॉल कट झाला. सुमित म्हणाला,कोणाचा फोन होता का नाही घेतलास?
मोहितचा होता सो घेऊ की नको कन्फ्युज झाले.परत त्याचा कॉल आला,तसा सुमितने घे म्हणून तिला इशारा केला. हॅलो प्रीती कशी आहेस मोहित म्हणाला.
आय एम फाइन,बोल का फोन केला आहेस
प्रीती काल जो प्रकार झाला त्याबद्दल मला सॉरी म्हणायचे होते.
ते तर तू काल म्हणटलेस ना मग,,
तरी ही मला पर्सनली म्हणायचे होते,आय एम सॉरी प्रीती.तू काळजी करू नकोस परत असा त्रास तुला कोणी देणार नाही.
हो,आणि कोणी दिला तरी तो शाबूत राहणार नाही.
अरे वा,,प्रीती मी तर नरमाईने बोलतोय पण तू तर राजकारणाची भाषा शिकलीस पण..
हो समोरचा जसा वागेल तसे आपण वागायचे हेच ठरवले आहे मी सध्या.
अच्छा,चांगली प्रगती केलीस पण आय नो या मागचा बोलवता धनी कोण आहे तो..
मोहित माईंड युवर लँग्वेज ,पुन्हा असे बोलायचे धाडस करू नकोस.
अरे मी चेष्टेने बोलतोय ,चिडतेस का अशी.
तुझे बोलून झाले असेल तर फोन ठेव मला काम आहे बाय.
ओके बाय टेक केयर अँड ऑल द बेस्ट.
सुमित म्हणाला,काय बडबडत होता तो.
काल जे झाले त्याबद्दल सॉरी म्हणत होता.
मग तू का चिडली होतीस त्याच्यावर.
काही नाही सुमित,तो म्हणाला तू जे बोलतेस त्याचा बोलवता धनी कोण आहे हे मला माहित आहे.म्हणून मी चिडले.
अच्छा,गुड पण तू त्याला चांगलेच झापलेस.
प्रीती म्हणाली ,सुमित मी असा विचार करतेय की.
काय आता विचार करतेस बोल,,
सुमित मी माघार घेऊ का,मला हे जमणार नाही.
प्रीती आर यू मॅड ? इतके शेवटच्या क्षणाला येऊन तू माघार घेण्याची भाषा करतेस.कशा साठी पण.?
सुमित उगाच माझ्या मुळे तुझे कोणाशी वैर किंवा भांडण नको आहे मला.
अग प्रीती हे थोडंफार चालत राजकारणात ,ते इतकं मनावर नाही घ्यायचे आणि तू माझी काळजी करू नकोस कोणी काही करत नाही.
तरी पण सुमित दुसरे कोणी विरोधी असता तर चालले असते व इथे..
इथे तो निंबाळकर आहे म्हणून आपण माघार घ्यायची व्हाय..?
त्याच्या मुळे नाही सुमित.
मग का अचानक असे.
सुमित यातून काही भलंत सलत घडू नये म्हणून.
तू उगाच नको तो विचार करतेस,इतकंच तुला वाटत असेल तर जा मामां कडे आणि सांग त्यांना तू माघार घेतेस ते काय होणार जास्तीजास्त हसे होईल आपले.
प्रीतीला समजेना काय बोलावे सुमित रागाने तिथून निघून गेला.दिवसभर ती तिथेच थांबून विचार करत राहिली,काय करावे इतके पुढे येऊन आता माघार घेणं म्हणजे आपल्याच पक्षाचे नुकसान त्यापेक्षा मामां च्या नजरेतून आपण कायमचे उतरणार,हे तिला मान्य नव्हते कारण आमदार साहेब तिला खूप समंजस आणि हुशार समजायचे रादर त्यांचा विश्वास होता तिच्यावर या विश्वासाला पात्र ठरणे प्रीतीला गरजेचे होते सो तिने ठरवले नाही आता माघार नाही आता लढायचे,बघू हारजीत तर ठरलेली आहेच,कोणीतरी हरणार कोणीतरी जिंकणार.
थोड्या वेळाने सुमित तिथे आला,एकदम उत्साहात हसत हसत तो केबिन मध्ये आला,आणि तिला म्हणाला,प्रीती,देयर इज अ गुड न्यूज,येस.
अरे इतका खुश का आहेस? कसली न्युज?
प्रीती अगं, शैलजा मोहित निंबाळकरची शेवटच्या क्षणी माघार, आता आपणच जिंकणार.
सुमित तुला कोणी सांगितले, खरे आहे का पण हे?
अगं प्रीती, अगदी १००% खरे आपल्या एका खबऱ्याने ही बातमी दिली आहे.
पण का माघार घेतली असेल?
आपल्याला काय करायचे प्रीती? आपला मार्ग सोपा झाला बस्स, मग आता तर देशील ना मला साथ प्रीती? असे म्हणत सुमितने आपला हात तिच्या समोर केला.
प्रितीनेही हसत हसत तिचा हात त्याच्या हातात दिला आणि म्हणाली हो नक्कीच सुमित.
तसा तो खट्याळपणे म्हणाला, आयुष्यभरासाठी?
प्रीती म्हणाली, हा आयुष्यभरासाठी...
तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत सुमित म्हणाला या दिवसासाठी किती वाट पाहायला लावलीस तू, बट थँक यू सो मच डियर..
सुमित खूप आनंदात होता, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता, पण प्रीतीला कळून चुकले फक्त तिच्यासाठी मोहितने हा निर्णय घेतला असणार, नक्कीच तिला जिंकून देण्यासाठी त्याने हार पत्करली होती, तिलाच समजत नव्हते एकीकडे मोहित आणि एकीकडे सुमित... कोणाची हार तर कोणाची जीत...