Sangieta Devkar

Drama Romance

4  

Sangieta Devkar

Drama Romance

हारजीत पर्व नवे(भाग 9)

हारजीत पर्व नवे(भाग 9)

4 mins
257


सुमित तिच्या शी बोललाच नाही. प्रीती घरी आली. तिला सुमितचा स्वभाव समजला होता तो थोड़ा वेळ चिड़तो मग परत नॉर्मल होतो सो तिने ही त्याला काही मेसेज केला नाही आणि सुमित ने ही नाही केला. सकाळी प्रीती चे बाबा म्हणाले, प्रीती मी आजच गुरुजीं कड़े जातो आणि तुज़या आणि सुमित च्यां साखरपुडयाची तारीख फिक्स करून येतो . बाबा थाबा जरा घाई करु नका. अग प्रीती असा पण अगोदरच उशीर झाला आहे तुझ्या लग्नाला. बाबा मला विचार करायला वेळ हवा आहे. म्हणजे तुला सुमित आवडत नाही का? तसे काही नाही बाबा पण त्याच्या स्वभावाचा काहीच अंदाज लागत नाही. प्रीती थोड़फार सगळ्यांना एडजेस्ट करावे लागते. सुमित च्या सहवासात तुला त्याचा स्वभाव समजत जाईल. तसे नाही बाबा तो माझ्या बाबतीत खुप इनसेक्यूर समजतो सव्हताला.मग चांगलेच आहे की त्याच प्रेम आहे खुप तुझ्यावर म्हणून त्याला तस वाटते. तिच्या आई बाबांना मोहित बद्दल माहिती नव्हते त्यामुळे तिला काही सांगता येईना .

ती म्हणाली बाबा थोड़ा वेळ द्या मला . बर तू म्हणतेस तसे करू. प्रीती ऑफिसमध्ये आली. सुमित आला होता तिच्या अगोदरच. दिवसभर तो रागातच होता. प्रीती ने एक दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला पण तो मोजकेच बोलला. संध्याकाळी ती एकटीच निघाली ऑफिस मधून सुमित बाहेर गेला होता. तिने तिची मैत्रीण वर्षा ला कॉल केला आणि भेटायला बोलवून घेतले. एका कॉफी शॉप मध्ये त्या भेटणार होत्या. वर्षा प्रीतीची खास मैत्रीन तिला प्रीती बद्दल सगळं माहीत होतं. बोल काय काम होते प्रीती. अग सुमित अलीकडे खूप पझेसिव्ह झाला आहे. मग चांगलेच आहे ना! तसे नाही वर्षा तो मोहीत वरून माझ्या बाबतीत अनसेक्युर फील करतो. मग बोलून बघ ना सुमित शी या विषयावर त्याला डायरेक्ट विचार की तुझा विश्वास नाही आहे का माझ्या वर. वर्षा अग सुमित जाम भडक डोक्याचा आहे त्याला राग लगेचच येतो.पण थोड्या वेळात तो शान्त पण होतो. मला त्याला बोलून दुखवावे असे वाटत नाही. खूप प्रेम करतो माझ्यावर. म्हणून तू काही त्याला बोलणार नाहीस का? इतके प्रेम करतो मग तरी ही असे वागणे ? मग काय करायचे ठरवले आहेस तू? मला समजत नाही ग म्हणून तुला बोलवले ना वर्षा. मग मी सांगते तसे कर सुमित शी बोलून घे . हम्मम बोलायला तर हवे . ओके चल निघुया आता वर्षा म्हणाली.

प्रीति घरी आली. सुमित चा कॉल आला. हॅलो जान आय एम सॉरी. तरी ती बोलेना. सुमित परत म्हणाला,आय रियली सॉरी जान. मग तिला ही राहवले नाही. सुमित माज्याशी न बोलता राहू शकत नाहीस तरी दिवसभर आज बोलला नाहीस असा का वागतो तू? प्रितु मलाच कळत नाही ग माझ्या मना विरुद्ध झाले की मला पटकन राग येतो मग नंतर वाटत राहते की मी असा का बोललो. जेवलास का तू? नाही तुला सॉरी म्हणून जेवणार होतो. बर जेवून घे आता. जान तू चिडलेली नाहीस ना तू मला समजून घे ना. सुमित नाही चिडले मी तुझ्या वर,मला तुझा स्वभाव माहीत आहे. आय लव यु प्रितु. लव यु टू सुमित. मग फोन बंद करून ती ही जेवायला बसली. रात्री झोपायच्या वेळेस प्रीती विचार करत होती की सुमित शी काय बोलू मी. मोहित वरून तो चिडतो पण नन्तर त्याला राहवत पण नाही माफी मागतो माझी. तो खरच अनसेक्युर फील करून घेतो. मी थोडे थांबायला हवे इतक्यात साखरपुडा नको करायला. मग ती झोपी गेली. सकाळी ती ऑफिस ला आली. थोड्या वेळात सुमित ही आला आज प्रीती ला नगरपालिके मधये जायचे होते . कामाला सुरवात करायची होती. सुमित सोबत ती गेली. येताना दुपार झाली मग सुमित म्हणाला,प्रीती आता बाहेर जेवण करूनच जाऊ ऑफिस ला. हो चालेल ती म्हणाली. मग एका हॉटेलमध्ये ते आले. सुमित मला तुझ्या शी थोडं बोलायचे होते. बोल मग . सुमित मला असे वाटते की आपण थोडे दिवस थांबुया मग साखरपुडा करू आता घाई नको करायला. का असे वाटते तुला प्रीती ? मी तुझ्या लायक नाही किंवा मी तुला मोहित वरून बोलतो म्हणून. तसेच काही नाही माझे मन तयार नाही आता. प्रीती जे बोलायचे ते डायरेक्ट बोल. तुला मी आवडत नसेल तर तसे सांग मी तुला फोर्स करणार नाही. कारण जबरदस्तीने एखाद्यावर नात लादता येत नाही. सुमित मी तसे म्हणाले का की तू मला आवडत नाहीस वगैरे. तुज्या बोलण्याचा रोख तोच दिसतो आहे. ते ही खरेच आहे म्हणा,मी तुझ्यावर त्या मोहितमुळे चिडतो राग राग करतो त्याचा. तुला ते आवडत नाही कारण तो तुझा एक्स बॉयफ्रेंड आहे. सुमित तू मला आवडत नसतास किंवा माझं तुझ्यावर प्रेम नसते तर मी होकार दिला असता का तुला. तू काही ही विचार का करतोस. मग प्रीती तुला आता साखरपुडा का नको आहे? मला वेळ हवा आहे सुमित बस्स. ओके मी तुला फोर्स नाही करणार. मामांना काय सांगायचे ते तूच सांग. सुमित तुला राग आला का? राग काय मला नेहमीच येतो ना नवीन काय त्यात. मग जेवण करून ते ऑफिस ला आले.

सुमित नन्तर तिच्याशी इतके बोलला पन नाही. त्याला समजत नव्हते प्रीति अशी का वागते आहे.मग दोन चार दिवस सुमित प्रीति शी फक्त कामा पुरता बोलत होता. संध्याकाळी घरी जाताना ती म्हणाली सुमित तू असाच वागणार असशील तर मी एकटी जाते घरी. का आता मी नको यायला का सोडायला. मग बोलत का नाहीस नीट तू. चल बाहेर बोलू इथे नको.


क्रमश....



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama