हारजीत पर्व नवे (भाग 2)
हारजीत पर्व नवे (भाग 2)


मी पण खोटं खोटंच चिडले होते समजले. तरीच राजकारणात आली आहेस. म्हणजे तिने विचारले. म्हणजे वाघाचे पंजे राजकारणी लोक खोटंच वागतात ना? काही नाही काय मी अजिबात खोटं वागत नाही आणि हे तुला चांगले माहीत आहे. हो हो माहीत आहे चिल किती चिडतेस मी मस्करी करतो आहे यार. आता निघुया का आपण भावी नगरसेविका मॅडम. हा चल. पण प्रीती तू खरच मस्त दिसतेस. थँक्स सुमित. नुसतं थँक्स नाही काही. मग काय अजून? तसे सुमितने आपल्या ओठांवर बोट ठेवून म्हणाला, समथिंग स्वीट...तशी प्रीती लाजली खाली पाहात म्हणाली, अजिबात नाही हॉटेलमध्ये घेऊ आपण स्वीट डिश हा चल आता. हम्मम म्हणत सुमितने सीट बेल्ट लावला. प्रीती तूही बेल्ट लाव. अरे जवळच तर जातोय ना आपण कशाला बेल्ट सुमित. जवळ असो किंवा लांब कारमध्ये सीट बेल्ट कायम लावायचा न विसरता समजले. अरे पण इतके काय त्यात. प्रीती सांगितले तेवढे कर तो जरा रागातच बोलला. बरं लावते पण इतका चिडतो का? हे बघ प्रीती मला माझ्यापेक्षा तुझी जास्त काळजी आहे. मला काहीही झाले ना तरी ते मी सहन करेन पण तुला साधे खरचटले ना तरी मला सहन नाही होणार. प्रीतीला खूप छान वाटले की आपली निवड चुकली नाही. हा इतका प्रेम करत असेल माझ्यावर याचा मी विचार पण केला नाही कधी. सुमित.. तिला मध्येच थांबवत म्हणाला, काही नको बोलूस हो इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर.
मग दोघे हॉटेलमध्ये आले. आल्या आल्या मस्त गाण्याची धून त्यांच्या कानावर आली. ते गार्डन रेस्टॉरंट होते लाॅनवर टेबल खुर्ची लावून मस्त डेकोरेट केले होते. लाॅनच्या मध्यभागी एक रंगीबेरंगी पाण्याचा कारंजा होता. एका बाजूला छोटा स्टेज टाईप भागात एक मुलगा जो सिंगर होता तो हातात माईक घेऊन गाणी म्हणत होता. बाजूलाच त्याच्या म्युझिक सिस्टीम होते. लोक त्याला आपली फरमाईश सांगत होते तसा तो गाणी म्हणत होता. एक रिकामे टेबल पाहून सुमित आणि प्रीती तिथे बसले. खूप छान आणि रोमँटिक असे तिथले वातावरण होते. जास्त करून तिथे कपलच आले होते. सुमित म्हणाला, प्रीती मला वाटले नव्हते की इतक्या लवकर तू मला होकार देशील? असे का वाटले सुमित? तू अजूनही तुझ्या भूतकाळातच होतीस प्रीती आणि आताही नाही माहीत मला की त्यातून बाहेर पडली आहेस की नाहीस. तू मनापासून मला होकार दिला आहेस ना? सुमित माझ्या मनाची तयारी नसती तर मी तुला होकार दिलाच नसता ना! तुला असे कसे वाटू शकते तुला अजूनही माझ्याबद्दल शंका आहे का? अरे प्रितु तसे काही नाही मी सहज विचारले. पण तुला माहीत आहे का मी कॉलेजमध्ये असल्यापासून तुझ्यावर प्रेम करत होतो पण तुला ते कधी समजलेच नाही. तुझ्यासाठी मी फक्त मनातलं सगळं शेयर करायला एक हक्काचा मित्र होतो. हे ऐकून प्रीतीचा चेहरा उतरला होता. तिला असे पाहून सुमितने तिचा हात हातात घेतला म्हणाला, प्रीती मी तुला दोष देत नाही माझ्या मनातलं सांगत आहे पण आता तू माझी झालीच आहेस ना मग नो टेंशन. ओके मी आता मागचे काही नाही बोलणार. सुमित मी फक्त आणि फक्त तुझीच आहे आता तुला मी कधी ही अंतर देणार नाही. ती तिचा दुसरा हात त्याच्या हातावर ठेवत बोलली. सुमितने जेवणाची ऑर्डर दिली. तो सिंगर छान छान रोमँटिक गाणी म्हणत होता. सुमित प्रीती हातात हात घालून गाणी एन्जॉय करत होती.
त्यांच्या बाजूला एक टेबल रिकामे होते. तिथे चार मुलं आली त्यांच्या पाठोपाठ मोहित ही आला. सुमित आणि प्रीतीने त्याला पाहिले तसे मोहितने ही त्या दोघांना पाहिले. त्यांच्या टेबलमध्ये फार तर पाच सहा फुटच अंतर असेल इतका जवळ तो होता. मोहित त्यांच्याकडे आला सुमितच्या कपाळावर त्याला बघून आठ्या पडल्या होत्या. हाय प्रीती हाय सुमित. हाय मोहित प्रीती म्हणाली. तो तिथे आला हे मुळात सुमितला आवडलेच नव्हते. उगाच फॉर्मलिटी म्हणून सुमित हॅलो बोलला. कशी आहेस प्रीती? मोहीतने विचारले. मी मस्त मजेत. तू? मी पण छान आहे. ओके चालू द्या तुमचं म्हणत मोहित त्याच्या टेबलकडे गेला. प्रीती आपण जाऊयात इथून सुमित म्हणाला, सुमित अरे ऑर्डर येईल आपली आता आणि असे जाणे बरोबर नाही वाटत. मग काय या मोहितचं तोंड बघत इथे बसायचं का? सुमित तो आला म्हणून आपण जायचं असे कुठे असते का? आय थिंक नाऊ यु आर जेलस. प्रीती असं काहीही नाही. मग कशाला जायचे आपण आणि तूच बोलला होता ना की पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाईफ यात गल्लत करु नकोस. राजकारणामुळे हा मोहित निंबाळकर आता कुठे ना कुठे तुला भेटत राहणार त्याच्यासाठी तू डिस्टर्ब नाही व्हायचे. मग आता तू काय करतो आहेस सुमित? ओके आय एम सॉरी प्रितु. यांचं इकडे बोलणं सुरू होते तेव्हाच मोहीत त्या सिंगरला एका गाण्याची फर्माईश सांगून आला होता.यांचं जेवण घेऊन वेटर आला होता. तेव्हा त्या सिंगरचा आवाज आला, अब सुनिये मिस्टर मोहित की प्यार भरी फर्माईश तेव्हा सुमित आणि प्रीती एकमेकांकडे पाहात होते की कोणतं गाणं या मोहित ने सांगितले. तो सिंगर गाऊ लागला..
"इस कदर प्यार है,
तुमसे ये हमसफर
चांदनी नरम सी रात के होंठ पर।
तेरी नादानियाँ,
तेरी गुस्ताखिया,
मिली तो यु जुडी,के भिगी रात भर।।
इस कदर प्यार है,
तुमसे ये हमसफर।
दिल में है बेताबियाँ
नींद उड़ने लगी
तेरे खयालों से ही
आँख जुड़ने लगी
अब तो ये बाहें
झुकती निगाहें
बस इन्ही की फ़िकर
तेरी अंगड़ाइयां
मेरी खामोशियाँ
मिली ओ यूँ जुडी
के भीगे रात भर
इस कदर प्यार है तुमसे ए हमसफ़र
मेरी थी जो खामियां
तुझसे पूरी हुई
बाक़ी हुवे बेवजह
तू ज़रूरी हुई
अब ये फ़साना
मेरी जान-ए-जाना
बस चलता रहे उम्र भर
तेरी मदहोशियाँ
मेरी तन्हाईयाँ
मिली तो यूँ जुडी
के भीगे रात भर।
गाणं सुरू होतं आणि मोहित प्रीती कडे पाहात होता. प्रीतीला हे समजले की हे गाणं त्याने तिच्यासाठीच सांगितले आहे. सुमितला पण मोहितचा राग आला. ते गाणे संपले. आता सुमितही उठला. प्रीतीला वाटले हा मोहीतला काही बोलायला जातो का? म्हणून तिने विचारले काय झाले सुमित कुठे चाललास.
थांब आलोच म्हणत तो त्या सिंगरकडे गेला आणि त्याला एका गाण्याची फर्माईश केली. आणि परत टेबलकडे आला. कोणते गाणे सांगितलेस सुमित. तू ऐक ना मग कळेल. ओके म्हणत प्रीती जेवण करू लागली. सुमितने रागाने मोहितकडे एक कटाक्ष टाकला. मोहितनेही त्याच्याकडे पाहिले आणि त्याला स्माईल दिली. सुमितच्या मनात मोहितबद्दल कायमच राग होता. पण मोहितच्या मनात सुमितबद्दल फक्त आदर होता. आता तो सिंगर बोलू लागला म्हणाला, अब पेश है ये खूबसुरत गाना मिस्टर सुमित dedicate this lovely song to his beloved one preeti.. आणि तो गाऊ लागला
"हमें तुमसे प्यार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
सुना गम जुदाई का, उठाते हैं लोग
जाने जिंदगी कैसे, बिताते हैं लोग
दिन भी यहाँ तो लगे, बरस के समान
हमें इंतज़ार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुमसे प्यार कितना...
तुम्हें कोई और देखे, तो जलता है दिल
बड़ी मुश्किलों से फिर, संभालता है दिल
क्या क्या जतन करते हैं, तुम्हें क्या पता
ये दिल बेकरार कितना, ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना
हमें तुमसे प्यार कितना.....
गाणे संपले प्रिती म्हणाली, वा सुमित किती मस्त गाणे सांगितले तू. हो तुझ्यासाठी सुमित म्हणाला
क्रमश..