Sangieta Devkar

Drama Romance

4.0  

Sangieta Devkar

Drama Romance

हारजीत पर्व नवे (भाग 11)

हारजीत पर्व नवे (भाग 11)

9 mins
241


मामा आणि त्यांचे मित्र गप्पा मारत होते. प्रीतीने एफ एम सुरु केले. ती गाणी ऐकण्यात गुंग झाली. हायवे असल्याने कार जरा स्पीडमध्येच होती. अचानक एक कुत्रा जोरात गाड़ीच्या समोर पळत आला. ड्रायवरने ते पाहिले आणि कुत्र्याला वाचवण्यासाठी कार एकदमच बाजूला घेतली पण वन वे असल्याने बाजूला असलेल्या डिवायडरला कार जोरात आपटली काही समजायच्या आत प्रीति कारच्या बाहेर फेकली गेली. अँज युजवल ती सीट बेल्ट लावायला विसरली होती. म्हणून ती जोरात बाहेर फेकली गेली. तिच्या डोक्यातून खूप रक्तस्त्राव होत होता. मामा, त्यांचे मित्र, ड्रायवर सगळ्यांना हायवे पोलिसांनी एका हॉस्पिटलमध्ये अँडमिट केले होते. लगेचच ही बातमी वाऱ्या सारखी सर्वांना समजली. सुमितचे बाबा, आई, मामी, प्रीतीचे आईबाबा सर्वजण हॉस्पिटलला आले. मामा, त्यांचे मित्र आणि ड्रायवर यांना जास्त लागले नव्हते. ते संध्याकाळी शुद्धीवर आले. पण प्रीती अजून शुद्धीवर आली नव्हती. तिला डोक्याला लागले होते. त्यामुळे रक्तस्राव खूप झाला होता. सुमितचे बाबा प्रीतीच्या आई-बाबांना म्हणाले, की सुमितला आता काही नको कळवायला कारण रात्रीच तो यायला निघेल आपण सकाळी सांगू त्याला. असे पण प्रीतीला तो अशा अवस्थेत पाहू शकणार नाही. ठीक आहे तिचे बाबा म्हणाले.


आई सतत रडत होती. प्रीती लवकर शुद्धीवर येवू दे म्हणून आई अंबाबाईला मनातून साकडे घालत होती. बाबा धीर देत होते. मोहितला ही बातमी समजली तसा तो रात्री हॉस्पिटलमध्ये पोहोचला. हॉस्पिटलला येईपर्यंत हजारो मरणं मरत आला होता. त्याचा एक मित्र ज्याला प्रीतीबद्दल माहित होते तो सोबत आला होता. प्रीती आयसीयूमध्ये होती. तिला असे पाहून हॉस्पिटलबाहेर येवून अक्षरशः लहान मुलासारखा रडू लागला. त्याचा मित्र त्याला शांत हो म्हणत होता. कसा शांत होऊ अरे माझी प्रीती तिथे बेशुद्ध आहे अस कसे झाले? तिने कधी कोणाचे वाईट नाही केले मग तिच्यासोबत असे का झाले. माझे प्राण घे देवा पण माझ्या प्रीतीला वाचव रे. असे बोलून खूप रडत होता. परिस्थिती तशी गंभीरच होती. थोडा शांत झाला मोहित मग परत हॉस्पिटलमध्ये आला.


डॉकटरांकडे गेला प्रीतीबद्दल विचारले. डॉ. म्हणाले आता काहीच सांगू शकत नाही मी. प्रीतीच्या डोक्याला मार लागला आहे. आता थोड्या वेळात तिचे रिपोर्टस येतील मग बघू. मोहित बाहेर येऊन थांबला. तो प्रीतीच्या आई-बाबांना ओळखत होता पण ते मोहितला ओळखत नव्हते. मोहितच्या डोळ्यातून अश्रू अविरत वाहत होते. प्रीतीसोबत घालवलेले क्षण त्याच्या नजरेसमोर येत राहिले. त्याच्या आता लक्षात आले की सगळे जण इथे आहेत मात्र सुमित कुठेच दिसत नाही. त्याला समजेना की कसे कोणाला सुमितबद्दल विचारायचे. इतक्यात डॉकटर आले तिथे आणि सुमितच्या बाबांना म्हणाले, प्रीतीचे रिपोर्टस आलेत. डोक्याला इन्जुरी जास्त झाली आहे. रक्तही खूप गेले आहे तिला तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे. कोणी डोनर आहे का पहा आम्हीही ब्लड बँकेला कळवले आहे. सेनेचे काही कार्यकर्ते होते तिथे तसेच सुमितचे मित्र होते ते सर्वजण डोनर कोण मिळेल का हे पाहात राहिले. जो तो फोनवर होता. मोहितने डॉ चे बोलणे ऐकले होते. मित्राला म्हणाला चल पटकन आणि ते दोघे डॉक्टरांच्या केबिनकडे आले. एक्सक्युज मी डॉक्टर.

येस प्लिज. डॉ म्हणाले.

मोहित म्हणाला, डॉ माझा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे तुम्हाला डोनर हवा होता ना?

ओहह येस प्लिज सीट. म्हणत डॉक्टरांनी नर्सला बोलावून घेतले.

नर्स - आपले नाव काय?

मी मोहीत निंबाळकर.

हा यांचा रक्तगट आणि प्रीती यांचा रक्तगट एकच आहे सो लवकर तयारी करा.

ओके सर म्हणत नर्स तयारी करायला गेली.

हे बघा मिस्टर मोहित. तुमची इच्छा असेल तरच आम्ही तुमचं नाव प्रितीच्या फॅमिलीला सांगू शकतो अन्यथा ते गुपित राहील.

डॉक्टर नका सांगू माझे नाव.

ओके म्हणत डॉक्टरांनी मोहीतला आयसीयूमध्ये यायला सांगितले.


मोहीतला काही ही आजार नव्हता सो त्याचे रक्त प्रीतीला देणे योग्य होते. मोहीत मनोमन देवाचे आभार मानत होता. तो काही अंशी तरी प्रीतीच्या उपयोगी पडला याचा आनंद झाला होता. त्याच्यामुळे प्रीती आज मरणाच्या दारातून परत येणार होती. इकडे प्रीतीच्या घरच्यांना नर्सने येऊन सांगितले की प्रीतीला डोनर मिळाला. सगळ्यांनी देवाचे आभार मानले. प्रीतीची आई म्हणाली, कोण आहे तो मला त्याचे पाय धरु देत. नाही हो मावशी त्या डोनरने आपले नाव गुप्त ठेवायला सांगितले आहे. नर्स असे बोलली मग सगळ्यांचाच नाईलाज झाला. मामांना हाताला फ्रॅक्चर होते त्यांच्या मित्राला डोक्याला थोडे लागले होते. ड्रायवरला हाताला डोक्याला लागले होते कारण त्याने सीट बेल्ट लावला होता म्हणून जास्त लागले नाही. त्यांना दोन दिवसांनीं डिस्चार्ज देणार होते. पण प्रीतिने सीट बेल्ट लावला नाही त्यामुळे तिला डोक्याला मार लागला पण तिचे नशीब चांगले की हायवे हा वन वे होता त्यामुळे समोरुन गाड्या नव्हत्या. यासाठीच सुमित तिला वेळोवेळी सीट बेल्ट लावण्यावरून ओरडायचा. त्या रात्री लगेचच मोहीतचे ब्लड प्रीतीला ट्रान्स्फर करण्यात आले. आता तिला कोणता धोका नव्हता तिला डोक्याला टाके पडले होते. सकाळपर्यंत ती शुद्धीवर येईल असे डॉक्टर म्हणाले. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.


मोहीत खूप खूश होता. प्रीतीच्या कामी आपण आलो, तिला पुनर्जन्म दिला. इतके निःस्वार्थी प्रेम असू शकते हे मोहितकडे पाहून समजत होते.

सकाळी सुमितला ही बातमी सांगितली पण प्रीति ठीक आहे तू काळजी करू नकोस असे त्याचे बाबा म्हणाले. मी आता लगेचच निघतो असे सुमित म्हणाला. पण प्रवासात तो प्रीती च्या काळजीने आतून तुटत होता. प्रीतीला खरंच काय झाले असेल तिची तब्येत कशी असेल? मला बाबांनी खोटे तरी नसेल सांगितले असे खूप विचार त्याच्या मनात येत होते. प्रितु कशी आहेस जान? कधी तुला पाहतो असे झाले आहे मला. मनात असे सतत बोलत होता. त्याच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती. पूर्ण प्रवासात तो अक्षरशः रडत होता. तो डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आला. प्रीती आयसीयूमध्येच होती. सुमितला एकट्याला प्रीतीला भेटायला परवानगी दिली. प्रीती अजून शुद्धिवर आली नव्हती. सुमित तिच्याजवळ बसला. डोळ्यातून अश्रू वहातच होते, प्रीती डोळे उघड बघ माझ्याकड़े अग तुला असे नाही बघू शकत मी. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार. माझेच चुकले मी तुला सोडून जायला नको होते. प्रीतू यासाठीच तुला वेळोवेळी सांगत होतो सीट बेल्ट लावत जा आठवणीने. उठ ना जान प्लीज़ डोळे उघड असे बोलत सुमित रडत होता.


तेव्हा डॉक्टर तिथे आले. सुमितच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, मिस्टर सुमित शांत व्हा. प्रीती ऑउट ऑफ डेन्जर आहे येईल शुद्धीवर. आता तुम्ही बाहेर थांबा. मग सुमित बाहेर आला. त्याने तिथे मोहितला पाहिले. त्याला खूप राग आला. तो तसाच मोहितकड़े आला तू काय करतोस इथे? तुझी हिम्मत कशी झाली इथे येण्याची? मोहित काहीच बोलला नाही. तसा मोहित सोबत असणारा त्याचा मित्र म्हणाला, सुमितभाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी काय सांगतो ते ऐकून घ्या प्लीज.. पण मोहित त्याला म्हणाला, काहीही बोलू नकोस. मग परत सुमीत म्हणाला, तुझ्यामुळे तर प्रीतीचा अँक्सीडेंट नाही ना झाला? तरी मोहीत गप्प होता. त्याला गप्प असलेला पाहुन सुमित अजुनच भड़कला. त्याच्या कॉलरला पकडत सुमित बोलला खरंखरं सांग तू इथे का आलास नाहीतर सोडणार नाही मी तुला. मोहितचा मित्र म्हणाला, भाई उलट मोहितभाईमुळेच तर... पण त्याला थांबवत मोहित बोलला, एक अक्षर नको बोलूस तुला माझी शपथ आहे. आता तर सुमितला मोहीतवर संशय येवू लागला. मोहित मी शेवटचे विचारत आहे सांग लवकर. मिस्टर सुमित बिहेव्ह युवरसेल्फ, हे हॉस्पिटल आहे. असे बोलत डॉक्टर तिथे आले होते. मग सुमितने मोहितला सोडले.


मोहितकड़े पहात डॉक्टर म्हणाले, मिस्टर मोहित आता सत्य काय हे यांना समजलेच पाहिजे. मि. सुमित यांचे उपकार माना यांनी स्वतःचे रक्त प्रीतीला दिले म्हणून ती आज मरणाच्या दारातून परत आली आहे. इतक्या तातडीने आम्हाला डोनर मिळाला नसता. मोहित यांचे रक्त प्रीतीच्या रक्तगटाशी मॅच झाले हे तुमचे नशीब समजा. काल रात्रभर ते इथे होते त्यांना ही विश्रांती ची गरज आहे पण तरी ते आता परत हॉस्पिटलला आले. सॉरी मि. मोहित तुम्ही बोलला होता की माझे नाव गुप्त ठेवा पण हा सगळा प्रकार पाहता मला बोलावे लागले. इतके बोलून डॉक्टर निघून गेले. सुमितने हात जोडले म्हणाला, मोहित मला माफ कर मी खूप चुकीचा वागलो अरे कायम मी तुझा तिरस्कार करत आलो पण तू मात्र प्रीतीला जीवदान दिलेस कसे फेडू हे तुझे उपकार सांग.


सुमित अरे हात नको जोडू मी काही ही नाही केले फक्त माणुसकी निभावली. आणि एक प्रीती फक्त तुझीच आहे. तूच तिच्यासाठी योग्य आहेस सुमित मला माहित आहे जीवापाड प्रेम करतो तू प्रीतीवर. काळजी नको करू लवकरच ती शुद्धीवर येईल बघ. थँक यू सो मच मोहित. मोहितने फ़क्त त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सुमितच्या बाबांनी त्याला आवाज दिला. त्यांच्या चेहऱ्याकड़े पाहूनच समजत होते की प्रीती शुद्धीवर आली. सुमित मोहितला म्हणाला चल प्रीती आली शुद्धीवर. दोघे आयसीयू कड़े आले. डॉक्टर म्हणाले, आता फ़क्त तुम्ही तिला पाहुन या जास्त वेळ नका थांबू उद्या सकाळी रूममध्ये तिला शिफ्ट केले जाईल तेव्हा भेटा. मग सगळेजण जाऊन प्रीतीला पाहून आले. शेवटी सुमित आणि मोहित गेले प्रीती सुमितला पाहून रडत होती. तो म्हणाला, अजिबात नाही रडायचे जान आणि त्याने तिचे अश्रू पुसले. मोहितला त्याच्यासोबत पाहून तिला आश्चर्य वाटले. सुमित म्हणाला, सकाळी बोलू आपण आता तू विश्रांती घे. मोहित म्हणाला, हो प्रीती आता नको काही बोलू उद्या बोलू आपण. मग सुमित मोहितला घेवून मामांकड़े आला. मामा ठीक होते. सुमित म्हणाला, मामा कसे आहात. मला जास्त नाही लागले पण प्रीती कशी आहे? प्रीती आता शुद्धीवर आली. काही काळजी नाही आणि हो मामा हा मोहित निंबाळकर भाजपचा युवा अध्यक्ष याने प्रीतीला रक्त दिले म्हणून प्रीती वाचली. खूप खूप आभार तुझे मोहित मामा म्हणाले. नाही मामा साहेब आभार नका मानू. प्रीती माझी मैत्रीण बस्स मैत्रीच्या नात्याने तिला मदत केली. मामा मी उद्या येतो तुम्ही विश्रांती घ्या. असे बोलून सुमित आपल्या आईबाबांकड़े आला, तिथे प्रीतीचेही आईबाबा होते. मग सुमितने मोहितबद्दल सर्वांना सांगितले. सगळ्यांनी त्याचे आभार मानले. मोहितने सगळ्यांचा निरोप घेतला.


सुमितही दिवसभर हॉस्पिटलला होता. त्याची आई त्याला घेवून घरी आली. तसे ही प्रीतीला कोणाला भेटू देत नव्हते. सकाळी प्रीतीला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केले. मोहित आणि सुमित एकत्रच हॉस्पिटलला आले. दोघे प्रीतीकडे आले. सुमित तिच्याजवळ चेअर घेऊन बसला. मोहित बाजूला बसला. सुमित म्हणाला, प्रीतू तुला डोक्याला इंज्युरी झाली ना म्हणून तुला रक्त चढवावे लागले आणि तुला रक्त दिले ते मोहितने अगदी क्षणाचा विचार न करता इतक्या तातडीने तुला रक्त दिले त्यामुळे तू आज मला परत मिळाली आहेस जान. आणि ऐक मी तुला यासाठीच ओरडायचो की सीट बेल्ट लाव म्हणून. मी इथे असतो तर हे असे झालेच नसते. बट आता काळजी घे प्रीती. हो सुमित माझेच चुकले मी त्या दिवशी बेल्ट लावायला विसरले म्हणून मला जास्त दुखापत झाली. ओके मी डॉक्टराना भेटून येतो म्हणत सुमित तिथून बाहेर पडला.


मोहित आता एकटाच होता. प्रीती बरे वाटते ना तुला आता. मोहित का केलेस इतके माझ्यासाठी, मी नाही लायक़ यासाठी. प्रीती मी प्रेम केले तुझ्यावर, मी तुला असे पाहून गप्प बसेन का? नशीब माझा रक्तगट आणि तुझा रक्तगट एकच आहे त्यामुळे हे शक्य झाले आणि नसते तरी मी डोनर शोधून आणला असता. मोहित प्रत्येकवेळी मला जिंकून देण्यासाठी स्वतः हार स्वीकारली. कसे आभार मानू तुझे सांग. असे बोलून ती रडू लागली. अरे प्रीती रडू नको प्लीज. मी फक्त माणुसकी जाणतो गं. काही कारणामुळे आपण वेगळे झालो म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं. आपलं प्रेम आपल्यासोबत असावे, आपले असावे हा स्वार्थीपणा झाला गं. पण आपले प्रेम दूर असूनपण आनंदात, सुखी आहे हे पाहणं हे खरं प्रेम !


तू माझी नाहीयेस मग काय झाले माझे प्रेम कायम राहील आणि तू सुखी असावीस इतकीच माझी अपेक्षा आहे आणि आता तर मी तुझ्यातच आहे ना! 

म्हणजे काय मोहित?

अरे ते फ़िल्मी डायलॉग असतात ना.. अब मैं लहू बनके तुम्हारे जिस्म में रहुँगा... असे काही.

हा खरंच ना मोहित.

जस्ट जोकिंग प्रीती तू सुमितची आहेस आणि कायम राहशील आणि काही मदत लागली तर सांग आय विल ऑलवेज बी देयर.

मोहित थँक यू सो मच.

मोहितने तिचा हात हातात घेतला म्हणाला काळजी घे आणि सुमितचे ऐकत जा.

हो नक्की.

मग सुमित तिथे आला नि म्हणाला, मोहित, डॉक्टर बोलले काही काळजी नाही आता एक आठ दिवसांनी प्रीतीला डिस्चार्ज मिळेल.

ओके काळजी नाही आता कसली. मी निघतो सुमित, मोहित म्हणाला.

तसा सुमित बोलला, मोहित आय रियली सॉरी मी नाही ओळखू शकलो तुला.

अरे सुमित नको सॉरी म्हणूस. मित्र अहोत आपण.

येस ऑलवेज म्हणत सुमितने मोहितला मिठी मारली.

सुमितच्या डोळ्यात पानी होते.

काय झाले सुमित?

मोहित फक्त तुझ्यामुळे माझी प्रीती आज माझ्यासोबत आहे.

बस्स का यार मित्र म्हणवतो आणि आभारपण.

ओके नाही मानत आभार... हसत म्हणाला सुमित.

मोहित तिथून निघाला.

सुमित प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला.

ती डोळे बंद करून मोहितचा विचार करत होती.

आज तिची हार झाली होती आणि मोहित जिंकला होता...

प्रेम असंही असतं याची तिला जाणीव झाली.

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama