Preeti Sawant

Romance Others

4.0  

Preeti Sawant

Romance Others

गुंतता हृदय हे!! (भाग १४)

गुंतता हृदय हे!! (भाग १४)

5 mins
358


सुदैवाने रात्री पावसाचा जोर ओसरला आणि हळूहळू पाऊस पडायचा ही थांबला..पण सगळीकडे कमरे इतके तरी पाणी साचले होते..त्यामुळे सकाळ शिवाय निघणे ही कठीण होते..ऑफिस मधले सहकारी पेपर वगैरे पसरून त्यावर झोपी गेले.. गौरीने तिच्याजवळ असलेला स्कार्फ खाली अंथरला आणि समीरला झोपायला सांगितले..पण समीर गौरीला म्हणाला, "तू झोप, मी इथेच बसतो"

मग गौरी कसली झोपतेय, ती पण त्याच्या बाजूला बसून राहिली..कधी मध्ये त्या दोघांचा डोळा लागलाच तर कधी समिरचं डोकं गौरीच्या खांद्यावर जाई..तर कधी गौरीचं समीरच्या..

गौरीला तर हे सगळं स्वप्न वाटत होतं..क्षणभर तर ती इतकी स्वार्थी झाली की, तिला हा पाऊस थांबू नये असचं वाटत होतं..हा हा म्हणता रात्र निघून पण गेली..

सकाळी आवाजाच्या गलबल्याने समीरला जाग आली..पाहतो तर गौरी त्याला अगदी पकडून झोपली होती..त्याने गौरीला उठवलं..तशी गौरी समीरला अजून बिलगली..समीरला तिच्या अश्या वागण्याचं फार हसू आलं..समीर प्रथमच तिच्याकडे इतकं निरखून पाहत होता..तिचा चेहरा खूपच निरागस वाटत होता..पण तिच्या केसांची बट तिला त्रास करत होती..म्हणून तो ती बाजूला करणार..इतक्यात गौरीने डोळे उघडले..तसे समीरने लगेच दुसरीकडे बघितले..

गौरी गालातल्या गालात हसली..समीरने तिला तिचा हात दाखवला..तिने तो पटकन समीरच्या गळ्याभोवताहून बाजूला केला..नंतर काही घडलंच नाही असं दाखवत दोघेही उठले..

दोघांनी उठून बघितलं तर पाणी ओसारले होते..रात्रभर ऑफिस मध्ये राहिलेले लोक ही घरी चालले होते..हे दोघेही उठले..एव्हाना लाईट्स पण आल्या होत्या..समीरने घरी फोन करून काकांना मी गौरीला घेऊन येतोय असे सांगितले..त्याने काल रात्री काकांना गौरी ऑफिसमध्ये असल्याचे आधीच सांगितले होते व पाणी ओसरल्यावर मी तिला सुखरूप घरी आणेन असं आश्वासन ही दिलं होतं..त्यामुळे काका निश्चिन्त होते आणि त्याबद्दल त्यांनी सुमती काकूंलाही सांगितले...हे ऐकून सुमती काकूंची चिंता मिटली जरी असली तरी ते दोघे सुखरूप घरी यावेत म्हणून त्या मनोमनी देवाजवळ प्रार्थना करीत होत्या.. समीरच्या गाडीची पावसाच्या पाण्यामुळे पुरती वाट लागली होती..त्यामुळे तिचे चालणे खूप मुश्किल होते..कालच्या अचानक च्या पावसामुळे टॅक्सी मिळणे ही कठीण दिसत होते.. मग दोघांनी चालत जायचं ठरवलं..गौरीला तर खूपच मस्त वाटत होतं..कारण ती समीरच्या खूप जवळ होती..आणि का कोण जाणे तिला हा रस्ता संपू नये असच वाटत होतं..ती सारखी मधेच समीरकडे बघत मनात गुणगुणत होती..

जादू है तेरा ही जादू

जो मेरे दिल पे छाने लगा

दीवाने मेरे ये तो बता क्या किया तूने

मीठा सा दर्द होने लगा

काही वेळात दोघेही सुखरूप घरी पोहोचले..शास्त्री कुटूंबाने समीरचे खूप खूप आभार मानले..गौरीने ही काकूंना घट्ट मिठी मारली आणि काल घडलेला प्रसंग सांगितला..आणि समीर आल्यामुळे तिला खूप धीर आला हे ही तिने सांगितले..

त्यानंतर गौरी आणि समीर दोघेही फ्रेश झाले आणि काकूंनी दोघांना जेवायला वाढले..समीर जेवून त्याच्या घरी निघून गेला..गौरी पण आराम करायला तिच्या खोलीत आली..पण तिला झोप कुठे लागत होती..सारखा कालचा आणि आजचा दिवस तिच्या डोळ्यासमोर येत होता..

इथे समीरची हालत काही वेगळी नव्हती..कालच्या प्रसंगामुळे त्याला इतकं तर नक्की कळलं होतं की, गौरीला त्याच्याबद्दल आकर्षण झालयं म्हणून.. पण याआधी ही खूप मुलींना समिरबद्दल अशी भावना वाटली होती..पण का कोणास ठाऊक त्याला गौरी या सगळ्यांपेक्षा वेगळी वाटत होती..अर्थात, त्याचं प्रेम फक्त आर्यावर होतं..पण आर्या तर अनिशवर प्रेम करत होती..एव्हाना त्यांचे लग्न ही झालं असेल, असा विचार अचानक समीरच्या मनात आला..आणि त्याला खूप रडू आले..त्याने कितीही विचार केला तरी आर्याला विसरणे त्याला या जन्मी शक्य नव्हते..म्हणून तर तो तिच्यापासून इतक्या लांब ह्या नवीन शहरात आला होता..त्याला काहीवेळ गौरीचा विसर पडला आणि तो आर्याच्या आठवणींमध्ये हरवून गेला..त्यामध्ये त्याला कधी झोप लागली हे त्याचे त्यालाच कळले नाही..

रात्री अचानक त्याचा फोन वाजल्यामुळे त्याला जाग आली..तो फोन वेदांतचा होता..समीरला जेवायला बोलावण्यासाठी केलेला..समीरने उठून प्रथम लाइट्स लावल्या आणि त्याने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे ९ वाजले होते..तो पटकन फ्रेश झाला आणि थोड्या वेळातच शास्त्रींच्या घरी पोहोचला..जेवण उरकल्यावर तो परत त्याच्या घरी जाणार.. तेवढ्यात गौरीने त्याला थांबवले आणि त्याला तिच्या नवीन प्रोजेक्टमधल्या काही अडचणी सोडवून देण्याची विनंती केली.. खरं तर समीरने मनातल्या मनात गौरीपासून थोडं लांब राहण्याचा विचार केला होता..पण का कोण जाणे..तिला नाही म्हणायचं सोडून..तो चक्क तिला मदत करायला तयार झाला..त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं.. समिरबरोबर अजून काही वेळ घालवायला मिळेल ह्या विचारानेच गौरी खूप आनंदी झाली..त्याचबरोबर संधी मिळताच तिने समीरला तिच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असेही ठरविले..

ठरल्याप्रमाणे रोज तिच्या प्रोजेक्टचा जो काही रिपोर्ट असेल तो समीरला सांगून मग त्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या समितीकडून सोडवून घ्यायच्या तिने ठरविले..त्यामुळे तिला समीरची खूप मदत होणार होती.. प्रोजेक्टचं काम सुरळीत चाललं होतं..प्रोजेक्टमुळे रोज समिरचं आणि गौरीचं प्रत्यक्षात भेटणं होत होतं..समीर फक्त कामाच्याच गोष्टी गौरीशी करत असे..पण गौरी योग्य संधीची वाट बघत होती..

म्हणतात ना, " अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात भी उसे तुमसे मिलाने की कोशिश मे लाग जाती है।।" गौरीला ती योग्य संधी मिळाली..

काका,काकू आणि वेदांत ३-४ दिवसांसाठी मुबंईला त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला जाणार होते..गौरीला सुट्टी मिळणे कठीण होते म्हणून तिने घरी राहणे पसंद केले..काकूंनी तिला सांभाळून राहा आणि रोज फोन कर अश्या सूचना दिल्या आणि त्यांनी समीरला ही गौरीकडे लक्ष द्यायला सांगितले..तसेच स्वतःची काळजी घे..हे समीरला सांगायला सुद्धा त्या विसरल्या नाहीत..

गौरी आज लवकर ऑफिसमधून घरी आली आणि तिने स्वतः जेवण बनवलं..ते पण समीरच्या आवडीचं..तिला इतक्या दिवसात तिच्या आईकडून समीरच्या काही आवडीनिवडी कळल्या होत्या..तिने छान टेबल सजविले आणि ती समीरच्या येण्याची वाट बघू लागली..

सुमती काकूंनी समीरला गौरीचा फोन नंबर देऊन ठेवला होता..कारण त्यांना माहीत होते की, त्याच्या अनुपस्थितीत समीर त्यांच्या घरी जाणे टाळेल म्हणून..समीरला त्याची आठवण झाली आणि त्याने गौरीला फोन केला..

गौरीने फोन उचलला..समीरचा आवाज ऐकताच ती खूपच खुश झाली आणि समीरला म्हणाली, "कुठे आहेस तू? कधीपासून तुझी वाट बघतेय मी जेवायला..तू आधी घरी ये बघू..मग काय ते बोल" असे म्हणून तिने फोन ठेवून पण दिला..मग काय समीरला घरी जाण्याशिवाय नाईलाज होता..त्याने शास्त्रींच्या घराची बेल वाजविली..गौरीने दरवाजा उघडला.. आज गौरी खूपच छान दिसत होती..तिने साधासा लाईट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता..चॅन केस मोकळे सोडले होते..आणि त्यावर हलकासा मेकअप करून डायमंडची टिकली लावली होती आणि त्या पेहरावला साजेसे कानात झुमके घातले होते..समीरला अचानक आर्याची आठवण झाली..त्याला जणू क्षणभर आर्याच समोर असल्याचा भास झाला..गौरीने त्याचा हात पकडून त्याला आत नेले..तिने खोलीभर मंद प्रकाश ठेवला होता व टेबलावर सगळीकडे मेणबत्या लावल्या होत्या..सगळं वातावरण खूपच रोमँटिक दिसत होतं..

क्रमश:

(कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर नक्की share करा)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance