Author Sangieta Devkar

Drama

4.0  

Author Sangieta Devkar

Drama

गुणमिलन

गुणमिलन

4 mins
347


कार्तिक मला काही नाही जमणार सांगून ठेवते. मला जसे जमते तसे करणार. तुझी बहिण प्रत्येक सणाला येते म्हणून मी तिची उठबस नाही करणार. जरा हळू बोल दीपा बाहेर ऐकू जाते सगळ. आई बाबा ऐकतील. ऐकू देत मला काहीही फरक पड़त नाही. दीपा काही ऐकणार नव्हती. मग कार्तिकच बाहेर निघुन गेला. सुमन ताई आणि शामराव त्यांनी दीपाच सगळ बोलण ऐकले होते. दीपा एकदम रागीट आणि स्वतःचे ख़र करणारी मुलगी होती. चांगल्या घरातील मुलगी म्हणून त्यांनी दीपाला पसंत केली होती. तिचे आई वडील शांत स्वभावाचे होते पण दीपा एकदम उलट. कार्तिकचे ती काहीही ऐकत नसायची. त्यांना सहा वर्षाची एक नातही होती आर्या. तिलाही दीपाने आपल्यासारखे वळण लावले होते. आजी आजोबांकड़े ती ख़ूप हट्ट करायची आणि मागितले ते पटकन नाही दिले तर रडून गोंधळ घालायची जेणे करून दीपाला वाटावे की आर्याला त्यांनी ऒरडले किंवा मारले. कार्तिकने ख़ूप वेळा दीपाला समजावून सांगितले की वागणे तुझे चुकते पण दीपा ऐकेल तर शपथ. सासू सासऱ्यांना ही उलट बोलणे ,कधी स्वयंपाक करायची कधी करत नसायची. ख़ूप लहरी होती. कार्तिक काही बोलला की आकांडतांडव करत असे.

सुमन ताई संध्याकाळी सोसायटीच्या गार्डनमध्ये यायच्या. इतरही बायका गप्पा मारायला यायच्या. पाटिल वहिनी आल्या होत्या. सुमन ताईंना शान्त बसलेले बघुन म्हणाल्या, सुमन काय झाले तब्येत बरी नाही का? नाही आमच नेहमीच सुनेचे वागणे. सतत कार्तिक सोबत वाद घालत असते. पाटिल वहिनीना दीपाबद्दल माहिती होते. सुमन म्हणुन मी तुला बोलले होते की कार्तिक इतका शान्त आहे. सरकारी नोकरदार आहे त्याला साजेशी मुलगी बघ. पत्रिका दोघांच्या नीट बघुन घे. निदान मुलीची रास तरी चांगली बघ.

हो ग मला त्या वेळी तुझ बोलण नाही पटले. पण आता समजते की मेष राशीवाल्या मुली रागीट आणि हेकखोर असतात. मुलींना मेष आणि वृश्चिक रास शोभत नाही. मुलाला मेष रास शोभते. ही दीपा नेमकी मेष राशीची निघाली, मला नव्हते माहित की इतकी तापट असेल. सुमन तिच्या आई वडिलांच्या कानावर घाला ना की ती कशी वागते ते. कार्तिक बोलला आई आपण तिला जास्त काही बोललो तर दीपा आपली पोलिस कम्प्लेंट करेल त्यात माझी सरकारी नोकरी मग कस करायचे आपण काही. बिचारा माझा मुलगा तिच्या तावडीत सापडला आहे. सुमन ताई हताश पणे म्हणाल्या.

थोड़ा वेळ बोलून त्या घरी आल्या. सकाळी सकाळी दीपा आणि आईचा वाद झाला. काल कार्तिक लवकर नाही आला दीपाला त्याच्यासोबत बाहेर जायचे होते. याचा राग तिने सासूवर काढला. दीपा आईला उलट बोलत होती. कार्तिक तिथे आला त्यानेही दीपाला सुनवले. दीपा जास्तच बोलत होती, कार्तिकने आपला हात उचलला तसा दीपाने त्याचा हात पकड़त म्हणाली, खबरदार माझ्या अंगावर हात उगारलास तर मी तुम्हा सगळ्यांची कम्प्लेंट करेन. तसा कार्तिकने हात बाजूला घेतला.

दीपाची धमकी ऐकुन सगळे गप्प बसले. कधीकधी दीपा मी आत्महत्या करते आणि त्याला जबाबदार तुम्हाला ठरवते अशीही धमकी देत असे त्यामुळे कार्तिकचे हात दगड़ाखाली अडकले होते. कार्तिकला आता दीपाचे वागणे सहन होत नव्हते. तो तणावाखाली जगत होता. आता तर दीपा त्याच्या अंगावर धावून जायची. त्यामुळे त्याने एक निर्णय घेतला. दीपाच्या आई वडिलांना त्याने घरी बोलावून घेतले. दीपाचे वागणे कसे आहे हे सांगितले.

दीपाच्या आई वडिलांना आपल्या मुलीचा स्वभाव माहित होता. लग्नानंतर ती जबबादारीने वागेल, संमजस होईल अस त्यांना वाटले होते पण उलट दीपा कार्तिकच्या शान्त स्वभावाचा फायदा घेत होती. आताही दीपा माझच वागणे बरोबर आहे यावर अडून होती. थोड्या दिवसांसाठी दीपाला तिच्या माहेरी घेवून जावे असे कार्तिक म्हणाला. दीपा रागातच माहेरी गेली.

तिच्या आईने तिला ख़ूप समजावून सांगितले कार्तिक खरच चांगला मुलगा आहे, त्याचे आई वडील ही शान्त आहेत. तू सर्वांशी समजून घेवून वाग अस तापट आणि फटकळ वागुन काही ही साध्य नाही होणार. तुझ्या वागण्याला कांटाळुन कार्तिक तुला डिवोर्स देवू शकतो. मग तू एकटी आर्याला कशी सांभाळणार आहेस. स्वभावाला जरा तुझ्या मुरड़ घाल दीपा आणि सगळ्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कर. आईचे बोलणे दीपाने ऐकुन घेतले. आपले वागणे चूक की बरोबर याचा विचार करत राहिली. आठ दिवस माहेरी राहुन ती सासरी आली. तिने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला पण तिचा स्वभाव आड़ येत होता. पहिले पाढे पचावन्न अशी गत झाली. कार्तिक मानसिक दबावाखाली जगत होता. दीपाला डिवोर्स देवू का? मग यात आर्याचा दोष काय? तिला बापाच्या प्रेमापासून का वंचित ठेवायचे? आर्यावर त्याचा फार जीव होता. तिच्यासाठी तो दीपाला सहन करत राहिला.


माझ्या ओळखीच्या लोकांकडे अशा घटना मी पाहिल्या आहेत. नवरा स्वभावाने शान्त असेल तर बायको त्याचा गैर फायदा घेते. प्रसंगी त्याला मारहाण करते आणि जीव देण्याची धमकी ही देते. काही लोक लग्न ठरवताना मुला, मुलीची पत्रिका बघतात, रास कोणती हे ही पाहिले जाते. ज्या घरात अशा घटना घडत आहेत त्या मुली खरच मेष राशीच्या आहेत एकदम तापट. मी कोणाच्या ही भावना दुखावण्याच्या हेतुने हे लिहिले नाही. पण मला तुम्हाला हेच विचारायचे आहे की खरच अस रास बघुन मुलगी किंवा मुलगा कसा आहे हे कितपत समजते. आज कायदा मुलींच्या बाजूने आहे म्हणुन त्या नवऱ्याला मानसिक आणि शारिरिक त्रास देतात. आज अनेक ठिकाणी पुरुष हा अत्याचार सहन करत आहेत. स्त्रीवर अत्याचार झाला तर लगेच आवाज उठवला जातो . मग पुरुषावर असे अत्याचार होत असताना का नाही कोणी त्याची बाजू ऐकुन घेत.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama