STORYMIRROR

Pallavi Udhoji

Drama

2  

Pallavi Udhoji

Drama

गरज सरो वैद्य मरो

गरज सरो वैद्य मरो

2 mins
1.4K


अवनीला आयुष्य हे एखाद्या पत्त्याप्रमाणे निसटून जावं तसं निसटत चाललं असं वाटायला लागलं. कितीतरी असे प्रसंग आले त्या प्रसंगाने तिच्या मनावर आघात केला.

                    

खिडकीबाहेर बघत होती, बाहेर धुंद आल्हाददायक प्रसन्नता होती. रिमझिम पाऊस पडत होता. पावसाचे थेंब, गारवा घेऊन आलेला वारा गालावरून मोरपीस फिरवावा तसा स्पर्श करत होता. डोक्यावरील पावसाळी आभाळाचा तुकडा अवनीच्या मनाच्या गाभाऱ्यात साठत होता. गालावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनी अवनीच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांना वाट मोकळी करून देत होता. तो जणूकाही अवनीला सांगत होता मनसोक्त रडून घे. मनात दाटलेल्या गडद, आभाळासारख्या विचारांना मोकळी वाट करून दे, किती दिवस किती वर्ष मनाच्या विस्तीर्ण आकाशात साठवून ठेवलेल्या विचारांचा हिशोब जणू हा पाऊस विचारात आहे. चार भिंतीच्या चौकटीतला पाऊस मनात मावत नव्हता.

            

खरंच माणूस इतका स्वार्थी का होतो? गरज संपली तर ओळखपण दाखवत नाही. काही वर्षांपूर्वी अवनीची नणंद अल्काला हृदयविकराचा तीव्र झटका आला व तिला हॉस्पिटलला अॅडमीट केले. नोकरीचा व्याप सांभाळून अवनी

तिची सेवा करत होती. अवनीला सगळं सांभाळून, खूप त्रास होत होता पण तिने कधीच त्याचा विचार केला नाही.

        

काळ पुढे सरत होता, अवनीची परिस्थिती बेताचीच होती. अचानक एक दिवस अवनीची तब्येत खराब झाली. तिला अॅडमिट केले. अवनीने अल्काताईला फोन केला.


“अल्काताई मला अॅडमीट केले. मला तुमची गरज लागेल.” दुसऱ्या दिवशी अवनीचं ऑपरेशन झालं. शुद्ध आल्यावर अवनीने रूममध्ये बघितलं तिला कोणीच दिसलं नाही, अवानीला खूप वाईट वाटले. लोकांना तिची गरज होती तेव्हा अवनीने स्वतःच्या तब्येतीबद्दल कधी विचार केला नाही. झालं, वेळ निघून गेली ना. पण मनावर जखम झाली ती कशी पुसणार.

       

अवनीला बघताना मनावर कोरलेल्या त्या कडू आठवणी दिसत होत्या. जगण्यातला सहजपणा मात्र या पावसात हरवल्यासारखा वाटत होता. चार भिंतीच्या चौकटीत आकाशातून पडणाऱ्या या पावसाला मनात जपणं कठीण झालं आहे.


माणूस शिकून शहाणा बनतो पण ते ज्ञान तेवढ्यापुरता मर्यादित राहतं. जीवनात एखाद्या पत्त्याप्रमाणे ते निसटत जातं. अवानीच्या आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सान्निध्यात कुठेतरी हरवत चालला होता. शेवट "गरज सरो वैद्य मरो" असंच काहीतरी अवनीच्या आयुष्यात घडलं होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama