STORYMIRROR

Arun Gode

Comedy

3  

Arun Gode

Comedy

गण्याची गंमत

गण्याची गंमत

2 mins
290

        एके दिवसी एक विदर्भवासी महाराष्ट्रची उपराजधानी नागपुरला आपल्या वैयक्तिक कामा साठी आला होता. त्यांचे काम जरा अवघड असल्यामुळे लगेच होऊ शकले नाही.त्यामुळे त्यांचे डोके चांगलेच तापलेले होते. कामाला भरपुर वेळ लागेल असे चिन्ह त्याला दिसत होते.कोणी कार्यालयत ओळखीचे नसल्यामुळे कार्यालयाच्या नियमाप्रमाने काम करुन घ्यावे लागेल असे त्यला वाटत होते.त्यामुळे वाट पाहने हाच पर्याय त्याच्या जवळ उरला होता. काम होईल की नाही याच्या बद्दल मनात शंका वारमवार घर करीत होत्या. त्यामुळे त्याचे चित्त लागत नव्हते. सारखा डोक्याचा ताप वाढतच होता. दुपार होऊन गेली होती. त्यामुळे पोटात उंदीर धावत होते. त्यामुळे त्याने समोरच्या भैय्या भोजनालयात जेवन करण्याचा निर्णय घेतल.तशी त्याने वाटचाल त्या दिशेने केली होती.

          नागपुर हे शहर एके काळी मध्य प्रांत ज्याला सीपी अण्ड बेरार म्हनुन ओळखल्या जात असे. त्याची राजधानी होती. नंतर महाराष्ट्राची उपराजधानी झाली. त्यामुळे ईथे बरेच हिंदी भाषीय रहिवासी बसले आहे. इथले बहुतेक विदर्भवासी टुटली- फुटली हिदी भाषा ज्यात काही हिंदी आणी काही मराठी शब्दांचा भरना असतो.अशी मिश्रित भाषा बोलत असतात. हिंदी मिश्रित मराठी येथील बोल-चालची भाषा. या कथेतील नायक हे तशाच प्रकारात मोडतात. तो या हिंदी भाषी भैय्याच्या भोजनालयत जेवन करण्या साठी आला होता. त्याने जेवणाचे ताट मांगितले होते. मजेने जेवन करित होता. 

     जेवन आत्या शेवटच्या टप्यात पोहचले होते.आता त्याने शेवटी भात जेवायला सुरुवात केली होती. एक- दोन भाताचे घास पोटात पोहचले होते. तो अचानाक त्याला जेवता-जेवता भातात अर्थात भाताच्या घासात खडा लागला. आधीच तापलेले डोके एकदम अचानक खुपच तापले गेले होते.त्याने तिथल्या वाढप्याला म्हणजे वेटरला जोराने आवाज दिला. तो शुध्द हिंदी भाषी वाढपी त्याच्या जवळ भीत-भीत आला. त्याने प्रश्न केला. क्या हुआँ साहबजी. कुछ और चाहिये क्या ?. त्याने रागाच्या भरात विचाले. तु पहिले ये बता कि इस ताट, म्हणजे थाली में खडा क्यों है. वेटर ने थोडा वेळ विचार केला आणी त्याला म्हणाला. साहब में आप के थाली में कहाँ खडा हूं? मैं तो आपके बगल में खडा हूं. हे उत्तर ऐकुन त्याचा रागाचा पारा एकदम चढला.त्याच्या तळ पायाची आग मस्तकात शिरली होती. त्याने मग त्या हॉटेलच्या मालकाला बोलवले. देखियें इस ताट में खडा. हा तुम्हाचा वेटर माझा सोबोत हुजत करत आहे. म्हंणतो मी तर बाजुला खडा आहे. हॉटेल मालकाच्या प्रकरण लक्षात आले. त्याने विचारले भातातला खडा कुठे आहे. त्याने तो खडा मालकाला दाखविला. तेव्हा तो वेटर समजला कि खडा म्हणजे कंकड ,जो उसे चावल चबाते समय उसे लगा था. हॉटेल मालिकाने वेटरला दुसरी भाताची प्लेट आणावयस सांगितली. नंतर त्याने भाताचे सेवन गेले. पैसे देतांना त्याला पण आपली भाषीय चुक लक्षात आली होती. खेद व्यक्त करुन तो हसत- हसत आपल्या कामाला निघुन गेला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy