shubham gawade Jadhav

Horror

2.0  

shubham gawade Jadhav

Horror

गावाकडचा वाडा...

गावाकडचा वाडा...

3 mins
358


             खूप दिवसांनी गावाकडे निघालो होतो .मनात एक वेगळीच ओढ लागली होती .रात्री झोप सुद्धा आली नव्हती.कालच बॅग वगैरे आवरून ठेवली होती.सकाळी उठायचं आणि बस धरून गावाला निघायचं.अन्न पानी गोड लागत नाही गाव आठवल की.संध्याकाळ झाली की आपोआपच गावाची आठवण येते.तो मंद प्रकाश आठवतो,तो मावळत चाललेला लालबुंद पण डोळ्यांना सुखावणारा सूर्य मनाला भावून जातो.जनावरांच्या गळ्यातल्या घंट्यांचा किणकिण आवाज मन वेधून घेतो .तो मातीचा दरवळ ,सुसाट हुंदाडणारा वारा ,मनसोक्त वाऱ्यासोबत डोलणाऱ्या पानांची सळसळ आणि गायींची बागडणारी वासरं ,चमचमणार टिपूर चांदणं त्याखाली अंथरून टाकून गप्पा मारत बसणं ,आजीच्या गोष्टी सगळ कस मस्त असा स्वर्गीय आनंद फक्त आणि फक्त गावातच भेटू शकतो आणि ते भोगायलाही नशीबच असावं लागत.आठवण आली की पाण्यातून मासा बाहेर टाकला की कसा तरफडतो तशी अवस्था होते आणि पोटात गोळाच येतो .गावाकडे निघालो तेव्हा जो आनंद चेहऱ्यावर असतो तो कुठेही पाहायला मिळत नाही .दिवस कधी उजाडेल आणि कधी घरी जाईल असं झालं होत .अखेर दिवस उजाडला आणि बसमध्ये जाऊन बसलो आणि एखाद्या मोठ्या संकटातून सुटल्याचा निःश्वास सोडला .


         बस चालू झाली गावामागून गाव माघे टाकत बस धावू लागली.माझं मन तर केव्हाच गावी पोहोचल होत.आपुलकीची नाती माणसं फक्त गावाकडेच सापडू शकतात हे त्रिकाल बाधित सत्य आहे .बस गावाजवळच्या निळोबाच्या टेकडीला वळण घालू लागली.निळोबाची टेकडी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे त्या टेकडीवर.टेकडीवर अनेक प्रकारची औषधी झाडंही आहेत .हेमाडपंती मंदिर होत अगोदर तिथे. ४ भव्य खांब आणि त्यांच्या मधोमध एक मनात भरून जाणारी महादेवाची पिंड एवढच होत पण कालांतराने तिथे लोकवस्ती झाली आणि लोकांनी मिळून एक सुंदरसं मंदिर बांधलं. त्याच्याशेजारी एका साधू बाबांची छोटीशी पर्णकुटी .बस वोळसा घालत असताना मंदिरातील घंटी वाजवली तसे आपोआपच हात जोडले गेले .


         गाडी आता गावाच्या थांब्यावर आली .गाव तिथून थोडंसं म्हणजे १ कोस लांब .थांब्यावरून चालत जायची मज्जा काही औरच .कारण एक बैलगाडी बसल एवढीच मातीची कच्ची वाट .त्यावरून नक्षीकाम करावी अशी काळे अणकुचीदार दगड वर आलेली .रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट आणि हिरवीगार झाडी त्यातून येणारे पक्ष्यांचे आवाज खूपच छान वाटतात .


          आता पुढे आलं की समोरच छाती काढून रुबाबात उभा असलेला दिसतो तो चिरेबंदी वाडा .तो वाडा म्हणजे आमच्या गावाची शानच म्हणायची. पुरातन काळातील बांधकाम कित्येक वर्ष झाली तरी ठाम उभाच आहे .आताच्या काळातील बांधकामाच्या तोंडात दिलेली चपराक म्हणजे हा वाडा .भव्य दरवाजा त्याला बाहेरून टोकदार खिळे बसवलेले कारण पूर्वी जर का दरवाजा उघडत नसेल तर दुश्मन हत्तीच्या धडकेचा वापर करून दरवाजा पाडत त्याच्या त्या धडकेने दरवाजा पडू नये म्हणून दरवाज्याला बाहेरून टोकदार खिळ्यासारखे आवरण बसवत . त्या भव्य दाराला भली मोट्ठी कधी आणि त्यावर भाळ मोठ्ठ कुलूप होत .ते का ? कोणालाच माहित नव्हतं .पण त्या वाड्याकडे पाहिलं की मला त्याच्याशी आपली नाळ जोडली आहे की काय असं कायम वाटायचं .आतून कोणीतरी हाक देतय असं वाटायचं .वाड्याला दरवाज्या शेजारी दोन मोठ्ठे बुरुंज होते त्यावरून आसपासच्या परिसराची टेहळणी केली जायची .त्या बुरुंजावर वेगवेगळ्या वेली चढल्या होत्या .पूर्ण एक एक्कर आवाराचा तो भरभक्कम चिरेबंदी वाडा मी चालत चालत डोळ्यात भरण्याचा प्रयत्न करत होतो पण तो काही डोळ्यात मावेनाच .तो ओलांडून मी गावाच्या दगडी पुलावरून जो की खळखळ असा आवाज करणाऱ्या

 ओढ्यावर बांधलेला आहे तो पार करत गावात पोहोचलो .

पण मी अजूनही तो वाडा का बरं बंद असेल याच धुंदीत होतो ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror