komal dagade.

Romance Classics Inspirational

4.0  

komal dagade.

Romance Classics Inspirational

एक वळण

एक वळण

3 mins
173


     आज नेहमीसारखच सकाळी सकाळी कामिनी आणि तिचा नवरा नीरजच वाजलं होत. रोजच्या भांडणाचा तिलाही कंटाळा आला होता. धाडकन दार आपटून नीरज कामावर निघून गेला. कमीपणा घ्यायला दोघंही तयार नव्हते.त्यामुळे भांडणाला आणखीनच उधाण येतं. त्यालाही कामिनीच्या चिडचिडे स्वभावाचा कंटाळा आला होता. कामिनीने मनःशांती साठी देवळात जायचं ठरवलं. ती स्वामी समर्थांची भक्त होती. सोफ्यावर ठेवलेली पर्स उचलून ती महाराजांच्या मठाच्या दिशेने गेली. भव्य असणारा मठ, पायाला लागणारी थंडगार फरशी,देवळातील प्रसन्न वातावरण,स्वामीचे मुख पाहताच तिच्या डोक्यातील विचार क्षणात नाहीसे झाले. मठात तशी गर्दी कमीच होती. भाविकांना कसल्याही त्रासाशिवाय स्वामीचं दर्शन मिळत होतं. कामिनीला महाराजांचं दर्शन होताच अतिशय प्रसन्न वाटलं. ती मठातचं बसली. जपाची माळ काढून श्री स्वामी समर्थ जप करू लागली. एकशे आठ वेळा जप करून झाला की, ती स्वामीच्या मूर्तिकडे पाहू लागली. तिला ती मूर्ती खूपच तेजस्वी दिसत होती. मनातून ती सांगत होती.महाराज या भांडणातून सोडवा. हा संसार सुखाचा होऊद्या असं म्हणत होती. अचानक तिचं लक्ष नवीनच आलेले भक्त म्हणजे एक वृद्ध जोडप्याकडे गेले. त्यातील वृद्ध स्त्री जिचा स्वतःच्या शरीरावर कसलाही ताबा नव्हता. तिचं ते वयामुळे एकसारखं हलणारे शरीर पाहून कामिनी तिच्याकडे एकटक पाहत होती. तिचा नवरा किती काळजी घेत होता. तिला तहान लागली तर साधं पाणीही पिता येत नव्हतं, बसणं उठणं तर लांबच. तिच्या नवऱ्याने तिला खाली बसवलं. हातात जपाची माळ जप करण्यासाठी दिली. ती त्या हालचालीत जप करत होती. तिचा नवरा महाराजाकडे पाया पडण्यासाठी गेला. येताना त्याने बायकोसाठी ही प्रसाद आणला. दोघांनी मिळून प्रसाद खाल्ला.त्याने बायकोला हात धरून उठवले, आणलेल्या फोरव्हिलर कार मध्ये बसवले. एक मुलगा बाहेरच मोगऱ्याचा गजरा विकत होता. गजरा त्याने बायकोसाठी आवर्जून घेतला,आणि तिच्या केसातही माळला. हे दृश्य कामिनी थक्क होऊन पाहत होती. एवढ्या वयातही किती एकमेकांचं प्रेम.

तिलाही तिच्या नवऱ्याची आठवण झाली, छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेणारा नवरा आठवला. तिच्या अतीशीग्र रागानेच बारीकसारीक गोष्टीवरून तिने काढलेली भांडणे तिला आठवत होती.आयुष्यात किती सोप्या गोष्टी असतात, पण आपण नकारात्मक विचाराने काही गोष्टी ओढवून घेतो. आज तिच्याही चुका लक्षात आल्या. स्वामींनीच बहुतेक मुदामच हा प्रसंग तिच्या आयुष्यात घडवून आणला असावा. आता रोजची होणारी किटकिट त्याचं कारण तिला समजलं होत. ती घरात राहूनच नकारात्मकेमध्ये भरकटली जात होती. त्यामुळे तीव्र संताप तिच्यामध्ये होऊ लागला होता. तरीही कितीवेळा तरी नीरजने तिला क्लासेस किंवा कोणत्याही आवडणाऱ्या गोष्टीत मन रमवायला सांगितलं. पण घरातील कामामुळे ती दुर्लक्ष करत. नीरज तिला कधीही बंधनात ठेवत नसे. तिला हवं ते करण्याची त्याने तिला सवलत दिली होती. तिला आईसक्रीम आवडत म्हणून न चुकता तो रोज घेऊन येत. किती तरी वेळा तिला ड्रायविंग क्लास साठी त्याने पैसेही दिले होतें. ते असेच वायफट तिच्याकडून खर्च झाले. त्याची यात तशी काहीच चुकी नव्हती. तिला मात्र चिडचिड करण्याची सवयच लागली होती. त्यामुळे तो तिच्याशी बोलनही टाळत असे.

आज मात्र त्या जोडप्याला पाहून तिला नवऱ्याचं प्रेम आठवत होत. तो खूप काही करत होता. त्याच्यातील तिला चांगल्या गोष्टी दिसतच नव्हत्या. ते वृद्ध जोडपं तिच्या समोरून कार मधून गेलं. शेवटी उतारवयात एकमेकांचा आधार असणं किती महत्वाचं असतं हे तिला समजलं. तिने डान्सक्लास लावायचा ठरवला.ज्याची तिला खूप आवड होती. मोकळ्या वेळेत लहान मुलांचे क्लास घेण्यास तिने सुरुवात केले. कामामध्ये व्यस्त झाल्याने तिच्यामध्येही आमूलाग्र बदल घडून आला. खाली दिमाग शैतान का घर ही परिस्थिती बदलली. तीच्या आवडीच्या गोष्टीमध्ये मन गुंतल्यामुळे ती आनंदी राहू लागली. त्यामुळे चिडचिडपणा तिचा कमी झाला. नीरजलाही तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटू लागलं. ती आता पहिल्यापेक्षा सुंदर दिसत होती. चेहऱ्यावर तिच्या सकारात्मकतेच तेज दिसत होत.काही वेळा आसपासच्या गोष्टीतच सुखाचं कारण लपलेलं असतं फक्त बघण्याचा दृष्टिकोन हवा असतो. जसा कामिनीने स्वामीच्या मंदिरात तो क्षण अनुभवला. त्यामुळे कामिनीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आला. तशीच सकारात्मकता नवीन वर्षाची तुमच्याही जीवनात येवो हीच अपेक्षा.

लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमचा अभिप्राय मोलाचा आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance