एक विचित्र स्वप्न ..
एक विचित्र स्वप्न ..


त्या दिवशी पडलेलं स्वप्न थोडसं विचित्रच होत.. स्वप्नात प्रत्यक्षात देवाधिदेव इंद्रदेवाचा साक्षात दरबार भरला होता . यमराज धावत - धावत आत येत म्हटले , महाराज घात झाला . घात झाला ... अरे हो हो काय झालं ते तर सांगशील सावकाश सांग सगळं .. राजाधिराज आपल्या सिंहासनला धोका निर्माण झाला आहे . पृथ्वीवर काय चाललं तेच कळंना झालंय .. अहो तुम्ही सांगितलं तसं यादीतल्या नाववाल्याच्या घरी गेलो होतो तर त्यांनी मलाच लाच देऊ केली. ते तर आपल्याही पुढची निघाली .. मला म्हणाला बैस खाली तुला सांगतो ... तुला तुझा वाटा देतो पण मला इतक्यात नेऊ नकोस वरती. मी नाही म्हटलं तेव्हा तो भलताच रागावला अन मला म्हणाला . जाऊन सांग तुझ्या देवेंद्रला आता दिवस तुझे भरले .. अन तुझ्या त्या फुकटच्या खाणाऱ्या देवांनाही सांग आम्ही येतोय तुमचं राज्य बळकवायला. अन महाराज मंगळावंर यान पाठवून त्याचे फोटो काढून बी गेलेत ते लोक अन आता हमला करणार आहे म्हणे आपल्या राज्यावर ....अन ते तुमच्यावर खटला दाखल करणार आहे म्हणे पृथ्वीवर ... अहो ते भलतेच कट कारस्थानी असुरापेक्षाहि भयानक आहेत महाराज त्यांनी पृथीवरही नुसता धुमाकूळ घातला आहे. आता आपल्याला सावध व्हायला हवं . तुम्ही काही तरी करा अन वाचवा आपलं राज्य ....आणि बंदोबस्त करा महाराज ... त्यावर इंद्रदेवाने एकसमिती नेमली अन प्रुथ्वीवर पाठवावा असा आदेश दिला .. सर्व सूत्रे हलली अन सगळे कामाला लागले.. रिपोर्ट तयार करून तो इंद्रदेवा समोर वाचण्यात आला
महाराज .. प्रुथ्वीवर काय चाललंय तेच कळेनासं झालय सगळीकडे हाहाकार माजलाय. नुसत्या घड्याळाच्या काट्यावर नाचताहेत सारे समाज दिशाहीन होत आहे.महागाई, भ्रष्टाचार बोकाळला जनता हवालदिल आहे . नेते संधीसाधू बनले , प्रशासक मुजोर तर सर्वकाही अलबेल आहे महाराज. माणूस माणसाच्या रक्ताचा भुकेला झाला आहे. इंटरनेटने तर सगळ्यांना वेडं केल आहे . महाराज ! कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. हे काय आता त्यांना वेगळं सांगावं?
लहान मुलाच्या हाती मोबाईल देऊन त्यांनी घात ओढवून घेतला आहे . अजाणत्या वयात मोबाईल हाती आल्याने .जे काही वंगळवाण पाहून लहान मुलं बिघडत आहेत नैतिकतेचा ऱ्हास होत आहे महाराज .... तरुणपिढी बिघडलीय असे पालक लोक ओरडताहेत नुसती. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर क्रिकेट ने तरुणांना अक्षरशः वेडं लावलं आहे ..पालक प्रशिक्षित नसल्याने मोबाईलमुळे अपघात घडताहेत . कोणी सेल्फीच्या नादात जीव गमावत आहे कुणी रात्रंदिवस मोबाईल वापरामुळे मनोरुग्ण होताहेत . अरे विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार . त्यांचं जीवन म्हणजे एक दिशाहीन चित्रपट जणू . संगीत एकीकडे, गाणे. भाबडे, नायक - नायिका हवालदिल तेजाकडून तिमिराकडे उलट प्रवास चालू आहे महाराज .... कोण सांगणार कुणाला? जो तो आपल्याच धुंदीत, आपल्याच मस्तीत, मर्जीचे मालक. त्यात भरीस भर टीव्हीवरील जाहिरातींनी तर कहरच केला आहे. कुटुंबातील सर्वानी कार्यक्रम पाहावेसे वाटेनासे झाले आहे. टीव्ही वर एक जाहिरात येते, निरागस मुलं विचारते 'पपा हि जाहिरात कसली? काय सांगावं बापानं? थोडीशी सावधानी , जिंदगीभर आसानी...कुठली जाहिरात करावी याच ताळतंत्रही त्यांना उरलं नाही .समाज बिघडवण्याचा जणू विडाच उचलला आहे. मलिका तर एकापेक्षा एक हिचा नवरा त्याच्याबरोबर. त्याची पत्नी कंपनीच्या बॉस बरोबर .... काय दाखवावं, काय दाखवू नये, चांगलं घ्यावं वाईट ते सोडून द्यावं हे त्याच्या लक्षातच राहील नाही इथेच खरा घोळ झाला. आता खरी मार्गदर्शनाही गरज आहे नाही तर काहीही होऊ शकत महाराज. पुन्हा आपले दूत पाठवून त्यांना त्यांना आशीर्वादित करणं, योग्य मार्गदर्शन करून चांगल्या मार्गाला लावणं आवश्यक आहे महाराज ... तुझ्यासारखा तूच देवा ... धुन ऐकू आली त्या आवाजानं मला जाग आली अन स्वप्न अधुरे राहिले भंगले ते कायमचेच ....