The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Pallavi Udhoji

Drama Tragedy

3  

Pallavi Udhoji

Drama Tragedy

एक नि:शब्द शांतता

एक नि:शब्द शांतता

2 mins
605


आज खूप दिवसांनी सकाळी निवांत वेळ मिळाला. वाटलं फिरून आली तर मस्तपैकी दिपकसोबत चहा घ्यावा. घरी पोचली तर कळलं दिपकला कॉल आल्यामुळे तो आधीच निघून गेला.


दीपक आणि माझ्या संसाराला आता जवळजवळ १० वर्ष झाली. दिपकच्या ऑफिसमध्ये मी काम करत होती. दीपक आणि माझा संसार खूप छान चालू होता. आम्हा दोघांना मुलाची भारी हौस पण १० वर्ष झाली तरीपण आमच्या संसारावर एकही फुल अजून उमलले नाही. पण आम्हाला आता त्याचं काही वाटेनासे झाले.


सुरुवातीला वाईट वाटत होतं. आयुष्यात काय हवं असतं आपला साथीदार जर आपल्याला आयुष्यभरासाठी साथ देणारा असेल तर अजून काय हवं असतं. एकच हौस होती मुलाची पण जाऊ दे.

चहा संपला, चला... पटापट काम उरकली. स्वयंपाक करून ऑफिसची तयारी केली अन् ऑफिसमध्ये पोहचली.


दिवसभर काम झाली. दिपक आहे का बघायला त्याच्या केबिनला गेली. तो खूप तणावात दिसला.

दीपक काय झाले. आज तू घरूनही लवकर निघाला. काही बोलला नाही काय झालं.


काही नाही गं एक शल्य मनाला टोचतं की मी सगळं सुख तुला दिलं पण आपली मुलाची हौस काही मी पूर्ण नाही करू शकत.


अरे दीपक, आता आपण ठरवलं न की आता आनंदात दोघांनी आपला संसार सुखी ठेवायचा आता हे काय मध्येच.


दिपकला कसंतरी समजलं आणि ऑफिस आटोपून घरी आलो.


दीपक चहा घेणार का.


हो कर घेऊ...


दोघंही चहा घेत असताना शेजारच्या देशमुख काकू चेहरा उतरून आल्या. देशमुख काकू खूप तणावात दिसल्या.


या काकू बसा मी चहा आणते...


नको गं मला चहा नको.


काय झालं सांगा...


असं विचारताच त्या खूप रडायला लागल्या.


दिपकने पाणी आणले. काकू आधी शांत व्हा. काय झाले शांतपणे सांगा...


काकू बोलत होत्या, आज मला यांची खूप आठवण येते. मला सोडून त्यांना आज २ वर्ष झाली, आपण खरंच खूप परावलंबी होतो. माहिती आहे का घराला घरपण तेव्हा असतं, घरात जेव्हा शांतता असते. ही मुलं आपण जेव्हा म्हातारं होतो तेव्हा ही का त्रास देतात. आज मला माझा मुलगा व सून वाटेल तशी बोलली. दीपक संध्याकाळी येताना जरा वृद्धाश्रमाची चौकशी करून येशील का? किती पैसे भरावे लागतात. आता मला या वेदना सहन नाही होत.


हे एेकून आम्हाला खूप वाईट वाटले. खरंच आयुष्य हे असं असतं का की म्हातारं वयात या वेदनांना आपल्या दिलेल्या धीराचा भार सहन होत नाही. का असे चटके ही मुलं या वयात देतात.


त्यांना समजावण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला. त्यानंतर त्या घरी गेल्या.


आम्ही चहा संपवला आणि खूप वेळ आम्ही विचार करत होतो की मुलं जर म्हातारपणी अशी निघाली तर बरेच आहे की आपल्याला मुलं नाही ते. असा विचार करून आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत आपले अश्रू गाळत विसावलो.


Rate this content
Log in

More marathi story from Pallavi Udhoji

Similar marathi story from Drama