Mitesh Kadam

Comedy Others

4.6  

Mitesh Kadam

Comedy Others

एक कॉफी ७०० ₹

एक कॉफी ७०० ₹

4 mins
2.2K


एक कॉफी ७००रु..... ऐकुन विचित्र वाटलं असेल तुम्हाला पण खरं आहे काही वर्षांपूर्वी मी कॅफे कॉफी डे मध्ये गेलो होतो. अत्यंत सुंदर वातावरण होत. आणि हो मी पाहिल्यांद्याच कॉफी पिण्याचा अनुभव होता एरवी मी टपरी शिवाय कॉफी पिली नव्हती. त्या मुळे मॉल मध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि मुळात आमच्या मनात भीतीच असते की एवढ्या मोठ्या लोकांच्या सोबत आम्ही फिरू कसे शकतो..


आदल्या दिवशी नवीन मैत्रिणी ला भेटायला जायचं या गोष्टीत गुंगलो होतो. पगाराचे दिवस नव्हते त्या मुळे सर्वांकडून उसने घेऊन मैत्रिणी ला भेटायला जाणार याच नवल नाही काही तेव्हा.

तो दिवस आठवतो अविसमरणीय क्षण होता तो आणि असेल सुद्धा आयुष्यात एवढा मोठा झटका मला पहिल्यांदाच भेटला होता.

मंगळवार ऑक्टोबर चा महिना होता माझं नवीन नवीन नात जुळलं होत. आम्ही आधी पासून मध्यम वर्गीय आई बाबांनी कधी मॉल किंवा आणखी काही ब्रँड अश्या गोष्टीशी ओळख करून दिली नव्हती. आणि लवकरच होणार होती. 


सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे इंग्रजी चे वांधे आणि त्यातल्यात्यात मॉल मध्ये गेलं की तुमचं स्वागत इंग्रजी मध्ये केलं जातं. तसच काही माझं झालं आम्ही ट्रेन मधुन उतरल्यावर ठरलं की मॉल मध्ये जाऊयात पण मी कधी गेलो नाही असं तिला सांगितलं.. तिने मान हलवली आणि म्हणाली चालेल.

मी पुढे पुढे चालत होतो ती मागे मागे कारण तेव्हा हातात हात घालून चालायची हिम्मत नसायची.

कुणीतरी बघेल???

घरी समजेल???

लोक काय म्हणतील???

हीच प्रश्न मनात यायची. पण सध्या जग खुप पुढे गेलाय आणि मी मागे चाललोय. त्या आठवणी नक्की आज सोन्यासारख्या वाटतात. 

आठवणीत जगण्याची एक वेगळीच नशा असते हे खरं आहे. आपण कधी दुःखी असलो की गोड आठवणी आठवल्या की कळत नकळतपणे चेहऱ्यावर एक हास्य येत खर सोन तेच असत अस मला तरी नक्की वाटत.


तसच पुढे गेल्यावर आम्ही कॅफे कॉफी डे मध्ये जाऊन बसलो. ती माझ्या समोरच बसली. बॅग मांडीवर घेऊन त्यात काहीतरी काढत असावी. मला कळलं ती पैशाचे पाकीट काढत होती. मी तिला सांगितले तुम्ही पैसे नका देऊ मी देतो फक्त तुम्ही ऑर्डर द्या.. करण मी आजवर कधी ऑर्डर दिली नाही कशी देतात हे सुद्धा माहीत नाही. तुम्ही माझी तेवढी मदत कराल का असा प्रश्न मी तिला केला? तिने काहीच उत्तर दिलं नाही

असाच वेळ निघून चालला होता. अर्धा तास ती निमूटपणे बसली होती मी सुद्धा गपचूप तिला निरखत होतो तिचे हाव-भाव केसांवरून फिरणारा तिचा हात. सर्व गोष्टी निरखत होतो थोडा वेळ वाट बघितल्यावर मलाच राहवेना मी स्वतः उठून काउंटर कडे गेलो तिने एकदम गोड स्मित हास्य केलं. मला काही कळलंच नाही.


काउंटर वर पोचलो असता तिथे एक मुलगी उभी होती तिने प्रश्न केला 

GOOD MORNING SIR 

HOW CAN I HELP YOU SIR??

CAN YOU PLACED ORDER??????

माझ्या चेहऱ्यावरचा रंग बदलला मी म्हटलं ताई मला कॉफी पाहिजे तुम्ही द्याल का मला ???

तिने उत्तर दिलं हो सर

कोणती देऊ???

मी म्हटलं कोणतीही द्या तिने खुप सारी नाव सांगितली मला त्यातलं एकही समजलं नाही.. आजही आठवत नाही तिने किती सारी नाव घेतली होती बापरे!!!!!

मी तिला सांगितलं ताई कोणतीही द्या पण दोन द्या. मी आणि माझी मैत्रीण आम्हा दोघांना दोन कॉफी द्या. 

तिने ऑर्डर घेतली तर खरी 

५ ते ७ मिनिटे मी काउंटर वर उभाच होतो ती ताई आता बॉम्ब फोडणार होती तिने कॉम्पुटर मध्ये बटन दाबायला सुरुवात केली. मी तिच्या चेहऱ्याकडे बघत होतो तिचे बटन दाबून झाल्यावर मशीन मधुन बिल बाहेर आल

तिने सांगितलं सर १४००रु. बिल झालाय माझ्या पायाखालची जमीनच सरकली १४००रु. कॉफी एवढ्या पैशात मी एक वर्ष भर कॉफी पिली असती बाहेर पण इज्जत जाऊ नये म्हणून तिला १४००रु. दिले आणि गपचुप जाऊन बसलो. माझ्या मैत्रिणीने विचारलं सुद्धा नाही की काय झालं मी बिल हातात घेऊन त्या कडे बघतच होतो.

थोडा वेळ राहून तिनेच विचारलं काय झालं चेहऱ्यावर १२ का वाजलेत???

मी काहीही बोललो नाही तिच्या कडे बिल दिल आणि गप्प बसलो बिल बघताच तिच्या सुद्धा चेहऱ्यावर १२ वाजले तिने विचारलं इतकी महाग कॉफी ???

स्वस्त वाली घ्यायची ना????

मी उत्तर दिलं मला जर माहीत असत तर तुम्हाला बोललो असतो का तुम्ही जा म्हणून तुम्ही गेले नाहीत म्हणून मला १४००रु. ची कॉफी घ्याव्ही लागली. 

थोड्या वेळातच ती ताई तिकडून हाका मारत होती माझं लक्षच नव्हतं तिने सांगितलं सर तुमची ऑर्डर इथे सेल्फ सर्विस आहे आम्ही सर्व्ह करत नाही.

बघतो तर काय आमच्या कडे अंघोळीच्या मगा एवढा एक एक कप होता त्यात हार्ट काढलं होत आणि त्यात लव्ह लिहल होत. त्या सर्वांचे पैसे घेतले माझ्या कडून पण माझं ओझं जरा हलकं केलं होतं त्यांनी खर तर मी त्या साठीच आलो होतो पण सुरुवात कुठून करू हेच सुचत नव्हतं.


त्या नंतर मी एक सीप घेतला इतकी कडू कडू कॉफी होती की बस माझी कॉफी वरून इच्छा मेलीच तेव्हा साखर नव्हती त्या मध्ये, म्हणून विचार करत होतो ती ताई विसरली असेल कदाचित.

मी त्या ताई ला विचारू की नको विचारू की नको असं करत करत शेवटी मी गेलोच नाही इज्जत जाईल म्हणून गप्प गुमान कडू कडू कॉफी काशी बशी पिली. पण माझी मैत्रीण रागावली होती कदाचित तिने एकही घोट घेतला नाही. मी तिला विनवणी केली की थोडं तरी प्या तुम्ही पण... ती अडूनच होती.

शेवटी १४००रु. चा विचार करून ती सुदधा मीच पिली कॉफी कारण एवढे पैसे देऊन फेकून देण्या पेक्षा ती कॉफी पिलेली बरी हे मला तेव्हा योग्य वाटलं, पण त्या वेळेस मला ऑर्डर देत आली असती तर तो क्षण अविस्मरणीय झालाच नसता.


पण त्या दिवसानंतर मी पुन्हा कधी कॅफे कॉफी डे मध्ये गेलो नाही नंतर मला समजले की तिथे साखर वेगळीच मिळते हे मला नंतर कळाल. पण आपण नवीन असतो तेव्हा सर्व छान छान असत नंतर सर्व गोष्टी बदलत जातात


तुमच्या सोबत अस कधी घडलाय का????


घडलं असेल तर नक्की कळवा



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy