एक होती कांचन (भाग-३)
एक होती कांचन (भाग-३)
(भाग-३)
पंकज ठीक दहा वाजता ऑफिसमध्ये पोहोचला. आल्या-आल्या सर्व स्टाफनं त्याला उठून अभिवादन केलं. सर्वांचं अभिवादन स्वीकारत सुहास्य वदनानं सर्वांना 'विश्' करत तो आसनावर स्थानापन्न झाला. गेल्या एक वर्षापासून तो या खाजगी कंपनीच्या स्टोअर्स विभाग प्रमुख पदावर काम करत होता.
टेबलावर ठेवलेली एक एक फाईल पंकज चाळत होता. अधून मधून काही आवश्यक महिती आपल्या सहाय्यकां कडून मागवून घेत होता. सर्व फाईली नजरे खालून घातल्या नंतर त्यानं त्याची दैनंदिन कामकाजाची रूपरेषा असलेली डायरी काढून आजच्या तारखेच्या नोंदीवर नजर टाकली. इतर कामकाजा शिवाय आज आणखी एक जास्तीचं काम होतं, स्टोअर असिस्टंटच्या रिक्त जागा भरण्या साठी त्यानं कंपनी महा व्यवस्थापक श्री. देशमुख यांचेकडे बोलणं केलेलं होतं. अन् त्याची मागणी मंजूर सुद्धा झाली होती. त्या संदर्भातच श्री. देशमुखांनी सर्व विभाग प्रमुखांची मीटिंग बोलावलेली होती.
"रमेssश, त्यानं आपल्या सहाय्यकास आवाज दिला.
"यस् सर"
"रमेश, मी जरा साहेबांकडे जातोय. तास दोन तास लागतील कदाचित्. काही पेपर्सवर माझ्या सह्या लागणार असतील तर पेपर्स घेऊन ये. मी सह्या करून ठेवतो. नंतर मात्र अति महत्वाच्या कामा शिवाय मीटिंग मध्ये डिस्टर्ब करू नकोस. मी अधून मधून फोन करत राहीन. काही आवश्यकता भासल्यास त्या वेळेस मला सांग. ओ के?"
"ठीक आहे सर."
रमेशने दोन तीन फाईली समोर आणून ठेवल्या.
पंकज पेपर्सवर सह्या करत असे पर्यंतच इंटरकॉमची घंटी वाजली. त्यानं रिसिव्हर उचलून कानाला लावला.
"यस सर. पंकज हिअर."
"मि. पंकज , आपण अद्याप आपला विभाग सोडलेला दिसत नाही. आम्ही आपली वाट पहात आहोत." पलीकडून महा व्यवस्थापक देशमुखांचा आवाज आला.
"निघालोय सर." त्यानं रिसिव्हर खाली ठेवला. अन् उठून साहेबांकडे निघाला.
पंकज साहेबांच्या केबीनमध्ये शिरला, तेव्हा तेथे अगोदरच दोन तीन विभाग प्रमुख बसलेले होते.
"या मिस्टर पंकज, आम्ही आपलीच वाट केव्हाची प्रतीक्षा करीत आहोत. आज आपणास दोन तीन विभागांच्या साठी सात-आठ असिस्टंट्स घ्यायचे आहेत. त्या साठी काही उमेदवारांना आपण मुलाखतीला बोलावलं आहे. तरी आपण सर्वजण मिळून मुलाखत घ्यावी अन् आपणास योग्य असे सहाय्यक निवडावेत." देशमुखांनी सर्वांना इथे बोलावण्याचं कारण स्पष्ट केलं अन् पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा करून दिला.
मुलाखती सुरू झाल्या. एकेक उमेदवार आत येत होता. आपापली योग्यता सिद्ध करण्या साठी आवश्यक ती कागदपत्रे दाखवित होता. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुचेल तशी उत्तरं देत होता. उमेदवार बरेच आलेले असल्यामुळे मुलाखतीचा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता. मध्यंतरी चहा, बिस्किट्स येऊन गेले. तेवढा वेळ कार्यक्रम थांबला होता.
चहापाना नंतर पुन्हा मुलाखतीला सुरुवात झाली. पुन्हा एकेक उमेदवार आत येऊन जात होता. एक महिला उमेदवार आत आली अन् .......
पंकज एकदम दचकलाच. अं? ही कांचन तर नव्हे? छे! छे! ती तर या जगातच नाहीय. मग ती कशी असेल? मला भास तर होत नाही ना? पण ही तर हुबेहूब तशीच दिसते. तोच चेहरा, तोच बांधा, तोच काळा सावळा रंग. अन् ...अरे, हिचं स्मित देखील तेच. अन् हे काय? हिच्या डोळ्यातलं तेज देखील तेच आहे.
"काय झालं मिस्टर पंकज? काही विशेष?" पंकजच्या गोंधळलेल्या स्थितीचा अंदाज घेण्या साठी देशमुखांचा प्रश्न.
"अं? सॉरी सर. तसं काही विशेष नाही. इफ यू नेव्हर माईंड. मी जरा फ्रेश होऊन येतो."
"ओ. के. बी रिलॅक्स." श्री. देशमुखांनी परवानगी दिली.
पंकज उठून केबिनच्या बाहेर गेला. त्या मुलीचा अर्ज 'स्टोअर असिस्टंट'च्या....
