दुर्भाग्य तिचं....भाग :1
दुर्भाग्य तिचं....भाग :1
"आई आई आज का एवढं छान जेवण बनवलंस आहेस ...?
रघु आईला विचारत होता...?
अरे आज बाबाचा वाढदिवस आहे ना म्हणून...
रवी आईला म्हणाला आई बाबा कोठून येणार ... हा बाबानचाच फोटो घरात असतो ते तर कधीच दिसत नाहीत...? कधी येणार गं बाबा...?
मधुरा डोळ्यांतील पाण्यांना अडवू शकली नाही. लहान मुलांचे निरागस प्रश्न ऐकून तीला काय उत्तर द्यावे कळत नव्हते.
मधुरा आणि माधव चा संसार अगदी दृष्ट लागण्यासारखं होता. माधवची आई मालतीताई मधुरा आणि माधवला जीवापाड जपत होत्या.
काळाने घाव घातला आणि हसता खेळता परिवार एका क्षणात उध्वस्त झाला.
माधव एका कार अपघातात गेला. हे दुःख मालतीताईना सहन होणार नव्हत. किती तरी दिवस त्या अंथरुणात खिळून होत्या. काही महिन्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
दोन मुलांची जबाबदारी एकटी मधुरावर आली. सासूबाईचा आसरा होता तोही राहिला नव्हता.
मधुरा माधवच्या दुःखात अखंड बुडलेली त्यात सासूबाईंची अपूर्ण साथ....!
त्यामुळे दोन घाव तिच्या काळजावर बसले होते. हे दुःख तिला कधीच सहन होणारे नव्हते, दोन मुलांकडे बघत तिने स्वतःला सावरले.
मधुराने आज माधवच्या वाढदिवसासाठी गोड पंचपक्वनाचे ताट बनवले होतें. माधवच्या आवडीचे पदार्थ तिने आवर्जून बनवले होतें. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. आर्थिक परिस्थिती बेताचीच पण तरीही त्यात दोघेही खुश होतें.
माधवला जाऊन आज सहा वर्ष झाली होती. एकही दिवस त्याच्या आठवणीशिवाय मधुराचा जात नव्हता. मुलांना घडवण्यासाठी तीचे अतोनात प्रयत्न सुरु होतें. मुलांच्या उज्जवलं भविष्याचा तिने ध्यास घेतला होता. तीही त्यासाठी कष्ट घेत होती. माधवला मुलांना डॉक्टर आणि इंजिनीर करण्याचं स्वप्नं होतं. त्यामुळे माधवच अपूर्ण राहिलेले स्वप्नं मधुरा पूर्ण करणार होती.
एकटी बाई म्हणून समाजाचाही तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. खूप वेळा तिला वाईट अनुभवही आले. त्या सगळ्यांना तोंड देत ती वाटचाल करत होती.
माधवचा खूप जवळचा मित्र समीर तिला नेहमी मदत करत असे . त्याच्याच ओळखीने एका कंपनीत मधुरा काम करत होती.
मधुराच शिक्षण जेमतेमच असल्याने तिचा पगार जास्त नव्हता. तरीही घरी मिळेल त्या वेळत घरगुती उद्योग करत होती. तिचे दिवस कष्टातून सरत होतें. मुले मोठी होतं होती. आईच्या कष्टाची दोघांनाही जाण होती.
मधुरा खूप खुश होती. आज तिच्या कष्टाचं चीज झालं होतं. तिची मुलं कर्तृत्ववान निघाली. दोघांनीही इंजिनीर आणि डॉक्टरकी मध्ये टॉप केलं.
रवी धावतच घरी आला आईच्या गळ्यात पडून रडला. ते त्याचे आनंदाश्रू होतें.
रवी काय झालं, अरे असं रडतं का कोणी लहान बाळासारखं....!
आई तुझ्यामुळेच आज घडलो, तू खूप खंबीर पाठीशी उभी राहिलीस. तुला यापुढे कसलाही त्रास होऊन देणार नाही आई....!
मुलाच बोलणं ऐकून मधुराच्याही डोळ्यातून पाणी आलं. बाबांच्या फोटो च्या पाया पडायला मधुराने सांगितलं . शेजारी असणाऱ्या मालतीताईच्या फोटोचा आशीर्वाद रवीने घेतला . तोपर्यंत राघवही घरी आला. त्याने ही दोघांच्या फोटो चा आशीर्वाद घेतला.
काही दिवसातच रवीने स्वतःचं क्लिनिक उभं केलं.
समीरला बातमी कळताच मधुराच्या घरी आले. वहिनी जिंकलात तुम्ही...!!
कष्टाचं फळ हाती आलं.
रवी, रघु दोघे जण हसतच समिरकडे आले . दोघांनी समीर काकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
रघु, "काका तुम्ही पण काही आमच्यासाठी कमी केलं का....??
समीर, तुझं बाबा म्हणजे देवमाणूस दुसर्यांसाठी नेहमी मदतीला उभे राहणारे त्या मनानं तर मी काहीच केलं नाही रघु .
तुझ्याही बाबांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. कधीही न फिटण्यासारखे. आम्ही जिगरी दोस्त लहानपणापासूनच नेहमी माझ्या मदतीला धावायचा,"समीर सांगत होतें.
मधुराताई समिरभाऊजीनसाठी चहा घेऊन आल्या, आणि आज जेवण करूनच जायचं भाऊजी असही सांगितलं. आज मस्त गोड जेवण बनवते.
मधुराताई बास झालं कष्ट आता...!
आता निवांत राहा. सुनबाई आणा आता. किती अजून कष्ट करणार आहात ....?
काय रवी बरोबर बोलो ना....!,"समीर ने हसतच मधुराताईना प्रश्न केला.
मधुराताई म्हणाल्या , "हो बघा तुम्ही शिकलेली, सुसंस्कृत माझ्या घराला सांभाळून घेईल अशी...मुलगी.
रवी बरोबर बोलते ना मी.....??
तुझ्या मनात कोणी असेल तरी सांग,"मधुराताई म्हणाल्या...!
रवी आई तसं काही नाही....तू म्हणशील ते...! रवीने त्याची बाजू मांडली.
समीर म्हणाला, " आहे माझ्या बघण्यात, या रविवारी जाऊ त्यांच्या घरी...बघा तुम्हाला कशी वाटतेय. तशी बोलणी करू.
रविवारी पाहुणे मंडळी शालिनीला पाहण्यासाठी गेली. शालिनी दिसायला सुंदर, नाकी डोळी छान होती .मधुराला काही देण्याघेण्याची इच्छा नव्हती. त्यांना मुलगी चांगली घराला जपणारी हवी होती. त्यांना मुलगी बघताच पसंद पडली. छान सुसंस्कृत वाटली. रवीलाही शालिनी आवडली.
काही महिन्यातच लग्न होऊन शालिनी घरी आली,आणि तिने रंग दाखवायला सुरुवात केली. सकाळी उठली आणि सासूबाईंनाच हुकूम सोडला....! मला उठलं की चहा लागतो...? अजून चहा झालाच नाही का....??मधुराला तर तिच्या बोलण्याने धक्काच बसला.
काय समजलं हिला काय निघाली...!असं त्यांना वाटू लागलं.
मधुरा म्हणाली, "अग मुलांचे डब्बे करत ,पाणी भरायचं होतें म्हणून उशीर झाला. थांब देते तुला चहा त्यांनीच समजूतदारपणा दाखवत म्हणाल्या. नाष्टा करून शालिनी जवळच माहेर असल्याने माहेरी निघून गेली. जेवणाच्या वेळेवर आली. तोपर्यंत मधुराताईंनी घरातील सगळं आवरलं होतं. शालिनीचा हा रोजचाच दिनक्रम ठरला होता.
एक दिवशी मधुराने तिच्या रूममध्ये पाहिले तर रूम अस्ताव्यस्त पडली होती. मधुराताई सासू असून तिची रूम साफ करायला गेल्या तर, तिने माझ्या रूममध्ये न विचारता पाऊलच कस ठेवल म्हणून नाहीतशी बोलली आणि अशीही म्हणाली, यापुढे मला विचारल्याशिवाय रूममध्ये पाऊल ठेवायचा नाही....?
मधुराला त्या दिवशी खूप वाईट वाटले, स्वतःच्याच घरात परकेपणाची जाणीव सुनेने करून दिली होती. घरातील तर काही शालिनी पाहत नव्हती. सासूला लग्न करून आले हेच उपकार झाल्यासारखी दाखवत होती. शालिनीची आई पण तिला चुकीची शिकवण देत होती.
(क्रमश:)
