दिल ये नादान (भाग 1)
दिल ये नादान (भाग 1)
अभि मी घरी बोलले आपल्या बद्दल. जान्हवी कॉफ़ीचा कप उचलत म्हणाली. मग काय बोलले आई बाबा? अभि आपण चार वर्ष एकत्र आहोत तुला वाटते ना आपल लग्न व्हावे? म्हणजे मी लग्नाला नाही म्हणत आहे का? जान्हवी तू स्पष्ट बोल जो तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल. अभि रागातच म्हणाला.
हेच अभि तुला राग ही पटकन येतो तू समोरच्याला समजून घेत नाहीस.
हो रियली चार वर्षात आता ही गोष्ट तुला खटकु लागली .अभि
अभि वाटेल ते आरोप नको करू,लग्न करायचे तर काही तरी बेस हवा समजते का तुला? जान्हवी.
सरळ सरळ सांग ना जान्हवी की मला नोकरी नाही. रादर मी काही ही कमवत नाही. चार ओळी लिहिनारा मी एक कफ़लल्क लेखक ,कवी, मला इतरां सारखा चार आकडी पगार नाही. एक पुस्तक छापले की मला नावा पुरते मानधन मिळणार. अभि
अभि मी कधी तुला तुझ्या लिखाना बद्दल बोलले का? पण संसार असा कथा आणि कविता लिहून होत नसतो. जरा प्रैक्टिकल विचार करून बघ. जान्हवी.
लिसन,लिहिन हे माझ पैशन आहे आणि त्याच टाईपच काही काम मिळाले ना तरच मी नोकरी करेन. आदर वाइज आहे त्या कंडीशन मध्ये आय एम हैप्पी . अभि
अभि नोकरी करत करत साईंड बाय साइड तुझी हॉबी जपता येईल, जान्हवी.
जान्हवी मला नोकरी करने जमनार नाही तुला माझ्या बंधनातून या रिलेशनशिप मधून मी मुक्त करतो. तसे ही तुझ्या आई बाबांना असा भंणग जावइ नकोच असेल हो ना. सो गुडबाय अण्ड बी हैप्पी जान.... सेकंदात अभि कैफे मधून बाहेर पडला. अभि ऐकून तर घे माझ अभि...जान्हवी त्याला आवाज देत होती पण अभिला आता काही ऐकू येत नव्हते. डोळयाच्या कड़ा हाताने पुसत त्याने बाइक सुरु केली. " गुंणत्यात तुझ्या गुंतुंन ,कधी अडकलो जरासा, नको आता हे उन्हाचे झळे,सावलयांनो या परतूनी पुन्हा."
"कोई हो परेशानी, या दिल की नादानी.
उलझ गए हो,जिंदगी की उलझनो में,
रास्ता दिखाई देता हैं ना मिलती है मंजिल,
चाहिय दिल को सुकून, तो खोल दो अपने दिल के राज, .......देने इश्क का मशवरा आ गया आर जे "राज".
नमस्कार,हाय,हैलो कसे आहात? मस्त जानेवारी ची कुड़कुडनारी थंडी आणि उबदार रजई त पडून माझा शो ऐकत आहात. त्या बद्दल आभार आणि तुम्हा सर्वाचे स्वागत करतो मी तुमचा लाडका लवगुरु " आर जे राज.. आणि तुम्ही ऐकत आहात रेड एफ एम . .. तयार ठेवा तुमचे प्रश्न आणि कॉल करा. 98......... नम्बर वर. कार्यक्रमाची सुरवात करूया या सुंदर गान्याने.. " तुला पाहता आजही ,
हासते या मनी चांदणे
बहरुन प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी.....मुंबई पुणे 3
कसला भारी आवाज आहे याचा पण हा आवाज आणि अभि चा आवाज जरा सेम वाटतो ना? कस शक्य असेल पण नाही हा कोणी आर जे राज आहे. मला भास होतोय फ़क्त. दोन वर्ष झाली आज ही अभि ला नाही विसरु शकले. त्या नन्तर त्याने काही कॉन्टैकट केला नाही. नम्बर ही चेंज केला. अभि एकदा तरी माझ ऐकुन घ्यायचे होते रे का असा रागात निघुन गेलास. जान्हवी अभि च्या आठवणीत अश्रु ढाळत होती. फ़क्त या आर जे चा आवाज थोड़ा अभि सारखा वाटतो म्हणुन वेड्या सारखी रोज रात्री 10 वाजता "लवगुरु" हा रेडियो शो ऐकत असायची. तिच्या मनात आज ही अभिच होता पण अभि च काय? तो कुठे आहे? काय करतो काही ही माहित नव्हते. आपल प्रेम अस सहजासहजी कोणी कस विसरु शकते. मागच्या महिन्यात माझा वाढदिवस होता तेव्हा वाटले अभि नक़्क़ी कॉल करेल आणि विश करेल पण नाही अभि पूर्णपणे मला विसरून गेला. तो कुठे असतो हे कोणालाच माहिती नाही. जान्हवी अभि च्या विचारात हरवून कधी तरी झोपी गेली.
क्रमश....

