End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Charumati Ramdas

Fantasy


1  

Charumati Ramdas

Fantasy


धनु-कोष्ठक ( एक अंश )

धनु-कोष्ठक ( एक अंश )

7 mins 1.0K 7 mins 1.0K

(कादम्बरी 'धनु-कोष्ठक' चा एक अंश )


लेखक : सिर्गेइ नोसव

भाषांतर : आ. चारुमति रामदास01.08


शॉवर. टॉयलेट. झोप नाही येणार. तो वाचंत बसेल.


01.20


लोळला. नोटबुक उघडली.

पहिला पैरेग्राफ.

01.21


आणि पुन्हां – सुरुवातीपासून. कारण की समजायला कठीण आहे.


01.22


आणि पुन्हां – कारण की खरोखरंच कठीण आहे:

{{{ हा तिसरा आठवडा आहे, जेव्हांपासून मी - - : कन्स्तान्तीन अन्द्रेयेविच मूखिन आहे, वय एकोणचाळीस वर्ष, कोणच्यातरी वस्तूंचा स्पेशलिस्ट, लग्न झालेलं आहे, मनमिळाऊ, आवडतं खाद्य पदार्थ - - : फ्राइड वेजिटेबल कबाब; एक्स्ट्रा वजन 8 किलोग्राम, अपरिहार्य प्रश्न - - : तर मग मूखिनचं काय? त्याला माहीत आहे कां, की मूखिन तो नाही, परंतु मी आहे? उत्तर नकारार्थी आहे - - : नाही. मूखिनला माहीत नाहीये आणि तो माहीत होण्यास अयोग्य आहे, जसा न माहीत होण्यासपण अयोग्य आहे, आपल्या स्वतःच्या अनुपस्थितीमुळे, मी झाल्यामुळे. जेव्हां मूखिनच्या जागेवर मी आहे, तेव्हां तो नाहीये. मूखिन तेव्हांच मूखिन होईल, जेव्हां मी मूखिन होणं बंद करेन. आशा आहे, की कधीतरी मूखिन होणं समाप्त करेन, कारण मूखिन होणं भाग्याचा खेळ आहे. - - : प्रश्न - - : मी मूखिन होणं केव्हां थांबवेन? - - : उत्तर नाही देणार; ते माझ्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे. }}}

कपितोनव इलेक्ट्रिक केटल चालू करतो. बाथरूममधे जाऊन पुन्हां एकदा तोंड धुतो – आधीच्या शॉवर व्यतिरिक्त.

कपितोनव शांत आहे. तो स्वस्थ्य आहे आणि पूर्णपणे शुद्धीवर आहे. तो नोट्सला ग्रहण करण्याच्या आणि त्यांची मीमांसा करण्यासाठी तयार आहे.


01.28


{{{आधीचं ‘नोट’ चाचणीसाठी लिहिलं होतं. मला धनु-कोष्ठकांची विश्वसनीयता तपासायची होती. चाचणी यशस्वी झाली. कोणतीही संदेहास्पदवस्तू आढळली नाही. दोन तासांच्या ‘मैन्टेनेन्स-ब्रेक’नंतर पुन्हां लिहिणं चालू करतो.         

सध्यां मला, ठळकपणे, जे झालेलं आहे, आणि जे होतं आहे, त्याचा सार प्रस्तुत करायचा आहे. सोपी गोष्ट नाहीये. पण असं कुणी म्हटलं होतं, की सोपं असेल? प्रयत्न करीन. जर जमलं, तर पुढे अगदी सोपं होईल; माझा ह्यावर विश्वास आहे.

तर गोष्ट अशी आहे.

बुधवारी मी स्वतःला मूखिन अनुभवंत होतो, पण गुरुवारी वाटलं, की हा माझा भास होता. हे प्रतिस्थापन तर फार पूर्वीच झालेलं होतं. पण केव्हां? जसं की आज, लक्षणं आठवतांना, मला समजलं, की प्रतिस्थापन मागच्याच्या मागच्या आठवड्यांत झालं होतं, आणि जर आजपासून उलट मोजणं सुरूं केलं तर - - : अठरा दिवसांपूर्वी, त्या दिवसाला धरलं तर. विचित्र गोष्ट ही आहे, की ह्या गुरुवारपर्यंत मी खरंच स्वतःला, मूखिन सारखा, खरा मूखिन समजंत होतो, जणु प्रतिस्थापन झालेलंच नव्हतं. हा मध्यंतरीचा काळ जरा जास्तंच लांबला, पण आता सगळं मागे राहिलंय.

पुन्हां एकदा ‘पॉइन्ट्स’ प्रमाणे.

1. अडीच आठवड्यांपूर्वी प्रतिस्थापन झालं. बाह्य नियंत्रक शक्तीच्या माध्यमाने ‘ऑब्जेक्ट’ मूखिनचं मूखिन होणं थांबलं, आणि तो ‘सब्जेक्ट’ ‘मी’ झाला, ज्याला तोपर्यंत समजंत नव्हतं, की मी मूखिन नाहीये, आणि त्याच मूखिन द्वारे स्वतःला प्रतिस्थापित करून बसलो आहे. रूपांतरणाची प्रक्रिया पंधरा दिवस चालली, ह्या गुरुवारपर्यंत, आणि ह्या पंधरा दिवसांत, सगळ्यांत महत्वपूर्ण राहून, तसा अनेक स्तरांच्या स्कैनिंग सिस्टमचा निष्क्रिय अवयव असूनही, मी नकळतंच रिवर्स ट्रेंचिंगचा उद्देश्य पूर्ण करंत राहिलो.

2. गुरुवारी मला ह्या गोष्टीचा अर्थ कळला, की मागच्याच्या मागच्या आठवड्यांत काय झालं होतं - - : मला कळंल, की वास्तवांत मी कोण आहे. जास्त बरोबर होईल हे सांगणं, मी ह्या गोष्टीला जास्त चांगल्या प्रकारे समजून चुकलो की सगळ्यांत आधी मी कोण नाहीये - - : सैद्धांतिक रूपाने मूखिन नाहीये. उत्तर देणं कठिण वाटतंय, या तर ते सगळ्यांच्या हितासाठी असो, किंवा माझ्या स्वतःसाठी हानिकारक असो, मी हेच समजलो आहे. मला मान्य आहे, की प्रोजेक्टच्या उद्देश्यांच्या दृष्टीने, ज्यांना मीसुद्धां ब-याच प्रमाणांत समजलेलो नाहीये, मूखिनहून भिन्न ‘सब्जेक्ट’च्या रूपांत स्वतःबद्दल माझे अनुमान, न केवळ काही शक्यतांचा आविष्कार करतील, तर ते कोणाच्यातरी समस्यांनीपण ग्रस्त आहेत, आणि खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. काहीही असो, मला विश्वास आहे - - : माझ्या द्वारे, ज्याने मूखिनला प्रतिस्थापित केलेलं आहे, स्वतःला मूखिनहून भिन्न समजणं, माझ्या स्वतःच्या प्राकृतिक विकासाचं कृत्य नाहीये, तर ते नियंत्रक शक्तीद्वारा माझ्यावर करण्यांत आलंय.

3. त्याच क्षणी मला सामान्य उद्देश्याच्या जवळ-जवळ सम्पूर्ण आकाराची कल्पना देण्यांत आली आणि सगळ्या संभावित क्षेत्रांच्या सदस्याच्या जवाबदारीची जाणीव करून देण्यांत आली. गोष्ट चाललीये आकाराची, न की खुद्द उद्देश्याची, ज्याचं सार जाणण्याची, स्पष्ट आहे, मला परवानगी नाहीये. त्याचबरोबर मला काही प्रमुख अवधारणा समजून घेण्याचं काम दिलं गेलं, ज्यांच्याशिवाय मी ह्याचा अर्थ समजूंच शकलो नसतो; ह्या अवधारणा आहेत - - : प्रोजेक्ट, नियंत्रक शक्ति, रिवर्स ट्रेन्चिंग, स्कैनिंग सिस्टम, संशोधक. त्याचबरोबर मला प्रतिबंधांची, सीमांची, परवानग्यांची कल्पना देण्यांत आली. सगळ्यांत आधी मला माझ्याद्वारे अवगत झालेला हा अर्थ लपवावा लागेल आणि कोणत्याही परिस्थितींत हे प्रकट होऊं द्यायचं नाहीये, की मी मूखिन नाहीये - - : ना तर मौखिक रूपांत, ना लिखित रूपांत. मला जाणीव आहे की मी ह्या प्रतिबंधांच उल्लंघन करतोय - - : आत्ता, स्वतःला तो सार प्रदर्शित करण्याची अनुमति देऊन, जो मला सुद्धा पूर्णपणे समजलेला नाहीये.    

4. आत्ता, वर निर्दिष्ट केलेलं समजण्याच्या तिस-या दिवशी, मी, स्वतःला तो सार प्रकट करण्याची अनुमति देऊन, जो मलासुद्धा पूर्णपणे कळलेला नाहीये, प्रतिबंधाचं उल्लंघन करतो आहे. मी प्रतिबंधाचं उल्लंघन करतोय, हे आपलाच विनीत पाठक असल्यामुळे मला स्पष्टपणे कळलेलं आहे. पण मी न घाबरतां प्रतिबंधाचं उल्लंघन करतो आहे, निःसंकोचपणे, बेधडकपणे, कारण की मला त्या क्षेत्राबद्दल समजलंय, जे कोणत्याही नियंत्रक शक्तीच्या अधीन नाहीये आणि जे संशोधकाच्या नजरेपासून सुद्धां मुक्त आहे. हा आहे माझा आविष्कार - - : तिहेरी धनु-कोष्ठकांचा ऑपरेटर - - : {{{- - - - - }}}. अविश्वसनीय वाटतंय, पण हे असंच आहे - - : जर मजकूर तिहेरी धनु-कोष्ठकांच्यामधे ठेवला, तर नियंत्रक शक्तिला कळणारसुद्धां नाही! सोपं आणि कल्पक! मी जवळ-जवळ भाग्यशाली आहे. हे नाही सांगणार की मला नियंत्रक शक्तीच्या ह्या अंधा-या कोप-याचा पत्ता कसा लागला; अनेक महान आविष्कारांप्रमाणे, माझा आविष्कारसुद्धां संयोगानेच (Incidental Case) प्रतीत झालेला वाटतो. मी पुनरुक्तिचा प्रयोगतर नाही केला - - : “Incidental Case”? तसं म्हटलं तर, ‘केस’म्हणजेच घटना (Incident) असते ना? पण मी पुनरुक्तिला नाही घाबरंत. भलेही काहीही घटित झालं असलं, तरी एक घटना जरूर उत्पन्न होत असते. घटनेची नियतीच आहे घटित होणं, म्हणूनंच ती घटना आहे! ‘केस’ प्रतीत होत असते - - : ‘केस’ प्रतीत होते - - : विश्वसनीयतेसकट, न की आवश्यकतेसहित. ‘केस’ आणि घटनेंत अंतर हे आहे - - : घटना प्रतीत नसते होत, पण ‘केस’ घटित होऊं शकते. ‘केस’ जास्त गतिमान आणि लवचिक असते. म्हणून मी ह्या गोष्टीशी सहमत आहे, की ह्याला ‘केस’ म्हणूं, वाद नाही घालणार, वरून वादपण स्वतःशीच. ‘केस’ घटित झाली. धनु-कोष्ठक - - : संयोगवश! - - : विस्मयकारक गुण असलेले. मी अदृश्य व्हायचा उपाय शोधून काढला - - : लिखाणांत. ह्या आविष्काराने मला काही प्राप्त होईल कां? हो, पण थोडंसं. मुक्ततेचं स्तर, पण तरीही - - : मला! आणखी कुणाला नाही, तर मला. मूखिनला नाही - - : मला! मी समजण्याचा प्रयत्न करूं शकतो, की मी कोण आहे, कां मी मूखिन नाहीये, आणि कां नेमकं मूखिनला मी मागच्याच्या मागच्या आठवड्यांत प्रतिस्थापित केलं, आणि काय प्रतिस्थापनाच्या भविष्याबद्दल माझे अंदाज विश्वसनीय आहेत, ज्यांच्याबद्दल इतक्यांत सांगायची माझी जरासुद्धां इच्छा नाहीये - - : शब्दांशी खेळण्याची माझी जबरदस्त आणि आनन्ददायक योग्यता असूनही, जी, मला वाटतं, की समजायला अगदी सोपी आहे (ओह, ती मला फार, फार कळते, तसं, स्वतःला कसा नाही समजणार?). आता, तीन धनु-कोष्ठकांच्या आत, मी काहीही लिहिलं तर त्यांत कोणी संशोधन नाही करू शकणार. मी अदृश्य आहे. माझा उल्हासोन्माद बाह्य शक्तींना अप्राप्य आहे, त्यांनी आपल्या काळांत माझ्या डोक्यांत कितीही शाखा उघडल्या असल्या तरीही! पण आपल्या आविष्काराचा दुरुपयोग मी नाही करणार. खरं तर त्याने काहीही बदलणार नाही. मी विश्वासघाती नाहीये, मी देशद्रोही नाहीये; मी एका विशिष्ठ उद्देश्याला समर्पित आहे, मग मला हेसुद्धां माहीत नसलं तरी चालेल की कोणत्या उद्देश्याला.

बस - - :... धनु-कोष्ठक, तिहेरी - - :... किती छान आहे हे! - - : ... विशेष गोष्ट - - : त्यांना बंद करायला विसरायचं नाही - - :...कल्पना करतानापण भीति वाटते, की जर विसरलो तर - - : ... सगळंच संपेल! सुरुवातीसाठी पुष्कळ आहे. मी बंद करतो.}}}


01.33     


कपितोनव चहा बनवतो (कप, उकळलेलं पाणी आणि पैकेट). तो खात्री करून घेतो की दाराचं कुलूप बंद केलंय. कप स्टूलवर ठेवून बिस्त-यावर पडतो आणि बेड-लैम्प ठीक करतो.


01.36

{{{धनु-कोष्ठक बंद केल्यानंतर चोवीस तास झाले आहेत - - : कोणताही प्रतिबंध नाहीये! - - : मस्त! - - : पुन्हां उघडतो! - - : उघडले!

आता तपशील. धनुषावृत मजकूराच्या क्रमांक 2पासून सुरू करतो (खूप सांकेतिक शब्द आहे, अपेक्षा करतो की पुढेसुद्धां ह्याचा उपयोग करेन).

ह्या गुरुवारी मला ज्याची परवानगी दिली होती, त्याच्या विश्लेषणाने सुरू करतो. इथे तात्पर्य आहे, माझ्या परिस्थितीचं माझ्या द्वारे केलेल्या विश्लेषणाशी.

परिस्थिती अशी आहे.

पाऊस पडंत होता. मनांत काहीही शंका न आणता, की मी मूखिन आहे, मी काळी इंग्रजी छत्री घेऊन मूखिनच्या धिम्या चालीने घरी चाललो होतो. मूखिनच्या सवयीनुसार मी आकाशांत होतो, प्रत्येका गोष्टीबद्दल विचार करंत होतो - - : परक्यांच्या गोष्टींबद्दल, पण फक्त बाह्य प्रतिक्रियांच्या स्त्रोतांबद्दल विचार नव्हतो करंत, ज्यांच्या अस्तित्वामुळे स्वतःच्या विचारांना उत्तेजित करायचं माझ्याकडे येवढही कारण नव्हतं. हे पण जोडतो - - : स्वच्छ, मूखिनसारख्या स्पष्ट, शुद्ध विचारांना. Rate this content
Log in

More marathi story from Charumati Ramdas

Similar marathi story from Fantasy