Dear Sensitivity,
Dear Sensitivity,


हल्ली खूप भीती वाटते ग मला..
तू मला सोडून जाशील अशी...
खूप भीती वाटते...
म्हणूनच नवीन नाटक, कथावाचन, कार्यक्रम, लिखाण, काहीही आलं तर लगेच "हो" म्हणून टाकतो मी..
मागचा पुढचा विचार न करता... कदाचित चूक ही असेल माझं...
किती सबमिशन राहिलंय, किती अभ्यास राहिलाय, किती असाईनमेंट्स आहेत... कशाचाही विचार न करता आलेल्या संधीला " हो " म्हणतो मी...
कारण मला खरंच खूप भीती वाटते तू मला सोडून जाशील अशी...
मला भीती वाटते, अचानक एखाद्या दिवशी सकाळी उठलो आणि यंत्रसारखा सगळी कामं करायला लागलो मी, तर ???
माझ्यातली संवेदनशीलताच हरवली तर...?
खूप घाबरतो मी अशा situation ला...
कारण तूच अशी आहेस अख्ख्या जगात, जी माझे टँट्रम्स सांभाळू शकते.... बाकी कोणी नाही माझं.. खरंच नाही...
I really love you....