ड्रोन कॅमेरा
ड्रोन कॅमेरा


लॉकडाऊन शहरात लागु होता. मिलिटरी फोर्स तैनात करण्यात आली. संचारबंदी लागु करण्यात आली. कोणालाही कामाव्यतीरिक्त फिरता किंवा जमाव करता येत नव्हते. रात्रीच्या वेळी एक ड्रोन कॅमेरा ठेवत होता. चांदण्या आकाशात काही लोकांना तारा चमकताना दिसला, त्यावरुन लोकालोका़त चर्चा रंगली, तर्कवितर्क रचले गेले. चांदण्यापासून तो खूपच लांब होता. जमिनीवरुन क्षितिजावर रेंगळताना दिसत होता. लोक जमा होत होते. एकाचे दोन दोनाचे चार असा आकडा वाढत होता. आता दोन गट तयार झाले. एक आशावादी गट व एक तर्कवादी गट.
आशावादीनुसार हा तारा होता, तर तर्कवादीनुसार हा ड्रोन कॅमेरा होता. दोन गटात “तू तू मै मै” सुरु झाली. चर्चेला वादाचे स्वरुप आले, वादातून राग आणि अहंकार निर्माण झाला. त्वेष निर्माण झाला. मी पणा निर्माण झाला!! ’माझेच खरे’ अशी परिस्थिती तयार झाली. लोकांची गर्दी वाढत होती. दोन गटात हाणामारी होते. पोलिस व्हॅन!! टु टु!!! हाॅर्न वाजवत येते. एरिया कोड टिपला जातो. सिग्नल दिले जाते. दोन्ही पार्ट्यांना कॅमेऱ्यात टिपलेले चित्र दाखवली जातात. ‘लोकेशन मॅच’ एक पोलिस बोलतो. ड्रोन कॅमेरा चमकायचा बंद होतो.