दाखवीन तुला
दाखवीन तुला
काहीतरी पुटपुटत आहे ती बया.. तिच तीलाच ठाऊक काय बडबडत आहे... काहीतरी दाखवीन दाखवीन एवढच ऐकायला येत आहे मला, बाकी डोक्या वरून जातय!!
आणि ती फाड फाड बोलणारी पिटूकली, 'I want my Space' I want My Space'
काय चालतय आजकाल घरात काही कळत नाही, शांताबाई शांतपणे नातीचे व तीच्या आईचे बोलणे ऐकत होत्या! तसेही आजकाल त्या जास्त रस घरात चालणाऱ्या गोष्टीत घेत नव्हत्या! पण काहीतरी जागेवरून चालले आहे हा अंदाज बांधला!
कष्टाने उभे केलेल्या घरावर ह्या बयेचा डोळा आहे व मला घरा बाहेर काढायचे आहे, तीला म्हणे तीची पेस, फेस काय म्हणते ते पाहिजे आहे! सासूची कटकट वाटते पण तीची जागा, पैसा पाहिजे. गोड गोड बोलुन आधीच आपया नावावर करून घेतले!
आता मला माझी स्वतःची ओळख ठेऊन आनंदी राहायचे, सुनेचे नातीचे ऐकुन घ्यायचे नाही! त्यांच्या लाडी लाडी बोलण्यावर विश्वास ठेवुन चालणार नाही, माझी, माझ्या विचारांची कदर नाही! त्याच्या पेक्षा अनोळखी गरजुंना दिलेले बरे!
माज आहे सगळ आयत मिळालं आहे त्याच!
ती छुटकी काय ते फाड फाड न येणाऱ्या इंग्रजी बोलते, हसुच येत मला! हासले की रूसुन बसते!
मी जिवंत आहे तो पर्यंत तरी हीचे नखरे चालवुन घेणार नाही, मला एका खोलीत डांबवुन ठेवण्या पेक्षा हिला व तीच्या त्या चिमुरडीलाच, एका खोलीतच वावरा सांगते, मग कळेल घर व घरातली जागा कशी वापरायची असते!
कितीही वाटले तरी वाईट विचार फक्त मनातच राहतात!
तुझी जागा दाखवीन तुला! दाखवीन तुला म्हणजे मला माझी जागा दाखवणार! बघतेच कशी दाखवते ते! घर माझ्याच नावावर आहे, जास्त त्रास दिला तर तीलाच बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल! मग बघत बस आकाशात आहे का कुठे जागा!!
