STORYMIRROR

SWATI WAKTE

Comedy Children

1  

SWATI WAKTE

Comedy Children

चिंटूचा स्पोर्ट्स डे

चिंटूचा स्पोर्ट्स डे

1 min
289

चिंटू एक खोडकर मुलगा असतो. त्याच्या शाळेत स्पोर्ट्स डे निमित्त स्पर्धा आयोजित केल्या जातात. चिंटू धावण्याच्या स्पर्धेत आणि सॅक रेसमध्ये भाग घेतो. धावण्याच्या स्पर्धेत चिंटू सर्वात मागे पळतो. जेव्हा त्याच्या लक्षात येते की आपण कितीही पळालो तरी जिंकू शकत नाही तसे तो पळणे थांबवून बाहेर निघतो आणि जागेवर बसतो.


त्याची टीचर त्याला विचारते, का रे चिंटू तू का पळत नाही.


त्यावर तो म्हणतो, टीचर पळून का माझी एनर्जी घालवू. मी हरणारच, त्यामुळे मी इथे बसून मॅच एन्जॉय करतो.


त्यावर त्याची टीचर त्याला म्हणते, अरे चिंटू तू हरला तरी चालले असते, अरे, पण शेवटपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे असते म्हणजे तुला इतके समाधान तर मिळाले असते की तू पूर्ण यश अपयशाची चिंता न करता प्रयत्न केले.


त्यावर चिंटू म्हणतो, मला टीचर वाईट आताही वाटत नाही कारण मी निदान मॅच तर एन्जॉय करू शकतो.


टीचर स्वतःच्या डोक्यावर हात लावून गप्प बसतात.


नंतर सॅक रेस सुरु होते. परत चिंटू मागे पळतो पण यावेळी तो सॅक घेऊन जागेवर जाऊन बसतो.


त्यावर त्याचे टीचर स्पर्धेचा रूट तो आहे तू इथे का आलास, असे विचारतात.


त्यावर चिंटू म्हणतो, सर मी यावेळी सॅकनेच इथे आलो. टेक्निकली मीच जिंकलो मी माझ्या जागेवर सॅक घेऊन आलो.


त्यावर सर म्हणतात, गेम्सचे रुल्स असतात ते पाळायला पाहिजे.


चिंटू म्हणतो, पण सर आपण आपले डोके चालवून रुल बदलून जिंकू शकतो.


सर परत डोक्याला हात देऊन गप्प बसतात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy