चहाच्या पेल्यातले भांडण...
चहाच्या पेल्यातले भांडण...


मुसळधार पाऊस पड़त होता रस्त्यावर अजिबात गर्दी नहवती. अशा पावसात मंदार कार घेवून निघाला होता. डोक्यात जान्हवी चा विचार कुठे गेली असेल ही ? इतका राग असावा का कोणाला? पण जान्हवी बाहेर गेली तेव्हा नव्हता पाऊस आता अचानक आला .या पावसात कुठे गेली असेल जान. असा विचार मंदार च्या मनात येत राहिला. वाद भांडण तर प्रत्येक कपल मध्ये होत असतात म्हणून काय असे चिडून जायचे का? जान्हवी आहेच चीड़खोर लगेच राग येतो तिला. आता थोड़ा पाऊस थांबला होता.
रोडच्या बाजूला एक चहाची टपरी होती. तसे मंदार ला जानवले की त्याला भूक लागली आहे सकाळी थोड़ा नाष्टा केला होता त्याने. त्यानंतर तर वाद झाला दोघांचा. त्याने कार त्या टपरी जवळ थांबवली तिथे गरम गरम भजी पण होती . त्याने एक प्लेट भजी घेतली ते खावून मग चहा घेतला. पाऊस पडून गेल्या मुळे वातावरण छान प्रसन्न झाले होते. त्याला आठवले जान्हवी ला पाऊस अजिबात आवडत नाही. पण त्याला खुप आवडतो पाऊस,पावसात भिजायलाही त्याला आवडे. तो तिला मुद्दाम भिजवत असायचा मग ती चिडुन रुसुन बसायची, मंदार मग तिला मनवायचा म्हणायचा अशी कशी ग तू जान पाऊस तर प्रेमी युगलांचा सखा असतो किती रोमैण्टिक असतो पाऊस आणि तुला आवडत नाही. हो नाही आवडत मला पाऊस ते पानी चिखल नो,मग हा अजुनच चिड़वायचा हॉऊ अनरोमैण्टिक यू आर जान्हवी. असु दे आहे तशी आहे मी पटल तर बघ नाहीतर दूसरी शोध तुझ्या सोबत पावसात भिजनारी. ना बाबा आपली जान तर जान्हवी च आहे असे म्हणत तिला मिठीत घ्यायचा.
आता चहा घेत मंदार ला हे सगळ आठवत होते. चहा याचा वीक पॉइंट तर जान्हवी कॉफी शौकीन. तो शांत समंजस तर ती तापट ,पटकन रिएक्ट करणारी. मन्दार ने तिला कॉल लावला. रिंग होत होती पण तिने उचलला नाही. त्याने चार पाच वेळा कॉल केला पण नो तिने नाही घेतला फोन. मग याने ही रागाने आपला फोन स्विच ऑफ केला. मी इतके सामंजस्य पणे वागतो त्याचे हिला काहीच नाही का? बसु दे एकटी आता. असा विचार करत मन्दार तिथुन निघाला. पावसाला परत सुरवात झाली होती. त्याने फोन सुरु केला आणि रोहन ला कॉल केला ,रोहया आहेस का रूम वर मी येतो आता. हो आहे ये आणि जमले तर ये घेऊन मस्त पाऊस आहे पार्टी करू. बर आणतो म्हणत मंदार ने फोन ठेवला आणि परत स्विच ऑफ केला.
वाटेत त्याने वोडका घेतला आणि रोहन कड़े आला. रोहन त्याचा जिगरी यार. एकटा जीव सदाशिव मग पार्टी करायची किंवा गर्लफ्रैंड ला भेटायच तर रोहया चा फ्लैट ऑलवेज अवेलेबल! मंदार आला रोहन कड़े. दार उघडतच रोहन म्हणाला काय रे जान्हवी शी भांडलास का? अरे रोहया मिच भांडत असतो का रे ? ती आहे शॉर्ट टेमपर्ड लगेचच रुसुन बसते जरा काही बोलायची सोय नाही. बर बाबा तुमचे तुम्ही बघा. आता भांडता आणि रात्री एक होता. चल खायला आण भूक लागली. मग रोहन ने शेजारच्या हॉटेल मधून बिर्यानी ऑर्डर केली. तंदूर ही मागवले. इकडे जान्हवी राग शांत झाल्या वर घरी आली होती. तिला ही भूक लागली होती. आता काही बनवायला वेळ नव्हता तिने पटकन चहा ठेवला आणि फ्रेश व्हायला गेली. चहा तयार झाला तिने टोस्ट घेतले खायला आणि मंदार ची आठवण आली तिला. चहा त्याचा जीव की प्राण कधी ही प्यायला तयार! त्याच्या आठवणी ने तिच्या डोळ्यात पानी आले. तिने त्याला फोन केला पण स्विच ऑफ लागला. आपण उगाच चिड़लो त्याच्या वर,जरा पण समजून घेत नाही. तो किती शांत आहे किती जपतो मला मग मी का अशी वागते? का नाही माझ्या रागाला आवर घालत ? असा विचार ती करू लागली. चहा संपला तिचा.
ती बेडरूममध्ये आली. परत तिने मन्दार ला कॉल केला पण फोन बंदच. पाऊस सुरुच होता. या पावसात कुठे गेला असेल ? फोन का बन्द येतोय कार चा काही अपघात वगैर असे नको नको ते विचार तिला छळू लागले. नाही मंदार कार नेहमी व्यवस्थित चालवतो तसे काही नसेल,फोन ची बॅटरी उतरली असेल असा विचार ति करू लागली. पण मनातून मंदार ची काळजी वाटत होती. तिने त्याच्या मित्रांना कॉल केला पण कोणा कड़े नव्हता आला मंदार. मग रोहन आठवला तिला,तिने पटकन कॉल केला पण तो रेंज मध्ये नहवता. पावसा मुळे रेंज नसेल म्हणून गप बसली ती. अशातच संध्याकाळ झाली. जान्हवी ने पुन्हा मंदार चा फोन ट्राय केला तो बंदच होता. आता तिला टेंशन येवू लागले.
इकडे मंदार मस्त खावून पिऊन झोपी गेला होता. तो संध्याकाळी सात लाच उठला. मग त्याला ही जानवले की आपण जान्हवी ला फोन नाही केला ती घरी आली असेल का? या विचारात त्याने फोन सुरु केला तर जान्हवी चे दुपार पासून 25 मिस कॉल आले होते. तो उठला फ्रेश होऊन रोहन ला बाय बोलून निघाला. घरी आला तो पर्यंत 8 वाजुन गेले होते. त्याने घराची बेल वाजवली तशी जान्हवी पटकन आली दार उघडले ती त्याला घट्ट मीठी मारून रडू लागली. मंदार अरे कुठे होतास दिवसभर माझे चुकले मी उगाच भांडते रे तुझ्या सोबत प्लीज माफ कर मला. अग हो हो शांत हो,मी रोहन कड़ेच होतो आणि रागाने फोन बन्द ठेवला होता. खड़ूस आहेस तू एक नम्बर मन्दार असे म्हणत जान्हवी त्याला मारू लागली .मैड तुझ्या काळजीने नको नको ते विचार डोक्यात येत होते आणि तू खुशाल झोपा काढ़त असशील ना हो ना? मग मंदार ने तिला पटकन जवळ ओढले आणि ओठांवर किस केले. तिने त्याला बाजूला केले म्हणाली, तू ड्रिंक केलेस ना मैड? अरे सॉरी यार प्लीज. तुझ्या आठवणीत घेतले ग. कान धरुन तो बोलला. मग जान्हवी पुन्हा त्याच्या मिठित गेली. मिस यू नवरोबा परत असे नको करू. हा आणि तू पन भांडु नको छोट्या छोटया कारणा वरुन. नाही भांडत.
मन्दार म्हणाला, बायको आय लव यू सो मच आणि त्याने तिला गालावर किस केले.